Fitness

चुकूनही ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खाऊ नका, होतील दुष्परिणाम

Dipali Naphade  |  Sep 6, 2019
चुकूनही ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खाऊ नका, होतील दुष्परिणाम

आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना अन्न पुन्हा गरम करून खाण्याची सवय असते. प्रत्येक घरात असं केलंही जातं. पण तुम्हाला कल्पना आहे का? काही पदार्थ असे आहेत, जे पुन्हा गरम करून खाल्ल्यास, त्याचा आपल्या शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होत असतो. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. अन्न पुन्हा पुन्हा गरम केल्यास, त्यातील पोषक तत्व नाहीशी होतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण तरीही याबाबतीत लोक जागरूक होत नाहीत. यापैकी काही पदार्थ असेही आहेत जे पुन्हा गरम केल्यास, विषारी पदार्थ होतात. हे पदार्थ खाल्ल्याने कॅन्सरसारखे आजार होण्याची शक्यता वाढते. 

हे 6 पदार्थ जे कधीही पुन्हा गरम करून खाऊ नयेत (These Foods you Should Never Reheat)

तुम्ही ठेवलेलं अन्न पुन्हा गरम खात असाल तर हरकत नाही. पण तरीही काही असे पदार्थ आहेत जे पुन्हा गरम खाणं हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही पुन्हा गरम करून खाणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

मशरूम (Mushroom)

Shutterstock

मशरूम हे शिजल्या शिजल्या लगेच खायला हवेत असंच म्हटलं जातं. कारण मशरूम कापल्यानंतर एक तासाच्या आत त्यातील प्रोटीन कमी होऊ लागतं. त्यामुळे मशरूम कधीही पुन्हा गरम करून खाऊ नये. तसं केल्यास, तुम्हाला पोटदुखीचा त्रास सुरु होऊन तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे कधीही मशरूमची भाजी खाताना या गोष्टीची काळजी घ्यावी.

अंडं (EGG)

Shutterstock

तुम्हाला अंडी खायला आवडत असतील आणि तुमच्या रोजच्या डाएटमध्ये तुम्ही अंडी समाविष्ट करून घेतली असतील तर तुम्ही या गोष्टीचीदेखील काळजी घ्यायला हवी की, अंड्यापासून तयार करण्यात आलेला कोणताही पदार्थ तुम्ही पुन्हा गरम करून खाऊ नये. रिहिट केलेलं अंडं हे तुमच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. कारण पुन्हा गरम केल्यास, अंड्यातून टॉक्झिक रिलीज होतात आणि त्यामुळे अंडं पचण्यास त्रास होतो. 

पदार्थांचे असे ‘कॉम्बिनेशन’ आरोग्यासाठी ठरु शकते घातक

बटाटा (Potato)

Shutterstock

बटाटा तर सर्रास सगळ्यांच्या घरात बनणारी भाजी आहे. कोणतीही भाजी बटाट्याशिवाय तशी तर अपूर्णच आहे. पण शिजलेला बटाटा हा जास्त वेळ ठेवणं योग्य नाही. तसंच बटाटा पुन्हा गरम करून खाऊ नये. वास्तविक शिजलेला बटाटा जास्त वेळ ठेवल्यास आणि पुन्हा गरम करून खाल्ल्याने तुम्हाला पचनक्रियेसंबंधी तक्रार होऊ शकते. पोट जड होऊन पोटातही दुखू शकतं. 

चिकन (Chicken)

Shutterstock

चिकन हे प्रोटीनयुक्त असतं. पण कधीही चिकन पुन्हा गरम करून खाऊ नये. कारण तसं केल्यास, चिकनमध्ये असणारं प्रोटीनचं कम्पोझिशन पूर्णपणे बदलून जातं. त्यामुळे असं चिकन खाल्ल्यास, तुमची पचनक्रिया बिघडते आणि त्याशिवाय चिकन पचायलादेखील जड जातं. 

उपाशीपोटी ‘हे’ पदार्थ खाल्ले तर होऊ शकतो आरोग्यावर उलट परिणाम

भात (Rice)

Shutterstock

हे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. पण शिळा भात हा आरोग्यासाठी अजिबातच चांगला नाही. वास्तविक कच्च्या भातामध्ये जीवाणू असतात आणि शिजल्यानंतरही हे जीवाणू तसेच राहतात. जेव्हा आपण तांदूळ शिजवून रूम टेम्परेचरमध्ये ठेवतो तेव्हा या जीवाणूंचं रूपांतर हे बॅक्टेरियामध्ये होतं. त्यामुळे असा भात खाल्ल्यास तुम्हाला उल्टी अथवा जंतासारखे आजार होतात. 

पालक (Spinach)

Shutterstock

पालक आपल्या आरोग्यासाठी जितका हितकारक आहे तितकाच तो पुन्हा गरम केल्यास, नुकसानदायीदेखील आहे. पालक रिहीट केल्यास, कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. कारण त्यामध्ये असणारे नायट्रेट गरम केल्यानंतर हानिकारक तत्वात बदलतात. जे पुढे कॅन्सरसारखा आजार होण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे कधीही पालक पुन्हा गरम करून खाऊ नये.

शिळी पोळी खाल्ल्याने होतात फायदे, जाणून व्हाल हैराण

Read More From Fitness