मनोरंजन

6 बॉलीवूड कलाकार हॉलीवूड प्रोजेक्ट्समध्ये काम करण्यासाठी सज्ज

Dipali Naphade  |  Oct 18, 2021
bollywood stars

हॉलीवूडमध्ये (Hollywood) काम करणं हे नक्की प्रत्येक कलाकारांचं स्वप्नं असतं. अनेक भारतीय कलाकारांनी आतापर्यंत भारताचे नाव हॉलीवूडमध्ये गाजवले आहे. तर आता बॉलीवूड (Bollywood) आणि हॉलीवूडमधील दुरी अधिक प्रमाणात कमी होत असल्याचेही दिसून येत आहे. भारतीय सिनेमासाठी हे नक्कीच गर्वाचे आणि अभिमानाचे क्षण आहेत. बॉलीवूडमधील 6 कलाकार लवकरच हॉलीवूडच्या प्रोजेक्ट्समध्ये दिसून येणार आहेत. हे सर्व कलाकार आपल्या नव्या कामासाठी सज्ज आहेत. कोण आहेत हे कलाकार जाणून घेऊया. 

ह्रितिक रोशन

Instagram

सर्वात पहिले आपल्या बॉलीवूडचा ग्रीक गॉड (Greek God) अर्थात ऋतिक रोशन (Hrithik Roshan). हृतिक लवकरच एका जासूसी थ्रिलरमधून आपल्या हॉलीवूड पदार्पणासाठी तयार आहे. या वृत्ताने नक्कीच हृतिकच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हृतिक नेहमीच भारतीयांसाठी एका हॉलीवूड हिरोप्रमाणे दिसून आला आहे. त्याचे व्यक्तिमत्त्व अत्यंत उत्तम असून आता लवकरच तो हॉलीवूडपटातून दिसणार यासारखा दुसरा आनंद तो त्याच्या चाहत्यांसाठी नक्की काय असणार. त्यामुळे आता या चित्रपटाचं चित्रीकरण नक्की कुठे होणार आणि हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडेच सर्वाचं लक्ष लागून राहिले आहे. 

आलिया भट्ट

Instagram

दुसरे नाव आहे ते म्हणजे लाखों दिलों की धडकन आलिया भट (Alia Bhatt). नुकताच आलियाने विलियम मॉरिस एंडवॉरसाठी होकार दिला आहे. आलिया भटचे जगभरात अनेक चाहते आहेत. आलियाचे काम नेहमीच वाखाणले गेले आहे. त्यामुळे आता तिच्या प्रतिभेला आंतरराष्ट्रीय स्तरावरही काम करता येणार आहे. मात्र हॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी तिने नक्की कोणती भूमिका निवडली आहे याबाबतची माहिती अजूनही गुलदस्त्यातच आहे. पण आलियादेखील लवकरच हॉलीवूडमध्ये दिसणार आहे. 

सिकंदर खेर

Instagram

सिकंदर खेर (Sikandar Kher) देव पटेल दिग्दर्शित मंकी मॅन या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या प्रोजेक्टसाठी सिकंदर अत्यंत उत्साही असून लवकरच यासाठी काम करण्यास सुरूवात करणार आहे. सिकंदर खेर अत्यंत उत्तम अभिनेता असून अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. या चित्रपटातील त्याची नेमकी भूमिका काय असेल हे मात्र अजूनही कळलेले नाही. 

अधिक वाचा – या अभिनेत्रीने दिलाय मुलीला जन्म, एक वर्षानंतर चाहत्यांना कळले

धनुष

Instagram

दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार असणारा धनुष (Dhanush) लवकरच ‘द ग्रे मॅन’ या चित्रपटातून दिसून येणार आहे. अँथनी आणि जो रूसो (एव्हेंजर्स फेम) यांच्याद्वारे हा चित्रपट दिग्दर्शित करण्यात येणार असून हा चित्रपट मार्क ग्रेनीच्या पुस्तकावर आधारित अॅक्शन थ्रिलर असणार आहे. यामध्ये रयान गोसलिंग आणि क्रिस इव्हान्स यांच्याही भूमिका असतील. यापूर्वी रयान गोसलिंग याने साकारलेले पात्र धनुष साकारणार आहे अशी सध्या चर्चा आहे. मात्र नक्की कोणती भूमिका आहे हे जाहीर करण्यात आलेले नाही. 

कुब्रा सैट

Instagram

कुब्रा सैट (Kkubra Sait) ही एप्पल टीव्हीच्या आंतरराष्ट्रीय मेगा ओरिजिनल सीरीज फाऊंडेशनमध्ये अभिनय करण्यासाठी सज्ज आहे. ही सिरीज इस्साक असिमोवद्वारे लिखित पुस्तकांवर आधारित आहे. ही सिरीज डेविड एस गोयर आणि जोश फ्रिडमॅनद्वारे बनविण्यात आली आहे. कुब्रा सैटने प्लेनेट एनाक्रेनच्या एका ग्रँड हंट्रेस, फारा किनच्या भूमिकेसाठी तयारी केली आहे. सीरीजचा पहिला एपिसोड 24 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. 

अधिक वाचा – Bigg Boss Marathi : चावडीवर घेतली आदिश-मीराची शाळा, सुरेखा कुडची घराबाहेर

अली फज़ल

Instagram

अली फज़ल (Ali Fazal) हे नाव कोणाला माहीत नाही? याआधीदेखील अलीने हॉलीवूडमध्ये काम केले आहे. लवकरच हॉलीवूड फिल्म, डेथ ऑन द नाइलमध्ये अली दिसणार आहे. दिग्दर्शक केनेथ ब्रानघच्या मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेसवर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये गेल गॅडोट, आर्मी हॅमर, एनेट बेनिंग, रसेल ब्रांड, रोझ लेस्ली, लेटिसिया राइट आणि एम्मा मॅके यांनीदेखील काम केले आहे. 

त्यामुळे आपल्या बॉलीवूडमधील कलाकारांची पावले आता सीमा पार करत जगभरात उमटत आहेत असं म्हटलं तर नक्कीच वावगे ठरणार नाही. भारतीय कलाकार आपल्या अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत हे नक्की.  

अधिक वाचा – सांड की आंखच्या निर्मातीने 100 लीटर ब्रेस्ट मिल्क केलं अनाथ मुलांना दान

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन