बरेचदा काही जणांकडे कितीही ट्रिक्स वापरल्या तरी भात (rice) सुटसुटीत आणि मोकळा होत नाही. मग अशावेळी सर्व तांदूळ बदलून पाहतात. पण तुम्हाला नेहमी सुटसुटीत आणि मोकळा भात करायचा असेल तर आम्ही सांगत असलेल्या तीन (3) सोप्या ट्रिक्स तुम्ही स्वयंपाकघरात वापरून पाहा. स्वयंपाकघरात काम करताना अशा काही चुका होतात ज्यामुळे जेवणाचा स्वाद बिघडतो. कधी मीठ जास्त होतं, तर कधी साखर कमी पडते. पण भातामध्ये झालेली चूक ही नेहमीच आपल्याला त्रासदायक ठरते. कारण फडफडीत भात घशाखाली उतरत नाही आणि अगदी पाणी जास्त झालेला भातही गिळवत नाही. अशी अवस्था तुमचीही होत असेल तर हा लेख नक्कीच तुमच्या उपयोगात आणा. कारण नॉर्मल भात आपण कसाही खाऊ पण हेच तुम्हाला बिर्याणी, पुलाव अथवा फ्राईड राईस बनवयाचे असेल तर भात मोकळा आणि सुटसुटीत होणं आणि अख्खी शितं राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मग अशावेळी नक्की काय करायचं ते जाणून घ्या. या ट्रिक्सने भात सुटसुटीत तर होईलच पण याचा स्वादही वाढतो.
पाण्याचा योग्य अंदाज
Shutterstock
काही जणांना वाट्यांचा हिशेब न घेता अंदाजाने पाणी तांदळामध्ये घालायची सवय असते. पण जेव्हा कुकरमध्ये तुम्ही भात शिजवता तेव्हा तांदळामध्ये योग्य प्रमाणात पाणी घालणे अत्यंत गरजेचे आहे. तसंच तांदूळ किती जुना आणि किती नवा आहे यावरही पाण्याचे प्रमाण अवलंबून असते. पाण्याच्या प्रमाणासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही किती वाटी तांदूळ घेत आहात त्याच्या दुप्पट पाणी भातासाठी वापरणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ एक वाटी तांदूळ असतील तर त्यामध्ये दोन वाटी पाणी घाला आणि मगच शिजवा. बिर्याणी करत असताना तांदूळ बिर्याणीचाच वापरावा. त्याशिवाय कुकरमध्ये शिजवत असाल तर एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी घातल्यास, भात व्यवस्थित सुटा होतो. हे नेहमी लक्षात ठेवा.
रात्री भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो का, जाणून घ्या काय आहे सत्य
लिंबाच्या रसाचा वापर
Shutterstock
भात बनविण्यासाठी जेव्हा तुम्ही तांदूळ आणि पाणी एकत्र कराल तेव्हाच त्यासह लिंबाचा रस आणि एक चिमूटभर मीठ घाला आणि हे तुम्ही बाहेर भांड्यात शिजवा. जर तुम्हाला कुकरमध्ये बनवायचा असेल तर तुम्ही शिटी झाल्यानंतर साधारण 5 मिनिट्स गॅसची आच कमी करून मंद करा आणि मग अगदी मंद आचेवर भात शिजून द्या. तुम्ही जर तांदूळ भिजवून ठेवले असतील तर तुम्ही एक कड काढा आणि मग गॅस मंद करा आणि झाकण ठेऊन भात शिजवा. तुम्हाला जर असं वाटत असेल की लिंबाच्या रसाने भात आंबट आणि पिवळा दिसेल तर असं अजिबात होत नाही. वास्तविक लिंबाच्या रसाचा वापर केल्याने भात अधिक सफेद आणि सुटसुटीत दिसून येतो.
बिनधास्त खा भात कारण भात खाण्याचे आहेत भरपूर फायदे (Benefits of eating Rice in Marathi)
तूप अथवा लोण्याचा वापर
Shutterstock
तुम्ही जेव्हा भात बनवता तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे तांदूळ शिजवण्यापूर्वी 4-5 वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. असं केल्यामुळे तांदळामधील अतिरिक्त मोड निघून जातो आणि तांदूळ हलका होऊन व्यवस्थित आणि सुटसुटीत शिजतो. याशिवाय कुकरमध्ये तांदूळ शिजवायचा असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने शिजवा. तांदूळ ज्या भांड्यात तुम्ही शिजवणार असाल त्याला भांड्याला खाली तुम्ही तूप अथवा लोणी (बटरदेखील चालेल) लावा. योग्य प्रमाणात पाणी घाला आणि मग तांदूळ शिजवा. हा तांदूळ हमखास सुटसुटीत आणि मोकळा होतो. तसंच तुपामुळे या भाताला अत्यंत सुंदर सुगंध येतो आणि याचा स्वादही दुप्पट छान लागतो. तुपाचे अनेक फायदे आहेत.
या सर्व ट्रिक्स मी स्वतः स्वयंपाकघरात वापरून पाहिलेल्या आहेत आणि बिर्याणी अथवा पुलाव बनवताना तर या ट्रिक्स नक्कीच वापरा. याचा तुम्हाला खूपच चांगला अनुभव येईल.
आरोग्यासाठी रोज दही भात खाणं ठरतं सर्वोत्तम, वजन नियंत्रणात राखण्यास मदत
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक