Table of Contents
आजकाल आपण बरेचदा ऐकतो की, अगदी तरूण वयातील माणसांनाही हृदयविकाराचा झटका अर्थात हार्ट अटॅक येतो आणि होत्याचं नव्हतं होतं. जीवनात अशा घटना सांगून येत नाहीत आणि आल्यास त्या सारखा वाईट अनुभव दुसरा कोणताही नाहि. म्हणून वेळीच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यन्त आवश्यक आहे. आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही निरोगी हेल्थ विषयी काही टिप्स जाणून घ्यायला हव्यात. तुम्हाला माहीत आहे का? त्वरीत येत नाही हार्ट अटॅक, काही आठवडे आधीपासूनच ह्रदय विकार लक्षणे (heart problem symptoms in marathi) जाणवू लागतात. मात्र आपल्याला त्याची योग्य माहिती नसल्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करण्यात येते. हेच नंतर आपल्या जीवावर बेतते आणि मग हार्ट अटॅकसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. पण ही हृदय विकार लक्षणे नक्की कोणती आहेत हे तुम्हाला माहीत नसेल तर या लेखातून इत्यंभूत माहिती तुम्हाला मिळेल. हार्ट अटॅक येण्याची लक्षणे (heart attack symptoms in marathi) नक्की कोणती आहेत ते जाणून घेऊया. पण त्याआधी हार्ट अटॅक येत आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. अटॅक हा नेहमी अचानकच असतो. पण त्याआधी शरीरामध्ये अशी काही लक्षणे जाणवू लागतात, जी आपल्या दैनंदिन आयुष्यात त्रासदायक ठरतात.
ह्रदय विकार लक्षणे (Heart Attack Symptoms In Marathi)
Heart Attack Symptoms In Marathi
हृदय विकार लक्षणे नक्की कधीपासून जाणवतात आणि त्याचा काय परिणाम होतो याबाबत प्रत्येकाला माहीत असायला हवे. कारण बरेचदा या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे जीव गमवावा लागतो. पण ही लक्षणे नेमकी काय असतात हे जाणून घेऊया.
एंजायना पेन (Angina Pain)
हा वैद्यकिय शब्द असला तर पेन म्हणजे दुःख हे सर्वांनाच माहीत आहे. हार्ट अटॅक येण्यापूर्वी माणसाला बऱ्याचदा चालताना छातीमध्ये जडपणा जाणवतो. जेव्हा चालत असतो अथवा काम करत असतो तेव्हा छाती जर सतत जड होत असेल तर त्याला एंजायना पेन असे म्हणतात. हृदयविकाराचा झटका येणार असेल तर हे अत्यंत कॉमन लक्षण आहे. अधिकतम केसमध्ये हे लक्षण दिसून आले आहे. त्यामुळे तुम्हाला जर वरचेवर छातीत जडपणा जाणवत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.
श्वास घेण्यास त्रास होणे (Breathing Problem)
Freepik
अनेकदा अचानक श्वास घ्यायला त्रास होणे अथवा श्वास फुलण्याचा त्रास होऊ लागतो. साधारणतः तुम्हाला एक अथवा दोन मजले चढल्यानंतर कोणताही त्रास होत नसेल. पण आता जर अचानक त्रास होऊ लागला आणि श्वास चढू लागला तर तुम्ही वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्हाला इतर कोणत्याही आरोग्याबाबत समस्या असल्या आणि नसल्या तरीही तुम्हाला जर अशा स्वरूपाचा श्वासाचा त्रास होत असेल तर हे हार्ट अटॅक लवकरच येण्याचे लक्षण आहे. त्यामुळे यावर तुम्ही वेळीच लक्ष द्यायला हवे.
घशात सतत जळजळ होणे (Mimic Symptoms)
बऱ्याचदा जेवल्यानंतर सतत घशात जळजळ होत राहते. दिवसातून तुम्ही जेवढे वेळा खाल तेव्हा तेव्हा तुम्हाला जर अशी जळजळ होत असेल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. काही जणांना अॅसिडिटीच्या त्रासामुळे असा त्रास होतो. पण हाच त्रास जर काहीही खाल्ल्यानंतर सतत होत असेल तर तुम्ही लक्ष द्यायला हवे. अर्थात यामुळे हार्ट अटॅक येईलच असं नाही. पण हार्ट अटॅकच्या पूर्वलक्षणांमधील हेदेखील एक लक्षण (heart attack symptoms in marathi)आहे याची नोंद तुम्ही करून घ्या.
पोस्टप्रॅंडियल एंजायना (Postprandial Angina)
जेवल्यानंतर कधीतरी अचानक छातीतून कळ येते त्याला पोस्टप्रँडियल एंजायना असे म्हणतात. जेवल्यानंतर तुम्ही जर लगेचच चालायला लागतात तर तुम्हाला त्याचा त्रास होतो. तसंच याबरोबरच तुमच्या छातीत अचानक जळजळ होऊन जास्त प्रमाणात कळा येऊ लागतात. अशा स्थितीमध्ये कोणतीही व्यक्ती चालणे थांबवून आराम करते तेव्हा हा त्रास निघून जातो. पण जर आराम करतानाही हीच अवस्था राहली तर हृदयविकाराचा झटका येण्याचे हे लक्षण आहे.
चक्कर येणे आणि घाबरणे (Dizziness And Nervousness)
Shutterstock
हृदयविकाराशी संबंधित काही लक्षणे अशी असतात जी अन्य आजारांमध्येही दिसून येतात. याच कारणामुळे या लक्षणांच्या आधारावर तपासणी न करता समजून घेणे कठीण होते. यातील महत्त्वाचे लक्षण म्हणजे चक्कर येणे आणि उलटी होणे. चक्कर आणि उलटी ही दोन्ही लक्षणे अनेक आजारांमध्ये दिसून येतात. त्यामुळे हे हार्ट अटॅकशी संबंधित आहे की नाही हे ओळखणे कठीण होते. हार्ट अटॅकचे लक्षण असेल तर चक्कर येते आणि उलटीही होते मात्र इतर वेळी जसे खाणे खाऊ नये असे वाटते तसं होत नाही. हाच एक वेगळेपणा आहे. कोणत्याही गोष्टीसाठी नॉशिया आला आहे असं होत नाही.
डाव्या हातातून कळा येणे (Pain In Left Hand)
Freepik
काही व्यक्तींना डाव्या हातातून कळा येण्याची समस्यादेखील उद्भवते. या कळा अगदी जॉ लाईन अर्थात तुमच्या जबड्यापर्यंत पोहचतात. तर काही जणांना डावा आणि उजवा या दोन्ही हातांमध्ये त्रास होतो. पण जास्त लक्षणे ही डाव्या हातामधून कळा येण्याची दिसून आली आहेत. साधारणतः कोणतेही काम करताना अथवा चालताना होणारा त्रास हा आराम केल्यानंतर निघून जातो. पण काही वेळा या त्रासाकडे थकवा अथवा कमजोरीच्या कारणाने त्रास होतोय असे समजून दुर्लक्षित करण्यात येते. पण हे हार्ट अटॅक येण्याच्या लक्षणांपैकीही एक असू शकते.
सतत थकल्यासारखे वाटणे (Tiredness Feeling)
जेव्हा आपण थकतो तेव्हा आपण खूपच काम केले आहे असे आपण मानतो. पण काम करताना सतत थकवा येत असेल आणि लहानशा गोष्टींनीही थकायला होत असेल तर तुम्ही वेळीच याकडे लक्ष द्या. कारण ही कमतरता तुम्हाला हार्ट अटॅककडे नेणारी ठरू शकते. हे हार्ट अटॅकच्या लक्षणांपैकी एक लक्षण आहे. हृदयाच्या एखाद्या नलिकेत सूज अथवा इन्फेक्शन असल्यास, थकवा जास्त प्रमाणात येऊ लागतो. त्यामुळे वेळीच डॉक्टरांकडून तपासून घेणे आवश्यक आहे.
सतत खोकला आणि हाताला सूज येणे (Cough And Swollen In Hand)
Shutterstock
बरेचदा खोकला हा ऋतू बदल्याने होतो असे मानण्यात येते. पण खोकला जास्त वेळ टिकून राहिला तर टीबीसारखे आजार होऊ शकतात. पण याशिवाय सतत खोकला असणे हे हार्ट अटॅकचे लक्षणही मानले जाते. सतत खोकला असणे आणि हातापायवर सूज येणे ही समस्या तुमच्यासाठी एक इशारा आहे. हार्ट अटॅकच्या लक्षणांसह अन्य गंभीर आजाराचीही ही लक्षणे असू शकतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये.
जलद गतीने स्पंदने आणि सतत घाम (Fast Heartbeat)
कोणत्याही कारणाशिवाय अचानक सतत घाम येणे, अर्थात कोणतेही शारीरिक श्रम न करताही तुम्हाला घाम येणे अथवा सतत गरम होणे किंवा अचानक घामाने भिजून जाणे आणि बऱ्याचदा हृदयाची स्पंदने अचानक वाढतात अथवा अचानक कमी होतात ही लक्षणेही हृदय विकार लक्षणे (heart attack symptoms in marathi) आहेत. अचानक हृदयाचे ठोके हे कमी जास्त होतात आणि घाबरल्यासारखे वाटू लागते. ही स्थिती सतत येत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांशी सल्लामसलत करणे गरजेचे आहे.
महिला आणि पुरूषांमधील हार्ट अटॅकची लक्षणे वेगळी (Symptoms In Women And Men Are Different)
Shutterstock
– महिला आणि पुरूष या दोघांचीही विचार करण्याची पद्धत वेगळी असते. त्याचप्रमाणे दोघांचे शरीरही वेगवेगळ्या प्रकारचे असते. तर प्रत्येक माणसाचे हृदय हे वेगळ्या पद्धतीने काम करत असते.
– महिलांमध्ये आणि पुरूषांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणेदेखील वेगवेगळी असू शकतात.
– वर दिलेली सर्व लक्षणे दोघांमध्येही दिसून येऊ शकतात. मात्र महिलांमध्ये हृदयाच्या समस्येशी निगडीत अधिक लक्षणेही दिसून येतात.
– घाबरून उलटी होणे, खाण्याचा नॉशिया येणे, घशात अथवा छातीत अगदी भयानक जळजळ होण्यासह हृदयातून कळा येणे, अपचनाचा सतत त्रास होणे. त्यामुळे पुरूषांपेक्षा हे प्रमाणे महिलांमध्ये अधिक आढळून येते.
– महिलांना असे त्रास होत असल्यास, त्यांनी दुर्लक्ष न करता वेळीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
सामान्य रोगी आणि मधुमेही यांच्या लक्षणातील फरक (Symptoms Between Normal Patient And Diabetic Patients)
ज्याप्रमाणे महिला आणि पुरूषांमधील काही लक्षणे हार्ट अटॅकसाठी वेगळी असतात. त्याचप्रमाणे सामान्य आजारी असणारी माणसे आणि मधुमेह (diabetes) असणाऱ्या रूग्णांच्या लक्षणांमध्ये फरक आढळून येतो. यामध्ये महिला आणि पुरूष दोघांचाही समावेश आहे.
- साधारणतः मधुमेही व्यक्तींमध्ये हृदयसंबंधित आजाराची लक्षणे पाहत असताना छातीतील कळा समजून येत नाहीत अथवा अगदी सौम्य कळा जाणवतात. याला सायलंट एमआय असे म्हटले जाते.
- मधुमेही रूग्णांना अगदी सौम्य कळा येत असल्या तरीही सिव्हियर हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते आणि सामान्य रूग्णांना अगदी जोरदार कळ आली तरीही त्यांना येणारा अटॅक हा सौम्य असू शकतो. याच कारणामुळे मधुमेही व्यक्तींना अगदी हलकेसे जरी छातीत कळा येऊ लागल्या तरीही त्यांना वेळीच डॉक्टरांकडे घेऊन जावे लागते. कारण अशा व्यक्तींना हार्ट अटॅक आल्यावर जास्त प्रमाणात त्रास होतो.
प्रश्नोत्तरे (FAQ’s)
स्मोकिंग, कौटुंबिक आजाराचा इतिहास, मधुमेह असे रोग असतील अथवा सतत तणाव असेल तर हार्ट अटॅक लवकर येऊ शकतो. आनुवंशिकतादेखील याबाबत पाहिली जाते. कोणाच्याही घरात जर कमी वयामध्ये हृदयाशी संबंधित आजार असतील तर ते तपासून घ्यावे.
काही हार्ट अटॅकची लक्षणे ही अन्य आजारांच्या लक्षणांशी साधर्म्य दर्शवतात. त्यामुळे आपल्याला अटॅक येऊ शकतो की नाही हे ओळखण्यासाठी तुम्ही अशी लक्षणे दिसल्यास, वेळीच डॉक्टरांना जाऊन भेट द्यावी आणि योग्य उपचार घ्यावेत.
नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आपली जीवनशैली योग्य राखून निरोगी राहण्यासाठी चांगले हेल्दी जेवावे. त्याचप्रमाणे सिगारेट, दारू यासारख्या व्यसनांपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे.
तुम्हीदेखील ही सर्व लक्षणे नीट बारकाईने जाणून घ्या. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. तसंच तुम्ही हा लेख आवडल्यास नक्की शेअर करा.