गॅजेट हे आता फक्त मुलांसाठीच राहिलेले नाही. मुलींनाही वेगवेगळे गॅजेट वापरायला आवडतात. पण गॅजेटबाबात मुली फारच सर्वसाधारण चुका करतात. म्हणजे या चुका त्यांच्या फोन, लॅपटॉप या बाबत असू शकतात. या चुका तुम्हीही करत असाल तर या सवयी आताच बदला आणि गॅजेटला थोडे ऑरगनाईज करायला घ्या म्हणजे तुम्हाला आपोआपच तुमचे गॅजेट आवडू लागतील.
तुमच्या मुलालाही आहे का मोबाईल बघत जेवण्याची सवय
चार्जिंग करणे
shutterstock
बाहेर जायचे असेल तर लगेचच आपण आपला फोन चार्ज करायला घेतो. फोनची बॅटरी कितीही चार्ज असली तरी फोन चार्ज करण्याची काहींना सवयच लागलेली असते. पण गॅजेटचा पहिला नियमच हा आहे की, तुम्ही तुमचा फोन अति चार्ज करु नका. तुम्ही फोन जास्त चार्ज कराल तितकेच त्याचे आयुष्य कमी होईल. त्यामुळे ज्यावेळी तुमची बॅटरी ज्यावेळी कमी होईल तेव्हाच फोन चार्ज करा. म्हणजे तुमचा फोन 60 टक्के चार्ज असेल अशावेळी तुम्ही तुमचा फोन चार्ज करण्याची गरज नसते. फोनची बॅटरी 20 खाली आल्यानंतरच तुम्ही तुमचा फोन चार्ज करा.
डेस्कटॉप भरुन ठेवणे
shutterstock
मुलींच्या लॅपटॉपचा डेस्कटॉप हा कायमच भरलेला असतो. तुम्हालाही अशी सवय असेल तर तुम्ही तुमचा डेस्कटॉप नेहमी स्वच्छ ठेवा. म्हणजे तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपवरील सगळ्या फाईल्स आत फोल्डरमध्ये ठेवायच्या आहेत. जर तुम्ही तुमचा डेस्कटॉप भरुन ठेवला तर तुमच्या लॅपटॉपचा स्पीड कमी होतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा लॅपटॉप चांगला चालावा असे वाटत असेल तर मग तुम्ही डेस्कटॉप स्वच्छ ठेवा.
घरातील कुबट वास दूर करण्यासाठी सोपे उपाय
अपडेट न करणे
shutterstock
प्रत्येक गॅजेटला अपडेटची गरज असते. तुमचा फोन चांगला चालावा म्हणूनच त्यामध्ये अपडेट नावाची प्रणाली असते. त्यामुळे तुम्ही फोन किंवा तुमचा लॅपटॉप किंवा कोणतेही गॅजेट अपडेट करायला कधीच विसरु नका. तुम्ही तुमचा फोन योग्य वेळी अपडेट करा. त्यामुळे तुमचा फोन चांगला चालतो.
नको असलेल्या फाईल्स ठेवणे
shutterstock
मुलींना दुसरी घाणेरडी सवय असते ती म्हणजे त्यांच्या नको असलेल्या फाईल्स, फोटो तशाच ठेवून देणे. ज्या प्रमाणे तुम्ही घरात पडून राहिलेल्या, वापरात नसलेल्या वस्तू फेकून देतो. अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचे गॅजेट स्वच्छ करावे लागते. म्हणजे नको असलेल्या फाईल्स तुम्हाला कायमच्या डिलीट करायच्या आहेत. जर तुम्ही नको असलेल्या फाईल्स तशाच ठेवून दिल्या तर तुमच्या फोनचा स्पीड कमी होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचे नको असलेले फोटो आणि व्हिडिओ डिलीट करा.
गॅजेटकडे लक्ष न देणे
shutterstock
गॅजेटची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते. मोबाईल कव्हर, तुमच्या हेडफोन्सचे पाऊच, लॅपटॉप स्क्रिन, हेडफोन्स स्वच्छ करा. तुम्ही तुमचे गॅजेट वेळच्यावेळी स्वच्छ कराल तर तुम्हाला त्याचा काही त्रासही होणार नाही. उदा. जर तुमच्या फोनच्या स्क्रिनला किंवा लॅपटॉपला स्क्रिनगार्ड असेल तर त्याची काळजी तुम्ही घ्यायला हवी.
त्यामुळे आता जर तुम्ही या 5 चुका करत असाल तर आताच या चुका टाळा.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.