ADVERTISEMENT
home / Care
सोप्या टिप्स फॉलो करून घरीच बनवा केसांसाठी सनस्क्रिन

सोप्या टिप्स फॉलो करून घरीच बनवा केसांसाठी सनस्क्रिन

प्रखर सूर्य किरणांमुळे त्वचेप्रमाणे केसांचे नुकसान होत असते. कारण सूर्याची अतिनील किरणे केसांच्या क्युटिकल्स च्या वरील आवरणाचे नुकसान करतात. ज्यामुळे केस तुटणे, गळणे, केसांना फाटे फुटणे, केस कोरडे होणे, पातळ होणे, केसांचा पोत बदलणे अशा समस्या निर्माण होतात. सहाजिकच केसांच्या या समस्या  दूर करण्यासाठी आणि केसांना संरक्षण मिळण्यासाठी त्वचेप्रमाणेच केसांनाही सनस्क्रिनची गरज लागू शकते. यासाठी बाजारात मिळणाऱ्या केमिकल्सयुक्त क्रिमची मदत घेण्यापेक्षा किंवा त्यावर विनाकारण पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच केसांसाठी सनस्क्रिन तयार करू शकता. DIY हेअर सनस्क्रिन तयार करण्यासाठी  फॉलो करा या स्टेप्स आणि राखा केसांचे आरोग्य उत्तम

केसांसाठी का गरजेचं आहे सनस्क्रिन

बाजारात खास केसांसाठी तयार करण्यात आलेले सनस्क्रिन मिळते. मात्र त्याबद्दल सर्वांना माहीत असतंच असं नाही शिवाय जर तुम्हाला अशा उत्पादनांवर विनाकारण पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर तुम्ही तुमच्या केसांसाठी घरीच सनस्क्रिन बनवू शकता. केसांना सनक्रिन लावण्याचे अनेक फायदे होतात. जाणून घ्या कोणते

  • केसांचे सूर्यकिरणांपासून संरक्षण होते  
  • केसांना योग्य पोषण मिळते
  • केस पातळ होत नाहीत
  • केस गळणे रोखल्यामुळे केस मजबूत आणि दाट होतात
  • केसांना नैसर्गिक चमक मिळते
  • केस मऊ आणि मुलायम होतात
  • केसांच्या क्युटिकल्सची दुरूस्ती झाल्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो
  • केसांचा गुंता कमी झाल्यामुळे केस तुटणे आपोआप कमी होते

केसांसाठी सनस्क्रिन घरी तयार करण्याची सोपी पद्धत

केसांना पोषण देणारे आणि केसांचे संरक्षण करणारे घटक वापरून तुम्ही घरच्या घरी केसांसाठी सनस्क्रिन तयार करू शकता.

ग्रेप्स सीड्स आणि गुलाब पाणी

ग्रेप्स सीड वापरणं केसांसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. शिवाय यामुळे तुमचे केस चांगले पोषण झाल्यामुळे मऊदेखील होतात. गुलाबपाण्यामुळे केस हायड्रेट राहण्यास मदत होते. 

ADVERTISEMENT

हेअर सनस्क्रिन तयार करण्याची पद्धत –

  • दोन चमचे ग्रेप्स सीड्स ऑईल घ्या
  • गुलाब पाणी एका हेअर स्प्रे बॉटलमध्ये घ्या
  • गुलाबपाण्यात ग्रेप्स सीड ऑईल मिसळा
  • मिश्रण चांगले मिक्स करा आणि नियमित केसांवर स्प्रे करा

लव्हेंडर ऑईल आणि व्हाईट टी क्रिम

लव्हेंडर ऑईलमुळे तुमचे केस मुलायम राहतात शिवाय यामुळे तुमच्या केसांचे सूर्य किरणांपासून संरक्षण होते. या दोन्ही घटकांमुळे तुमचा स्काल्प मॉईस्चराईझ राहते आणि केसांची वाढ चांगली होते

हेअर सनस्क्रिन तयार करण्याची पद्धत –

  • एका भांड्यात पाणी घ्या त्यात लव्हेंजर ऑईलचे चार ते पाच थेंब टाका
  • या  पाण्यात दोन व्हाईट टी बॅग टाका
  • सर्व मिश्रण एकत्र करा आणि हेअर स्प्रेने केसांना लावा

झिंक सनस्क्रिन

झिंक केसांसाठी खूपच लाभदायक असते.. कारण  सूर्याच्या अतिनील किरणांपासून यामुळे तुमच्या केसांचे संरक्षण होते. केसांची गुणवत्ता आणि आरोग्य वाढण्यासाठीही केसांना झिंकची गरज लागते. 

ADVERTISEMENT

हेअर सनस्क्रिन तयार करण्याची पद्धत –

  • डिसिल्टेड पाणी, नॉन नॅनो झिंक आणि ऑर्गन ऑईल एकत्र मिसळा
  • सर्व मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा
  • नियमित केसांवर हे मिश्रण स्प्रे करून केस सुरक्षित करा

फोटोसौजन्य – Pixels

अधिक वाचा –

तुम्ही वापरत असलेला हेअर ब्रश तुमच्या केसांसाठी योग्य आहे का

ADVERTISEMENT

सुंदर केसांसाठी हे होममेड हेअरऑईल आहेत फारच फायदेशीर

अकाली टक्कल पडणे आणि केस गळतीच्या समस्यांमध्ये वाढ, तरूणाईपुढे पेच

27 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT