Acne

पिंपल्स आल्यानंतर कधीच करु नका या 5 चुका

Leenal Gawade  |  Jun 11, 2019
पिंपल्स आल्यानंतर कधीच करु नका या 5 चुका

चेहऱ्यावर पिंपल्स कायमच येत जात असतात. (काहींना हा त्रास नसेल तर फारच छान). पिंपल्स आल्यानंतर मात्र ते जाईपर्यंत अगदी कुठेच जावेसे वाटतं नाही. ज्या कशाचे पिंपल्स कमी होईल असे वाटते ते सगळे काही करुन पाहायला आपण अगदी तयारच असतो. पण हे सगळे करत असताना तुम्ही काही चुका देखील करता. या चुका तुम्ही पिंपल्स आल्यानंतर आवर्जून टाळायला हव्यात. वाचा तुम्ही तर करत नाहीत ना या 5 चुका

पिरेड्समध्ये तुम्ही करत नाहीत ना या 5 चुका

चूक 1: पिंपल्स फोडले की लवकर जातात 

ही अगदी पहिली चूक पिंपल्स आल्यानंतर केली जाते. पिंपल्समध्ये पू साचला असेल तर तो काढून टाकण्याची घाई अनेकांना असते. पण ते करताना ते त्यांच्या चेहऱ्यावर आणखी अन्याय करत असतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. कारण पिंपल्स फोडले की, त्यांचे डाग तुमच्या चेहऱ्यावर तसेच राहतात आणि ते जाता जाता नाकी नऊ येतात. त्यामुळे ही पहिली चुकी तुम्ही पिंपल्स आल्यानंतर टाळायला हवी.

*उदा. काही जण पिंपल्स फोडण्यासाठी पिनेचा आधार घेतात. त्यांना त्यावेळी पिंपल्स फोडणे आणि त्यातील गर दाबून काढणे अधिक सोयीचे वाटते. पण  त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला खड्डे पडू शकतात.

चूक 2:अघोरी उपाय करणे

जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स नसतील आणि तुम्हाला अचानक पिंपल्स आले तर मग तुम्हाला काय करु आणि काय नको असे होऊन जाते. पिंपल्समुळे तुमचा आत्मविश्वास कमी होणे समजू शकते. पण ते घालवण्यासाठी त्यावर अघोरी उपाय करणे हा एकमेव पर्याय नाही, नाही का?

*उदा. पिंपल्स लवकर घालवायचे असतील तर त्यावर लसूणीचा अर्क, हळद, दालचिनी लावा असे काही सल्ले दिले जातात. त्यामुळे तुम्हाला पिंपल्सचा अधिक त्रास होऊ शकतो. हे उपाय जरी त्यावरचे असले तरी ते नेहमीच चालतील असे सांगू शकत नाही. त्यामुळे असे उपाय न करणेच चांगले

तुमचे Smile खुलवणाऱ्या या उपचारपद्धती तुम्हाला माहीत आहेत का?

चूक 3: पिंपल्स लपवण्यासाठी मेकअप करणे

काहींना पिंपल्स आल्यानंतर इतका त्रास होतो की, त्यांना ते पिंपल्स लपवणेच जास्त सोयीस्कर वाटते म्हणूनच ते मेकअपची मदत घेऊन पिंपल्स लपवतात. पण असे पिंपल्स लपवल्याने ते तुम्हाला तात्पुरते समाधान देत असतील पण हा यावरचा कायमचा इलाज नाही. कारण पिंपल्स बरे होण्यासाठी तुमच्या चेहऱ्याला पुरेपूर ऑक्सिजन मिळणे गरजेचे असते. त्यामुळे या दिवसात तुमचा चेहरा जितका स्वच्छ आणि मोकळा राहील तितके चांगले.

चूक 4:  दुर्लक्ष करणे

काहींना पिंपल्स आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते. म्हणजे काहींना पिंपल्स आले तसे जातील असे वाटते म्हणून ते त्याकडे दुर्लक्ष करतात. ही सवय देखील चांगली नाही. त्यामुळे तुमच्या या त्रासावर कायमचा तोडगा निघू शकत नाही.

*उदा. जर तुम्हाला कायमच पिंपल्स येत असतील तर तुम्हाला काहीतरी त्रास असण्याची शक्यता आहे. जर तुम्ही योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार घेतले तर तुम्हाला त्याचा त्रास ही होणार नाही.

चूक 5: तेलकट पदार्थांचे  सेवन

चेहऱ्यावर पिंपल्स येणे म्हणजे तुमच्या त्वचेवरील तैलीय गुणधर्म वाढणे. त्यातच जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही हमखास तेलकट पदार्थांचे सेवन करणे टाळायला हवे. कारण या पदार्थांच्या अति सेवनामुळे तुमच्या त्वचेवर अधिक तेल येऊन तुम्हाला पिंपल्सचा त्रास अधिक होऊ शकतो. त्यामुळे या दिवसात तुम्ही तेलकट पदार्थांचे सेवन करणे टाळायलाच हवे. किमान काही कालावधीसाठी तरी तुम्हाला तुमच्या आहारात जास्त पाणी आणि फळं यांचा समावेश करायला हवा.

कानातील मळ असा काढत असाल तर आताच असे करणे थांबवा

वरील 5 चुका या सर्वसाधारणपणे सगळेच करतात. या चुका टाळता आल्या तर तुमचे पिंपल्स लवकर जातील. शिवाय तुम्हाला त्रासही होणार नाही.

तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:

चेहऱ्यांवरील मुरुमांपासून कशी होणार सुटका – घरगुती उपाय, आहार आणि बरंच काही

Read More From Acne