शेतकरी आपल्या शेताची आधी मशागत करतो. मग योग्य वेळी त्यात बीजं पेरतो. पेरलेलं व्यवस्थित उगवतं आहे की नाही हे बघतो. त्यानंतर जे उगवलं आहे, त्याची वाढ व्यवस्थित आहे की नाही हे बघतो. एवढं सगळं केल्यानंतर मग त्याला त्याचं फळ मिळतं. 2018 वर्ष हे कुंभ राशीच्या लोकांसाठी असंच होतं. फळ मिळण्यापर्यंत सर्व गोष्टी आपण केलेल्या आहेतच. आता त्याची काळजी घ्या. कारण 2019 हे नववर्ष कुंभ राशीसाठी फळ देणारं वर्ष आहे. आधी घेतलेल्या परिश्रमाचं मोल तुम्हाला मिळणार आहे. तरी थोडी सावधानता बाळगावीच लागणार आहे. मात्र त्यानंतरही तुमचे ग्रहमान लाभदायकच ठरणार आहेत. चला तर मग 2019 हे नववर्ष कुंभ राशीसाठी कसं असेल याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया…
सर्वात आधी कुंभ राशीचे गुण-दोष आणि स्वभाव वैशिष्ट्यांविषयी जाणून घेऊया.
कुंभ राशी ही बौद्धीक राशी म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच या राशीचे लोक हे बुद्धिजीवी म्हणून ओळखले जातात. या राशीला सिद्धीचा वरदहस्त प्राप्त आहे. कुंभ राशीचे लोक जी इच्छा बाळगतात ती पूर्ण करण्याची शक्तीही त्याच्यामध्ये असते. महत्त्वाचे म्हणजे आजच्या आधुनिक युगानुसार विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधक वृत्ती या राशीच्या लोकांमध्ये असतेच. मात्र त्याबरोबरच हे लोक आध्यात्मिक गोष्टींमध्येही तितकेच रममाण होतात. पाण्याचा घडा घेतलेला पुरुष हे राशीचे प्रतिक असून राशी स्वामी शनि महाराज आहेत. कुशाग्र बुद्धी, उत्तम स्मरणशक्ती, स्थिर आणि कल्पक वृत्ती, संवेदनशील, गूढशास्त्र, मानसशास्त्र यांची आवड असणारे हे लोक असतात. त्यांच्या अंगी आत्मविश्वास तर असतोच सोबतच कमालीची सोशिकताही असते. चिकटपणा, निराशावादी आणि कठोरवृत्ती हे या राशीचे दोष आहेत.
वार्षिक भविष्य 2019 सिंह (Leo) राशी : नवीन वर्षात कभी खुशी कभी गम
या वर्षी उजळणार भाग्य
2019 या नववर्षात कुंभ राशीचे स्वामी असलेले शनि महाराज लाभस्थानातून तुमच्यासाठी प्रगतीचे दार उघडत आहेत. नोकरी, व्यवसाय, बँकिंग, फायनान्स अशा सर्व क्षेत्रांमध्ये तुम्हाला भरभरुन यश मिळणार आहे. त्यामुळे योग्य परिश्रम घेऊन शक्य तेवढे पदरात पाडून घ्या. दुसरीकडे तुमचा कर्माधिपती धनात व धनाधिपती कर्मात परिवर्तन आणि नवपंचम योग निर्माण करुन एक सुंदर राजयोग निर्माण करत आहेत. हे सर्व कमी की काय तर भाग्येश, धनेश आणि लाभेष यांची शुक्र व गुरु युती 2019 या नववर्षातील तुमच्या यशाचा शंखनाद करत आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणजे कौटुंबिक, आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक, संपत्ती जमा करणे, गुंतवणूक करणे आदी सर्व आघाड्यांवर तुम्ही बाजी मारणार आहात. सर्वच गोष्टींमध्ये तुमचं भाग्य उजळून निघणार आहे.
वार्षिक भविष्य तूळ (Libra) राशी : फक्त जून ते ऑगस्ट काळजी घ्या, बाकी वर्ष तुमचंच
दि. 15 एप्रिल 2019 ला कुंभ लग्नाचा राजयोगकारक असलेला ग्रह शुक्र तुमच्या धनस्थानात उच्चीचा होणार आहे. त्यामळे परदेशगमनाची संधी, विशेष असा आर्थिक लाभ तुम्हाला प्राप्त होण्याचे योग आहेत.
इतकं सगळं छान सुरु असलं तरी दि. 6 मार्च 2019 ला राहू तुमच्या पंचमात येणार आहे.
दि. 7 मे 2019 ला पंचमात मंगळ आणि राहू यांचा अंगारक दोष तर शनि व केतू यांचा जडत्व दोष निर्माण होईल. त्याचे विपरीत परिणाम तुमच्यावर होऊ शकतात. म्हणून सावधानता बाळगावी. याशिवाय पंचम आणि लाभातून होणारा शनि व मंगळ प्रतियोग अचानकपणे तुमच्या समोर संकट उभे करु शकतात. म्हणून या काळात तुम्ही पाऊले अधिक जबाबदारीने व काळजीपूर्वक उचलण्याची गरज आहे. या कालखंडात सर्वात महत्त्वाचे म्हणजे कौटुंबिक काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. विशेषकरुन जोडीदाराशी संबंध बिघडणार नाही, शब्दाने शब्द किंवा भांड्याला भांडं लागणार नाही याची विशेष काळजी आपण घ्यायची आहे. संबंध बिघडलेले असतील तर समजुतदारीने पूर्वपदावर आणणेच तुमच्यासाठी हितकारक ठरणार आहे. तसे केलं नाही तर दि. 22 जून 2019 रोजी मंगळ कर्केत गेल्यावर घटस्फोटासारखी परिस्थिती आपल्या आयुष्यात निर्माण होऊ शकते.
वार्षिक भविष्य कर्क (Cancer)राशी : नववर्षात गतवर्षाच्या संघर्षाची फळे मिळतील पण काळजी घेतली तर…
दि. 9 सप्टेंबर 2019 ला कन्या राशीत निचीचा होणारा शुक्र आगीत तेल ओतण्याचं काम करु शकतो. या प्रसंगी अचानक उभे राहणारे खर्च तुम्हाला विचलित करु शकतात.
परंतू दि. 3 ऑक्टोबर 2019 ला पुन्हा ग्रहस्थिती तुम्हाला मदतरुप होणार आहे. कारण या दिवसापासून तुमचा भाग्येश भाग्यात प्रवेश करणार आहे.
दि. 5 नोव्हेंबर 2019 ला गुरु बदल होऊन तुम्हाला अकरावा होणार आहे. त्यामुळे येथून पुढे सगळे शुभ संकेत तुम्हाला प्राप्त होणार आहे.
कुंभ राशीसाठी 2019 या नववर्षातील ग्रहमान बघता मधला काही कालखंड सोडला तर आनंदी आनंदच भरलेला आहे. सोबतच मिळणारे यश तो आनंद द्विगुणीत करणार आहे. जसं पेराल तसंच उगवतं. म्हणून 2018 मध्ये तुम्ही जे पेरलं आहे, त्याची फळे तुम्हाला 2019 या नववर्षात मिळणार आहेत. त्या फळांचा स्वीकार करण्यासाठी तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा!
शुभं भवतू|
लेखिका : श्री ज्योतिष संशोधन केंद्र
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje