सध्या अनेक जण कोरोनामुळे घरातूनच काम करत आहेत. पण यामुळे सर्वात जास्त फटका बसतोय तो म्हणजे पाठीला. वर्क फ्रॉम होम (Work From Home) एक प्रकारे तापच झाला आहे. घरात सतत बसून काम केल्याने आणि सतत कामाचा ताण असल्याने अनेकांना पाठदुखीचा त्रास उद्भवला आहे. इतकंच नाही पाठीची आणि त्याचबरोबर मानेच्या दुखण्याची समस्याही उद्भवली आहे. दिवसभर लॅपटॉपची स्क्रिन पाहणं आणि आधाराशिवाय बसल्यामुळे ही समस्या आता अगदीच सामाईक झाली आहे. तुम्हाला यातून सुटका हवी असेल तर तुम्ही घरातच 5 सोपे व्यायाम प्रकार करून स्वतःची तब्बेत जपू शकता. घरात बसून सतत काम केल्याने होणारी ही पाठदुखी कमी करण्यासाठी या सोप्या व्यायाम प्रकारांचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल.
नेक रोल व्यायाम (Neck Roll Exercise)
नेक रोल व्यायाम अत्यंत सोपा आहे. यामुळे तुम्हाला जास्त मेहनतीची गरजही नाही. दिवसभर स्क्रिन पाहून आपण स्वतःला योग्य पोझिशनमध्ये ठेवत नाही. त्यामुळे पाठ आणि मानेमध्ये दुखणे उद्भवते. हे असंच चालू राहिलं तर मग डोकेदुखीचाही त्रास सुरू होतो. त्यामुळे सर्वात पहिले तुम्ही कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपची जागा योग्य ठिकाणी निश्चित करायला हवी. डोळ्यांच्या उंचीवर हे दोन्ही ठेवायला हवे. याशिवाय तुम्ही एक खास व्यायाम करू शकता.
व्यायामाची पद्धत –
हा अत्यंत सोपा व्यायाम प्रकार आहे. यासाठी तुम्ही मान खाली झुकवावी. त्यानंतर उजव्या आणि डाव्या बाजूला मागच्या बाजूला मान वळवावी. तुमच्यासाठी जितकं सोपं आहे तिथपर्यंतच मान न्यावी. आरामदायी वाटायला हवे इतकीच मान तुम्ही वळवा. असं तुम्ही 10 वेळा रोटेशनमध्ये करा. लक्षात ठेवा की, असं करताना तुमची पाठ सरळ हवी. एक फुल रोटेशन म्हणजे ज्या दिशेपासून तुम्ही सुरूवात केली आहे पुन्हा त्याच ठिकाणी मान परत आणणे.
अधिक वाचा – खुर्चीवर बसून करा व्यायाम आणि कमी करा वजन
खांदे पुढे आणि मागे करणे (Backward and Forward Shoulder)
तुम्ही जेव्हा दिवसभर टाईप करता तेव्हा तुम्हाला काही वेळात जाणवू लागते की खांद्यामधून कळा येत आहेत. त्यामुळे काम करताना खांद्यांनादेखील आराम मिळणे तितकेच गरजेचे आहे. तुम्ही कामाच्या मधून वेळ काढून मांडी घालून बसा आणि मग हा व्यायाम करा.
व्यायामाची पद्धत –
हा एक चांगला स्ट्रेचिंग व्यायाम आहे. तुम्ही खांद्यावर दोन्ही हात ठेवा आणि मग दोन्ही हात खांदा धरून ठेऊन हळूहळू फिरवा. यामुळे आखडलेले खांदे नीट व्हायला मदत होते. खांदे स्ट्रेच केल्याने तुम्हालादेखील खूप बरे वाटते. दिवसातून किमान दोन वेळातरी तुम्ही हा व्यायाम करा. 5 मिनिट्ससाठी हा व्यायाम करून तुम्हाला नक्कीच ताजेतवाने वाटेल.
चेस्ट ओपनर (Chest Opener)
हा असा व्यायाम आहे जो स्ट्रेच करण्यासाठी तुम्ही वापर करू शकता. हा छातीचा व्यायाम नसून यामुळे पाठीला अधिक आराम मिळतो. तुम्ही बसता तेव्हा तुमच्या फ्लॅक्सिबिलिटीसाठी अधिक चांगला आहे. याशिवाय खांद्यासाठीही चांगला ठरतो.
व्यायामाची पद्धत –
तुम्ही लोअर बॅकच्या मागे हाथ घ्या आणि छाती जितकी पुढे आणता येईल तितकी आणण्याचा प्रयत्न करा. इतकी छाती वर आणा जितकी तुम्ही घेऊ शकता. हा एक उत्तम स्ट्रेचिंग व्यायाम आहे, जो तुमच्या छातीला अधिक सुडौल बनवतो आणि तसंच तुमच्या पाठीची काळजीही घेतो. तुम्हाला हा व्यायाम करताना पाय चिकटून ठेऊ नका. तर पाय लांब करून हा व्यायाम करा.
अधिक वाचा – रोज केवळ 10 मिनिट्स करा सूर्यनमस्कार आणि मिळवा अद्भुत फायदे
स्पाईन ट्विस्ट (Spine Twist)
स्पाईन ट्विस्ट असा व्यायाम आहे ज्यामुळे कमरेला आराम मिळतो. तुम्ही हा व्यायाम बसून अथवा उभे राहूनही करू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लक्षात ठेवा की, या व्यायामामुळे स्पाईन सरळ होते. यामुळे पाठ सरळ राहू शकते.
व्यायामाची पद्धत –
तुम्ही हा व्यायाम बसून करत आहात तर तुम्ही मॅटवर बसा आणि त्यानंतर व्यायाम करा. त्यानंतर कंबर ट्विस्ट करण्याचा प्रयत्न करा. अर्थात एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे घेऊन जा. असं किमान 10 वेळा करा.
स्टँडिंग हॅमस्ट्रिंग स्ट्रेच (Standing Hamstring Stretch)
हा सर्वात सोपा स्ट्रेचिंग व्यायाम आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या पाठीवर लक्ष केंद्रित करावं लागेल. दिवसभर बसून बसून जर पाठ आखडली असेल तर हा व्यायाम उत्तम आहे.
तुम्हालाही रोज घरात काम करून त्रास होत असेल तर तुम्हीही हे सोपे व्यायाम प्रकार मधून मधून उठून करा. जेणेकरून तुमचा पाठीचा आणि मानेचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल.
अधिक वाचा – लग्न ठरल्यावर करा हे योग आणि व्हा अधिक बारीक आणि फिट
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक