DIY लाईफ हॅक्स

बेडरूम आकर्षक बनविण्यासाठी करा या गोष्टींचा वापर, सोप्या टिप्स

Dipali Naphade  |  Oct 26, 2020
बेडरूम आकर्षक बनविण्यासाठी करा या गोष्टींचा वापर, सोप्या टिप्स

घर सजविण्यासाठी केवळ हॉल अथवा स्वयंपाकघर या दोनच रूम्सकडे लक्ष द्यायचे नसते तर जिथे आपली खासगी जागा असते अर्थात बेडरून याकडे जास्त लक्ष द्यायला हवे. बेडरूम ही तुमची खासगी जागा असते. इथे अर्थात खूपच कमी लोकांना येण्याची परवानगी असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या कम्फर्टची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. बेडरूम आकर्षक करण्यासाठी नक्की काय काय करायला हवे यापेक्षाही अधिक तुम्हाला इथे व्यवस्थित आराम मिळायला हवा आणि तुमच्या आवडीच्या गोष्टी इथे असायला हव्यात. या ठिकाणी आपण जास्त वेळ राहतो त्यामुळे बेडरूममध्ये सकारात्मक एनर्जी वाटायला हवी. त्यामुळे अगदी आवश्यक तेच सामान बेडरूममध्ये असावे. पसारा असू नये. त्यामुळे बेडरूम अधिक आकर्षक करायची असेल तर तुम्हाला काही टिप्स आम्ही या लेखातून  देत  आहोत. फर्निचरसह 5 अशा गोष्टी ज्या बेडरूममध्ये असायलाच हव्यात. 

1. कारपेट अथवा गालिचा

Shutterstock

https://marathi.popxo.com/article/how-to-reuse-old-carpet-tips-in-marathi

बऱ्याच घरांमध्ये कारपेट अथवा गालिचाची काय गरज आहे असं म्हणून नजरअंदाज केले जाते. पण कारपेट अथवा गालिचा हा तुमच्या बेडरूमच शोभा आणि स्टाईल वाढवतो. तसंच जमिनीपेक्षा कारपेट अथवा गालिचा असेल तर तुम्ही पटकन त्यावर बसू शकता आणि तुम्हाला कम्फर्टेबलही वाटते. तुमच्या बेडरूमच्या सामानानुसार हा गालिचा तुम्ही घालावा. कोणत्याही बोल्ड पॅटर्नचा साधारण असावा. कारण असे केल्यास बेडरूम अधिक ब्राईट दिसते. तुमच्या बेडरूममधील फर्निचर गडद रंगाचे असेल तर कारपेट अथवा गालिचा लाईट रंगाचा ठेवा. त्यामुळे बेडरूममध्ये अधिक जागा आहे अर्थात बेडरूम मोठी आहे असे वाटेल. ही लहानशी ट्रिक बेडरूमची आवश्यकता नक्कीच पूर्ण करू शकते आणि तुमचे बेडरूम अधिक आकर्षक दिसू शकते. अगदी 500 रूपयांपासून तुम्हाला गालिचा अथवा कारपेट मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे खरेदी करू शकता.

https://marathi.popxo.com/article/how-to-keep-clean-and-stylish-home-library-in-marathi

2. उत्कृष्ट लाईट्स

Shutterstock

बेडरूममध्ये लायटिंग योग्य असेल तर तुमच्या मनालाही आल्हाददायक वाटते. हिवाळ्यात उन्हाने शेकणं असो अथवा रात्रीच्या वेळी आरामात आपल्या बेडवर बसून वाचणं असो या गोष्टींना प्राधान्य देता यायला हवं. म्हणजेच दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी व्यवस्थित प्रकाश घरात यायला हवा. केवळ बल्ब आणि ट्यूबलाईट्सने काम हो नाही. बेडरूममध्ये नैसर्गिक प्रकाशाचीही तितकीच गरज असते. तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये बेडच्या वर लहानसे दिवेही लाऊन घेऊ शकता. वाचताना अथवा काही काम करताना तुम्हाला याचा उपयोग होईल. तसंच कपाटांमध्येही लाईट्सची व्यवस्था हवी. जेणेकरून रात्री अचानक काही लागलं तर मोठा लाईट लावायची गरज भासणार नाही. अशा आयडिया करून तुम्ही तुमचे बेडरूम अधिक आकर्षक करू शकता. 

 

3. योग्य गादी

Shutterstock

https://marathi.popxo.com/article/how-to-make-home-smart-what-is-smart-home-in-marathi

तुम्ही दिवसभर थकून आल्यानंतर ज्या गादीवर झोपणार ती गादी आरामदायी आणि पाठीला आराम देणारी असावी.  तसंच तुम्ही पांघरणारे पांघरूणही तितकेच व्यवस्थित आणि आरामदायी हवे.  नरम आणि ऑर्गेनिक कपडे अर्थात कॉटन, लिनन यासह व्यवस्थित झोप लागू शकते. तसंच यामुळे शरीरालाही व्यवस्थित आराम मिळतो. मॅट्रेस योग्य आहे की नाही याची शहानिशा  करूनच घ्या.  तुम्हाला हवं तर एकदाच थोडा जास्त खर्च करून तुम्ही सिल्कची चादर अथवा बेडशीट आणू शकता. जे तुम्हाला अतिशय चांगले फील देते. 

 

4. सामान ठेवण्याची जागा

बेडरूम अतिशय स्वच्छ आणि सुंदर असेल तर तुम्हाला आल्यानंतर चांगले वाटते. व्यवस्थित ऑर्गनाईज केलेली बेडरूम बघायलाही छान वाटते.  त्यामुळे जितकं आवश्यक असेल तितकंच सामान तुम्ही बेडरूममध्ये ठेवा. कपडे, पुस्तकं, बाकी सामान सर्व काही नक्की कुठे ठेवायचं आहे याचे आधीच प्लॅनिंग करून घ्या. बेडरूम सजवताना स्टोरेजकडे नीट लक्ष द्या. कपाट, रॅक बेडरूममध्ये असणं नक्कीच चांगलं आहे. पण त्याची योजना नीट असायला हवी.  बेडरूममध्ये पसारा आहे असं वाटू नये याची काळजी घ्या.  तुम्हाला हवं  तर तुम्ही फोल्डेबल फर्निचरही करून घेऊ शकता. यामुळे जागाही राहते आणि स्टाईलही दिसून  येते.  

 

5. खासगी गोष्टी

Shutterstock

फोटो फ्रेम्स, आवडत्या गोष्टी, आर्ट या सगळ्या गोष्टींचा भरणा आपल्याकडे बेडरूममध्ये असतो. तुम्ही या नीट योजनाबद्धरित्या ठेवा. या गोष्टी असायलाच हव्यात.  कारण दिवसभर कामातून आल्यानंतर आपल्या आठवणींमध्ये आपल्याला रमता येतं.  समोर पटकन आपल्या आवडत्या व्यक्तीचा फोटो पाहून बरं वाटतं. बेडरूम हा केवळ झोपण्याचा नाही तर आपल्या खासगी आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे अधिकाधिक आकर्षक बनविण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. तसंच बेडरूमसाठी वास्तु टिप्सचा वापरही नक्की करून पाहा. 

Read More From DIY लाईफ हॅक्स