Fitness

वजन कमी करण्याची ही ट्रिक करते 100% काम, जाणून घ्या कशी

Leenal Gawade  |  Sep 3, 2020
वजन कमी करण्याची ही ट्रिक करते 100% काम, जाणून घ्या कशी

वजन कमी करण्याच्या कितीही ट्रिक्स आणि टिप्स दिल्या तरी ती त्या सगळ्यांसाठीच काम करतात असे नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत. जी तुमचे वजन 100% कमी करण्यास मदत करणारी आहे. ही ट्रिक खूप काही वेगळी नाही तर आहे एक डिटॉक्स प्लॅन (Detox Plan). महिन्यातील कोणत्याही सलग तीन दिवसांची निवड करुन तुम्ही तुमचे शरीर डिटॉक्स करु शकता. तुम्ही कोणत्या लाँग टूरवरुन किंवा सणासुदीचे खूप गोडधोड खाऊन कंटाळला असाल आणि पुन्हा तुम्हाला तुमच्या फिटनेसकडे वळायचे असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी आहे सगळ्यात बेस्ट चला तर जाणून घेऊया कसा करायचा हा 3 दिवलांचा Detox Plan

असा करा तीन दिवसांचा Detox Plan

Instagram

अनेकदा वाढदिवस,सणासुदीच्या काळात आपलं खूप काही खाल्ल जातं. असे खाद्यपदार्थ टाळताही येत नाही. महिन्यातले हे सगळे दिवस झाले की, फक्त तीन दिवस तुम्हाला तुमच्या या Detox Plan साठी काढायचे आहेत. आता तीन दिवसात तुम्हाला काय करायचे आहे ते पाहूया. 

डिटॉक्स दिवस 1

Instagram

सकाळी उठल्या उठल्या तुम्ही एक ग्लास कोमट पाणी प्या. शक्य असेल आणि आवडत असेल तर जीरा-लिंबू पाणी, कोमट लिंबू पाणी, मेथी दाणा पाणी काहीही घ्या. 

सकाळचा नाश्ता:  आजच्या दिवशी तुम्हाला सॉलिड असं काही खायचं नाही त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त लिक्विड डाएटवर राहायचे आहे. त्यासाठी तुम्ही नाश्त्याला फळ किंवा फळांची स्मुदी पिऊ शकता. साधारण एक ग्लास स्मुदी तुम्ही नाश्त्याला घ्या. 

दुसरा नाश्ता: साधारण 11 वाजता तुम्हाला एखादे फळ किंवा मूठभर ड्रायफ्रुट्स खायचे आहेत. 

जेवण: आता तुम्हाला जेवणातही जास्तीत जास्त लिक्विड घ्यायचे आहे. त्यामुळे तुम्ही अशावेळी पुन्हा एकदा स्मुदी, भाताची पेज( पाणी जास्त भात कमी) किंवा एखादे फळ, ग्लासभर ताक खाल्ले तरी चालेल 

संध्याकाळचा नाश्ता :  संध्याकाळची भूकही फार महत्वाची असते त्याकडे दुर्लक्ष करु नका. वर्कआऊट करणे टाळा. पुन्हा एकदा एखादे फळ किंवा ड्रायफ्रुट खा. 

रात्रीचे जेवण: एखादे सूप, डाळीचे पाणी, सांबार, असे काहीही चालेल 

(पहिल्या दिवशी तुम्हाला थोडी भूक लागेल. पण तुम्ही अगदीच गळून पडणार नाही याची काळजी घेत राहा. व्यायाम अजिबात करु नका. कारण त्यामुळे तुमचे शरीर अधिक थकू शकते आणि तुम्हाला भूक लागू शकते.) 

वजन कमी करण्याआधी लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टी

डिटॉक्स दिवस 2

Instagram

काही जणांना डिटॉक्सचा दुसरा दिवस हा इतर दिवसांच्या तुलनेत फ्रेश वाटतो. पाण्याचे सेवन योग्य प्रमाणात केल्यामुळे पोटही साफ राहते. पोट साफ राहिल्यामुळे दिवस फ्रेश वाटतो. पण काहींना मात्र दुसऱ्याच दिवशी थकवा जाणवतो. 

सकाळपासून रात्रीपर्यंतचा तोच दिनक्रम तुम्हाला तसाच ठेवायचा आहे. आहारात तुम्हाला जास्तीत जास्त फळ, ताक, फळांचे रस, स्मुदी, सूप,ड्रायफ्रुट्स असेच घ्यायचे आहे. 

वजन कमी करायचं आहे मग नियमित खा ‘भाकरी’

डिटॉक्स दिवस 3

Instagram

 आजचा तिसरा आणि शेवटचा दिवस तुम्हाला थोडा जड वाटेल. पण तुम्ही तुमच्या भूकेवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवू शकाल. आज तुम्हाला खूप खायची इच्छा होत असली तरी तुम्हाला काही खाता येईलच असे नाही. त्यामुळे तुम्ही फळ, ताक, फळांचे रस, स्मुदी, सूप, नारळाचे पाणी, ड्रायफ्रुट्स असेच आहारात असू द्या. 

तीन दिवस पूर्ण केल्यानंतर चौथ्या दिवशी सकाळी तुमचे वजन तपासून पाहा तुम्हाला तुमच्या वजनामध्ये आणि तुमच्यामध्ये बराच फरक जाणवून येईल. डिटॉक्स हा एखाद्या उपवासाप्रमाणे आहे. पण उपवासामध्ये अनेकदा आपण कमी खायचं सोडून उपवासाचे जास्त पदार्थ खातो. त्यामुळे एकदशी दुप्पट खाशी म्हणतात ते काही खोटे नाही.म्हणूनच महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा असे तीन दिवस डिटॉक्स करायला काहीच हरकत नाही. 

उन्हाळ्यात वेटलॉस करणे खरचं असते का सोपे?, जाणून घ्या कारण

Read More From Fitness