बॉलीवूड

वेबसिरीजचे चाहते असाल तर या 5 वेबसिरीज तुम्ही पाहिल्यात का?

Leenal Gawade  |  Aug 8, 2019
वेबसिरीजचे चाहते असाल तर या 5 वेबसिरीज तुम्ही पाहिल्यात का?

हल्ली कुठेही बघा लोकांच्या हातात फोन आणि कानात हेडफोन घातलेले असतात. फोन आडवा पकडला असेल तर समजून जायचं की, लोक एकतर वेबसिरीज किंवा एखादा चित्रपट पाहत आहेत. पण आता या चित्रपट मोबाईलमध्ये पाहण्याचे प्रमाण कमी होऊन वेबसिरीज पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. वेगवेगळ्या विषयाच्या आणि काहीतरी ढासू असलेल्या वेबसिरीज पाहायला लोकांना हल्ली फारच आवडते. नेटफ्लिक्स, हॉट स्टार, अमेझॉन, बालाजी, zee5 अशा कित्येक प्लॅटफॉर्मवर या वेबसिरीज लागतात. तुम्ही देखील अशाच प्रकारे वेबसिरीजचे चाहते असाल तर तुम्ही या 5 वेबसिरीज अजिबात मिस करायला नको… तुम्ही या पाहिल्या नसतील तर एक वेगळा अनुभव घेण्यासाठी या 5 भारतीय वेबसिरीज नक्की पाहा.

वेबसिरीज आल्या तरी या 5 जुन्या मालिका अजूनही हव्याहव्याशा

Laila ( लैला)

Instagram

‘लैला’ या वेबसिरीजच्या जगात हुमा कुरेशीने एंट्री केली. ‘लैला’ ही एक वेगळ्यात आशयाची मालिका आहे. पुढील काळात पाण्याचे होणारे दुर्भिक्ष आणि धर्माचे होणारे राजकारण यात दाखवण्यात आले आहे. (आता तुम्ही जर एखाद्या धर्माचा विचार करुन ही मालिका पाहाल तर तुम्हाला ती आवडणार नाही) या धर्माच्या नावाखाली आई आणि मुलीचे वेगळे होणे. त्या आईचा मुलीला शोधण्याचा लढा. तिला शोधण्यासाठी होणारा त्रास आणि ज्यामुळे हे सगळे होते तो तिला मिळतोसुद्धा पण या ठिकाणीच पहिल्या भागाचा शेवट होतो. ही मालिका पाहिल्यानंतर पुढे काय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल. शिवाय पुढे खरचं असं होईल का? असा एक प्रश्नही पडतो. 

सिटी ऑफ ड्रिम्स (City of dreams)

Instagram

मुंबई ही मायानगरी आहे. तिच्यावर राज्य गाजवणे कोणाला आवडणार नाही . अशाच आशयाची ही मालिका आहे. राजकारणाशी निगडीत अशी ही मालिका असून प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका यात आहे. मुंबईतील एका मोठ्या राजकारणीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार यावर हा वाद सुरु होतो. घरातील धाकटा मुलगा हे पद सांभाळण्याच्या लायक नसतो. पण मुलगी असते. पण मुलीला हक्क दिला जात नाही. त्यामुळे मुलीचा हे पद मिळण्याचा लढा तिच्या बळावर सुरु होतो. हे मिळवण्यासाठी तिला काय करावे लागते हे सांगणारी ही वेबसिरीज आहे.( ही मालिका प्रिया बापटच्या त्या लेसबियन सीनमुळे फारच प्रसिद्ध झाली.

टेलीव्हिजनवर पुन्हा सुरू होणार ‘हम पांच’ हिंदी मालिका

सेक्रेड गेम्स (Sacred games)

Instagram

सेक्रेड गेम्ल ही वेबसिरीज पाहिली नसेल असे कदाचित फारच कमी लोकं असतील. कारण ही मालिका फारच गाजली. नवाझुद्दीन सिद्दकी, सैफ अली खान, जितेंद्र जोशी, राधिका आपटे असे काही चेहरे या वेबसिरीजमध्ये आहेत.ही वेबसिरीज तुम्ही पाहायला घेतल्यानंतर थांबणारच नाही. मुंबईत कामासाठी आलेला गणेश गायतोंडे मुंबईवर राज्य करु पाहतो.तो सगळं मिळवतो. पण आता त्याच्या मनात काय आहे? या मायानगरीला कोणापासून  धोका आहे. हे तो सैफ अली खानला सांगतो. पण एका कोड्याच्या स्वरुपात. येत्या 15 ऑगस्टला या मालिकेचा दुसरा सीझन येणार आहे. 

हॉस्टेजेस (Hostages)

Instagram

हॉटस्टारवरील ही वेबसिरीज खूपच चांगली होती. म्हणजे एका मोठ्या राजकारणीला मारुन टाकण्याची जबाबदारी एका डॉक्टरला देण्यात येते. तिने हे काम करावे यासाठी तिच्या घरातील लोकांना बंदी बनवण्यात येते. एका डॉक्टरचे मन कसे करायला धजावत नाही. पण या राजकारणीला समोरच्या व्यक्तीला का मारायचे आहे हे जेव्हा कळते तेव्हा मात्र ती तिचा निर्णय बदलते. पण ती काय निर्णय घेते. ती त्याला का मारते… नेमकं या मागचं कारण काय आहे याचा संपूर्ण उलगडा या सीझनमध्ये होत नाही. पण या वेबसिरीजचा दुसरा सीझन येण्याची अपेक्षा आहे.

म्हणून लोकांना आवडते ‘अग्गंबाई सासूबाई मालिका’

क्रिमिनल जस्टिस (Criminal justice)

Instagram

कोणताही गुन्हा केला नसताना केवळ मदतीचा हात पुढे करणारा एक तरुण खुनामध्ये कसा गोवला जातो हे सांगणारी ही वेबसिरीज आहे. हा तरुण अशा पेचात अडकतो की, तो निर्दोष असल्याचेही सिद्ध करणे कठीण जाते.त्यामुळे त्याला शिक्षा होते. त्याला ही शिक्षा मान्य नसते. पण तो निर्दोष असल्याचे सिद्ध होत नाही. शिवाय अगदीच मध्यमवर्गीय कुटुंबातील हा तरुण एका महिलेवर केवळ पैशांसाठी बलात्कार करु शकतो. असाच समज करुन त्याला शिक्षा देतात.त्याचे आयुष्य तर उद्धवस्त होतेच शिवाय त्याच्या कुटुंबाचे पण ही केस पुन्हा ओपन होते आणि मग काय होतं तेय या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. ही तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.

जर तुम्ही अजूनही कोणत्या वेबसिरीज पाहिल्या नसतील तर या मात्र आवर्जून पाहा.

Read More From बॉलीवूड