ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
shravan-mahina-hardik-shubhechha-in-marathi

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा | Shravan Month Wishes In Marathi

‘श्रावणात घननिळा बरसला’ या ओळी आपोआपच श्रावण सुरू झाल्यावर ओठांवर गुणगुणाव्याशा वाटतात. मराठी महिना श्रावण हा आपल्याकडे अधिक प्रसिद्ध आहे तो सणांसाठी. सण समारंभ आणि व्रतवैकल्याने भरलेला असा हा मराठी महिना. या महिन्यानंतर हरतालिका शुभेच्छा, गणेशोत्सव शुभेच्छा अशा सणांची जणू सुरूवातच होते. इतकंच नाही तर या महिन्यात निसर्गामध्ये इतका उत्साह भरलेला असतो. चहूबाजूला हिरवळ आणि आनंदीआनंद असा हा महिना नेहमीच सर्वांना हवाहवासा वाटणार आहे. त्यामुळेच या महिन्यावर आणि पावसावर अनेक गाणी आणि कविताही लिहील्या गेल्या आहेत. मंगलमय असा हा श्रावण महिना ज्यामध्ये मंगळगौर, सोळा सोमवार (Shravan Somvar Chya Hardik Shubhechha), शनिवारचे उपवास, अनेकविध पूजा केल्या जातात. यावर्षी श्रावण मास 2021 मध्ये 9 ऑगस्ट रोजी सुरू होत असून याची समाप्ती 6 सप्टेंबर, 2021 रोजी होत आहे. हा महिना आपल्या सगळ्यांसाठीच शुभदायी जावो अशा शुभेच्छा देण्यासाठी खास हा लेख. श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा (Shravan Mahina Shubhechha In Marathi) देण्यासाठी आम्ही हा लेख तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. श्रावण महिना शुभेच्छा (Shravan Month Wishes In Marathi), कोट्स (Shravan Month Quotes In Marathi), शुभेच्छा संदेश (Shravan Mahina Sms Marathi) आणि श्रावण महिन्यातील कविता (Shravan Mahina Marathi Kavita) हे सर्व खास तुमच्यासाठी. करूया श्रावण महिन्याचे आनंदात स्वागत!

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा | Shravan Mahina Shubhechha In Marathi

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा | Shravan Mahina Shubhechha In Marathi
Shravan Mahina Shubhechha In Marathi

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे या ओळी श्रावण म्हटला की, सर्वांंनाच आठवतात. सणांनी भरभरून युक्त असा हा महिना मनात खूपच उल्हास निर्माण करतो. अशाच या मंगलदायी महिन्याच्या अर्थात श्रावण महिना शुभेच्छा (Shravan Month Wishes In Marathi) खास तुमच्यासाठी.  

1.  निसर्ग आलाय बहरून, मनही आलंय मोहरून
रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

2. येण्याने तुझ्या मन येई मोहरून, देही जाई शहारून 
सरींनी या मन होई चिंब चिंब, श्रावण येई असा बरसून 
श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा

ADVERTISEMENT

3. रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पानापानात लपला श्रावण 
फुलाफुलांत उमलला श्रावण – श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा!

4. सणासुदीची घेऊन उधळण
आला रे आला हसरा श्रावण!

5. परंपरेचे करूया जतन 
आला आहे श्रावण – श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

6. आनंद माझ्या मनात माईना, सृष्टी सजली बदलली दृष्टी 
घेऊन सरींवर सरी आला तो माझ्या अंगणी 
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

7. हासत – गात, घेऊन सरींची बरसात 
आला तो मनमोहक माझा श्रावण महिना 

8. जरासा हासरा, जरासा लाजरा
सणासुदीची परंपरा राखण्या आला श्रावण आला 
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

9. कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण
करून ठेवतो कायमची साठवण
असा हा तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका महिना श्रावण 

10. संस्कृतीचा अनमोल ठेवा राखण्या 
आला तो श्रावण पुन्हा आला…श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

श्रावण महिन्यातील सण

श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी | Shravan Somvar Chya Hardik Shubhechha

श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी | Shravan Somvar Chya Hardik Shubhechha
Shravan Somvar Chya Hardik Shubhechha

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा अत्यंत महत्त्वाचा समजण्यात येतो. श्रावणातील सोमवारी उपवास केल्याने पुण्य मिळते असे समजण्यात येते. यंदा 26 जुलै रोजी पहिला श्रावण सोमवार येत आहे. श्रावण सोमवारचे व्रत अनेक महिला करतात. भगवान शिव यांच्या आवडीचा हा महिना समजण्यात येतो. त्यामुळे या सोमवारी व्रत करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेता येते अशीही गाथा सांगण्यात येते. अशा या पवित्र श्रावण सोमवार शुभेच्छा मराठीत (shravan somvar chya hardik shubhechha) खास तुमच्यासाठी. 

1. शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे 
शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे
शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती 
श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

2. पहिल्या श्रावणी सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा!

ADVERTISEMENT

3. ओम नमः शिवाय – बम बम भोले 
श्रावणी सोमवारच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

4. महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान 
महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना 
श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

5. श्रावण मासाला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ 
ठेऊ शिवाचे व्रत 
होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण 
श्रावणी सोमवारच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

वाचा – श्रावण महिन्याचे महत्व

ADVERTISEMENT

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा | Shravan Month Wishes In Marathi

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा | Shravan Month Wishes In Marathi
Shravan Month Wishes In Marathi

श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही कविता, संदेश याचा उपयोग करू शकता. अशाच काही खास शुभेच्छा. 

1. कोवळ्या उन्हासोबदत आलेली अलगद श्रावणसर
अवखळ वाऱ्याची अल्लडशी लहर 
पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर 
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!

2. निसर्ग बहरलाय, गारव्याने देहही शहारलाय
मनही थोड मोहरून घ्या, आलाय श्रावण भिजून घ्या 

3. श्रावण महिन्याच्या मंगलमय शुभेच्छा!

ADVERTISEMENT

4. सुरू होणारा हा श्रावण तुमच्या मनाला सुख,
शांती आणि समाधान लाभणारा ठरू दे हीच सदिच्छा!

5. मराठी परंपरेचा वारसा, श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाचा – गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचे महत्व

श्रावण महिन्याचे कोट्स मराठीत | Shravan Month Quotes In Marathi

श्रावण महिन्याचे कोट्स मराठीत | Shravan Month Quotes In Marathi
Shravan Month Quotes In Marathi

आता सोशल मीडियाच्या जगात अनेक वेळा कोट्स आणि संदेशांची आपल्याला गरज भासते. श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास कोट्स. 

ADVERTISEMENT

1. पावसाने भिजून जाई अवखळसा किनारा, श्रावणाच्या चाहुलीने हर्षे निसर्ग सारा  

2. आकाशी मेघ गरजती, गुंफूनी माळा, मन चिंब भिजवूनी जाई हा मनी वसणारा पावसाळा
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

3. बेभान मुक्त वारा केसांशी खेळून मला लाजवेल
श्रावण सरींनी बहरून बेधुंदपणे त्यात रमेल 

4. श्रावणात पावसाने कमालच केली, धो धो कोसळून धमालच केली
अशाच मनसोक्त धारांसाठी श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

5. घेतलीच नाही क्षणभरही उसंत 
अशीही श्रावणातील सरींची भ्रांत 

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 

श्रावण महिना संदेश मराठीत | Shravan Mahina Sms Marathi

श्रावण महिना संदेश मराठीत | Shravan Mahina Sms Marathi
Shravan Mahina Sms Marathi

श्रावण महिन्यात तुम्हाला शुभेच्छा संदेश द्यायचे असतील तर मराठीतून तुमच्यासाठी खास संदेश. तुम्हीही तुमच्या प्रियजनांना आपल्या मातृभाषेतून शुभेच्छा द्या. श्रावणापाठोपाठ येणाऱ्या भाद्रपद महिन्यात गणपती विसर्जनानंतर शेअर करण्यासाठी गणपती बाप्पा विसर्जन स्टेटस पाहा.

1. चाहूल तुझी लागताच येते मन बहरून
अशा या श्रावण महिन्याच्या भरभरून शुभेच्छा!

ADVERTISEMENT

2. सरीवर सरी येतात आणि मन जातात भिजवून
श्रावण आला सांगतच येतात अगदी धावून  

3. श्रावण महिन्याच्या हिरव्यागार शुभेच्छा! तुमचं आयुष्यही सदैव असं टवटवीत राहो हीच सदिच्छा!

4. श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशिमधारा उलगडला 
झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा 
जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी 
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी 

5. श्रावण मासाच्या हिरव्यागार शुभेच्छा!

ADVERTISEMENT

वाचा – Bail Pola Wishes In Marathi

श्रावण महिना मराठी कविता | Shravan Mahina Marathi Kavita

श्रावण महिना मराठी कविता | Shravan Mahina Marathi Kavita
Shravan Mahina Marathi Kavita

श्रावणावर मराठीमध्ये अनेक कविता तुम्हाला मिळतील. श्रावणातील वातावरण इतकं सुंदर असतं की आपणहून कविता स्फुरतात. अशाच काही मनाला आनंद देणाऱ्या कविता खास तुमच्यासाठी.

1. श्रावणमासीं हर्ष मानसीं, हिरवळ दाटे चोंहिकडे;
क्षणांत येतें सरसर शिरवें, क्षणांत फिरुनी ऊन पडे.
वरतीं बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे, 
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपीं कुणी भासे!
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तों उघडे;
तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळें पिवळें ऊन पडे. 
उठती वरतीं जलदांवरती अनंत संध्याराग पहा;
सर्व नभावर होय रेखिलें सुंदरतेचे रूप महा.
बलाकमाला उडतां भासे कल्पसुमांची माळचि ते,
उतरुनि येती अवनीवरतीं ग्रहगोलचि कीं एकमतें.
फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरें सावरिती, 
सुंदर हरिणी हिरव्या कुरणीं निज बाळांसह बागडती.
खिल्लारें हीं चरती रानीं, गोपहि गाणीं गात फिरे,
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरें.
सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला;
पारिजातही बघतां भामा-रोष मनीचा मावळला!
सुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुलें-पत्री खुडती. 
देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयांत
वदनीं त्यांच्या वाचुनि घ्यावें श्रावण महिन्याचें गीत.      
                         – बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

2. निळ्या नभातुन बरसेल श्रावण
उन-पावसाचा खेळ करेल श्रावण
तहानलेल्या या धरतीला
धुंद सरींचा घोट पाजेल श्रावण
तना-मनास चिंब भिजवेल श्रावण
शब्दांची धुंद-तार छेडेल श्रावण
मस्त हवेच्या मौसमाने
या मनास मुक्तछंद लावेल श्रावण
हर्ष-उल्हास देईल श्रावण
फ़ुलण्याची नवी आस होईल श्रावण
हिरव्या नवलाईच्या शालुने
आज या धरणीस सजवेल श्रावण
ह्रुदयातली आग विझवेल श्रावण
प्रेमळ सरींनी भिजवेल श्रावण
काल नयनातुन बरसणा-या
थेंबालाआज नभातुन बरसवेल श्रावण
                        – सचिन काकडे

ADVERTISEMENT

3. हासरा नाचरा,जरासा लाजरा
सुंदर साजिरा श्रावण आला
तांबूस कोमल पाऊल टाकीत 
भिजल्या मातीत श्रावण आला
                       – विजय बावीस्कर 

4. श्रावण आला गं वनी श्रावण आला
दरवळे गंध मधुर ओला
एकलीच मी उभी अंगणी
उगीच कुणाला आणित स्मरणी
चार दिशांनी जमल्या
तोवर गणनी घनमाला
बरसू लागल्या रिमझिम धारा
वारा फुलवी मोर पिसारा
हलू लागली झाडेवेली
नाच सुरू झाहला
उरात नवख्या भरे शिर्शिरी
शिरशिर करी नृत्य शरीरी
सूर कुठून ये मल्हाराचा
पदर कुणी धरिला
समीप कुणी आले, झुकले
कती धिटावा ओठ टेकले
मृदुंग की ती वीज वाजते,
भास तरी कसला
आला श्रावण श्रावण
                     – ग. दि. माडगूळकर

5. फांद्यांवरी बांधिले ग मुलिंनि हिंदोले
पंचमिचा सण आला डोळे माझे ओले
श्रावणाच्या शिरव्यांनी आनंदली धराराणी
माझे पण प्राणनाथ घरी नाही आले
जळ भरे पानोपानी संतोषली वनराणी
खळाखळा वाहतात धुंद नदीनाले
पागोळ्या गळतात बुडबुडे पळतात
भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले
आरशात माझी मला, पाहू बाई किती वेळा
वळचणीची पाल काही भलेबुरे बोल
                    – ग. दि. माडगूळकर

06 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT