Make Up Products

नव्यानेच लिपस्टीक लावणाऱ्यांसाठी लिपस्टीक गाईड (A Beginner’s Guide To Applying Lipstick In Marathi)

Aaditi Datar  |  Dec 19, 2018
नव्यानेच लिपस्टीक लावणाऱ्यांसाठी लिपस्टीक गाईड (A Beginner’s Guide To Applying Lipstick In Marathi)

जर तुम्ही कोणत्याही मुलीला विचारलंत की, तुझी मेकअपमधील फेव्हरेट वस्तू कोणती? तर पहिल्यांदा ती नक्कीच लिपस्टीक असं सांगेल. मला विचाराल तर, मला मेकअपची खूप आवड आहे असा प्रकार नाही. पण मी नेहमीच एखाद्या फंक्शन किंवा पार्टीला जाताना लिपस्टीक मात्र आवर्जून लावते. कारण नुसती लिपस्टीक लावल्यामुळे ही तुमच्या लुकमध्ये बराच फरक पडतो. पण तुम्हाला माहीत आहे का, हे एवढं साधं सोपं प्रकरण नाही. लिपस्टीक लावणं हे जरी सोपं वाटतं असलं तरी तुम्ही लिपस्टीक लावण्याआधी आणि लावल्यानंतर ठराविक काळजी घेणं महत्त्वाचं आहे. पण सर्वात आधी, आपण पाहूया की लिपस्टीक लावल्याने तुमच्या लुकमध्ये कसा फरक पडतो. जर तुम्हाला माहीत नसेल तर नक्की वाचा.

लिपस्टीक खूप छान दिसते

हायड्रेशन

तुमच्या ओठांना अधोरेखित करण्यासाठी

मॉईश्चराईज

लिपस्टीक वापरण्याचे फायदे (Benefits Of A Lipstick)

1. लिपस्टीक खूप छान दिसते (Lipstick Looks Good)

तुम्ही कोणत्याही प्रकारची लिपस्टीक वापरलीत तरी ती तुमच्या चेहऱ्याचा नूर बदलतेच. तुम्ही कॅज्युअलमध्ये असा किंवा हॉट पार्टी लुकमध्ये लिपस्टीकमुळे तुमच्या लुक अजूनच छान वाटू लागतो. विचार करा तुम्ही साधी जीन्स आणि टीशर्ट घातला आणि त्यावर जर लिपस्टीक ही अॅड केलीत तर लुकला चारचांद लागतात. तुम्हाला लगेच छान वाटते आणि आत्मविश्वास ही वाढतो. तुमचा लुकला अजून चांगलं करण्याचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे.  

तसेच चपळलेल्या ओठ कशामुळे होतात याबद्दल देखील वाचा

2. तुमच्या ओठांना निकोप बनवते (Heals Your Lips)

लिपस्टीकच्या आवरणामुळे तुमच्या ओठांचे धूळीपासून संरक्षण होते. तसंच फुटलेले ओठ ही बरे करते. जर तुम्ही इसेंन्शियल ऑईल असलेली लिपस्टीक निवडलीत तर तुमचे ओठ सुंदर होतील. बऱ्याचश्या लिपस्टीक्समध्ये इसेंन्शियल ऑईल्स असतात जे तुमच्या ओठांचं बदलत्या हवामानापासून आणि धूळीपासून रक्षण करतात. मग छान आणि सुंदर ठेवा तुमचे ओठ .

3. हायड्रेशन (Hydration)

जर तुम्ही तुमच्या ओठ्याचं नियमित हायड्रेशन करणं महत्त्वाचं आहे आणि नेहमीच्या घाईत आपण हे नेहमीच विसरतो. आधी सांगितल्याप्रमाणे लिपस्टीक्स या इन्सेंशियल ऑईलयुक्त असतात. ज्यामुळे तुमच्या ओठांची काळजी आपोआपच घेतली जाते. जर तुम्ही कधी लिपबाम न्यायला विसरलात आणि गरज पडली तर लिपस्टीकचा वापर केल्यास हरकत नाही.   


4. सनस्क्रीन (Sunscreen)

सूर्याच्या हानीकारक किरणांपासून जसं तुमच्या त्वचेचं रक्षण करता तसंच ओठांचे रक्षण करणेही महत्त्वाचे आहे. आपल्यापैकी बऱ्याचजणी त्वचेच्या काळजीकडे लक्ष देतात. पण ओठांकडे मात्र दुर्लक्ष करतात. लिपस्टीक लावल्यामुळे ना फक्त तुमचे ओठ चांगले राहतात, त्यासोबतच सूर्याच्या युव्ही किरणांपासूनही संरक्षण होते.

बीटरूट जूस बद्दल देखील वाचा

5. तुमच्या ओठांना अधोरेखित करण्यासाठी (Underline Your Lips)

विसरू नका लिपस्टीक लावल्याने तुमचे ओठ टवटवीत आणि भरलेले दिसतात. लिपस्टीक तुमच्या ओठांचे सौंदर्य निश्चितच वाढवते. कधीतरी लिप लाईनरचा वापर करून एखाद्या लाईट लिपस्टीक लावल्यास तुमचे ओठ खरंच सुंदर दिसतील.

6. ओठांसोबतच वाढते तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य (Enhances Your Eyes)

तुमच्या डोळ्यांपासून जरी ओठ वेगळे असले तरी ओठांवर लिपस्टीक लावल्यावर डोळ्यांच्या सौंदर्यात भर पडते. योग्य रंगाची लिपस्टीक लावल्यास तुमच्या डोळ्यांचा रंग खूलून दिसतो. ते टपोरे दिसू लागतात. म्हणजेच, लिपस्टीक लावल्याने तुमचे ईतर फिचर्ससुद्धा छान दिसतात. ज्यामुळे तुमची त्वचाही चमकदार दिसू लागेल.

7. तुम्ही दिसता सुंदर (It Makes You Feel Pretty)

बाकी काहीही असो लिपस्टीक लावल्याने तुम्ही सुंदर दिसता आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो. ज्या महिला लिपस्टीक लावतात त्यांना लिपस्टीक लावल्यानंतर एका क्षणात कॉन्फिडंट वाटतं.

8. इतर आरोग्यदायी गोष्टी (Other Health Benefits)

लिपस्टीक लावण्याचे इतर फायद्यांमध्ये काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत. तुमच्या ओठांमध्ये त्वचेच्या तुलनेत हानीकारक सूर्यकिरणांपासून रक्षणासाठी कमी मेलनिन असतं. त्यामुळे त्वचेशी निगडीत कोणताही आजार टाळण्यासाठी तुमच्या ओठांची काळजी घेणे फार गरजेचं आहे. त्वचेचा कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी तुम्ही SPF 15 असलेली लिपस्टीक वापरा.

Also Read Causes Of Dry Lips In Marathi

लिपस्टीक फक्त लावण्यासाठी नाही… असं करा तुमच्या ओठांचं जतन (Ways To Apply Lipstick)

जशी तुम्ही स्वतःची काळजी घेता तशीच तुमच्या ओठांची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. रोज रात्री झोपताना काही गोष्टी करणं महत्त्वाचं आहे ज्यामुळे तुमच्या ओठांचे पापुद्रे सुटणार नाहीत.

ओठांची काळजी घेण्यासाठी या गोष्टी करा (How To Take Care Of Your Lips)

1. एक्सफॉलिएट (Exfoliate)

डेड स्कीन कुठेही निर्माण होऊ शकते अगदी तुमच्या ओठांवरसुद्धा. त्यामुळे नियमितपणे तुमच्या ओठांचं एक्सफॉलिएशन करणं महत्त्वाचं आहे. ज्यामुळे तुमच्या ओठांवर डेड स्कीन निर्माण होणार नाही. यासाठी तुम्ही लिप स्क्रबचा वापर करू शकता. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्कीन निघेल आणि हे तुम्ही अगदी घरच्याघरी करू शकता.

लिप स्क्रब घरच्याघरी (Lip Scrub Homes)

थोडीशी साखर घ्या आणि तुमच्या ओठांवर चोळा. तुमच्या ओठांवरील डेड स्कीन निघेल. जर हे जास्त वाटत असेल तर टूथब्रशवर थोडीशी टूथपेस्ट घ्या आणि ओठांवर हळूवार ब्रश करा. यामुळे तुमच्या ओठांना फायदा होतो.

2. मॉईश्चराईज (Moisturise)

फक्त लिपस्टीक वापरणं पुरेसं नाही. त्यासोबतच नियमितपणे तुमच्या ओठांचं मॉईश्चरायजेशनसुद्धा होणं गरजेचं आहे. जर दिवसा तुम्हाला वेळ नसेल तर रात्री झोपताना आठवणीने तुमचा चेहरा धुवा आणि ओठांवर लिपबाम लावा. जर तुम्हाला चिकट लिपबाम आवडत नसेल ऑईलरहित लिपबाम वापरा. तुम्ही लिपबामऐवजी घरगुती गोष्टींचा ही लिपबाम म्हणून वापर करू शकता. माझी आजी नेहमी रात्री झोपताना ओठांना तूप लावायची. त्यामुळे तिचे ओठ कधीच फुटले नाहीत. तुम्हीही हे करून बघा. मला तर याचा खूप फायदा झाला. तुम्हालाही होईल.

हे तर काहीच नाही. ओठासंबंधीच्या खऱ्या गोष्टी पुढे आहेत.

लिपस्टीक कशी लावाल? (How To Apply Your Lipstick – A Step By Step Guide)
लिपस्टीक लावणं काय सोपं आहे, असं वाटत असलं तरी असं नाहीयं. या आहेत काही स्टेप्स ज्यामुळे तुमची लिपस्टीक जास्तीतजास्त वेळ तशीच राहील.

Step 1 – ओठ पुसून घ्या (Wipe Off Your Lips!)

हे फार महत्त्वाच आहे कारण तुमच्या ओठांवर आधीची कोणती शेड तर राहीली नाही ना. त्यामुळे तुमचे ओठ स्वच्छ पुसून घ्या आणि काळजी घ्या की त्यावर तेल तर राहीले नाही ना. लिपबाम किंवा आधीची लिपस्टीक शेड ओठांवर राहिल्याने तुमचे ओठांवर नवीन लिपस्टीक शेड जास्त वेळ राहात नाही.  

Step 2 – थोडंसं फाऊंडेशन लावा (Apply A Little Foundation)

हे वाचायला थोडं विचित्र वाटेल पण जर तुम्ही लिपस्टीक लावण्याआधी ओठांना थोडं फाऊंडेशन लावलं तर तुमची लिपस्टीक जास्त टीकेल. अगदी थोडं फाऊंडेशन घेऊन ते ब्रश किंवा बोटांनी तुमच्या ओठांवर लावा.

Step 3 – लिप लायनर लावा (Apply A Lip Liner)

लिप लायनरमुळे तुमची लिपस्टीक पसरत नाही आणि तुमच्या ओठांचा आकारही उठून दिसतो. ओठांच्या आऊटलाईनवर लिपस्टीक लावण्याआधी एखादे चांगले लिप लायनर लावा. लिप लायनर हे तुमच्या लिपस्टीकच्या शेडपेक्षा फिकट किंवा त्याच रंगाचे असावे. त्यामुळे लिप लायनरची ऑड वाटणार नाही.

Step 4 – लिपस्टीक लावा (Apply The Lipstick)
लिप लायनर लावल्यानंतर आता वेळ आहे लिपस्टीक लावण्याची. तुम्ही डायरेक्ट लिपस्टीक लावू शकता किंवा परफेक्शनसाठी ब्रशने ही लावू शकता. लिपस्टीक लावताना काळजी घ्या की ती लिप लायनरच्या बाहेर जाणार नाही. गरज असेल तर दुसरा कोट लावा.

Step 5 – कॉन्ट्यूर करा (Contour The Area Around)
जर तुम्ही परफेक्शनिस्ट आहात आणि तुमची लिपस्टीक अगदी फ्लॉलेस हवी असल्यास ओठांच्या आजूबाजूला थोडंसं फाऊंडेशन परफेक्ट लुकसाठी लावा.

Step 6 – फायनल टचेस् (Final Touches)
जर तुम्हाला सेकंड कोट लावायचा असल्यास त्याआधी थोडी पावडर लावा किंवा लिप ग्लॉस लावून तुमचा लुक लॉक करू शकता. लिप ग्लॉसने तुमच्या ओठांना पाऊट इफेक्ट येतो.

लिप कलरसाठी योग्य शेडची निवड (How To Pick The Right Shade Of Lip Colour)

आपण आधीही पाहिलं की, योग्य रंगाची लिपस्टीक लावल्याने तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य अजूनच खुलते. जर तुम्ही चुकीची शेड निवडली तर तुमचा लुक बिघडतो. योग्य शेड निवडण्यासंबंधी काही सूचना –

1. शेड निवडण्याआधी ओळखा तुमचा स्कीन टोन (Determine Your Skin Tone Before Picking A Shade)

तुम्ही कोणत्या कलरची लिपस्टीक लावायची हा पूर्णतः तुमचा चॉईस आहे. पण काही ठराविक प्रकारच्या शेड लावल्यास तुमचे व्यक्तीमत्व अगदी उठून दिसू शकते. अशा लिपस्टीक शेड्स ज्या तुमच्या चेहऱ्याच्या कांतीप्रमाणे (complexion) असतील. जसं फिकट गुलाबी, न्यूड, लाल इ.  

रोझ, चेरी आणि मॉव इ. शेड्स गोऱ्या रंगाच्या मुलींना छान दिसतात. सावळ्या रंगाच्या मुलींवर डार्क शेड्स म्हणजे लाल, क्रिमसन किंवा प्लम चांगल्या दिसतात.  

2. तुमच्या ओठांचा आकार ही महत्त्वाचा (The Shape Of Your Lips Matters)

जर तुम्ही गोंधळला आहात की, तुमच्या ओठांच्या आकारवर ही शेड अवलंबून आहे का, तर आम्ही आहोत ना मदतीला. ज्यांचे ओठ पातळ (thin) असतात, त्यांनी डार्क शेड्स टाळ्याव्यात. यामुळे तुमचे ओठ अजूनच पातळ वाटतील. क्रिमी किंवा ग्लॉसी शेड्स लावल्यास त्या तुमच्यावर छान दिसतील. दुसरीकडे, ज्यांचे ओठ जाड आहेत त्यांनी ग्लॉसी शेड्स टाळाव्यात.

3. छोट्या छोट्या गोष्टींकडे ही लक्ष द्या (Pay Attention To Details)

तुमच्या केसांचा रंग आणि दातांचा रंग हाही तुमच्या लिपस्टीकच्या शेडवर वेगळाच परिणाम करतो. आम्हाला चुकीचं समजू नका, पण काही शेड्स जर तुम्ही योग्य रित्या पेअर केल्या नाहीत तर खूप वाईट दिसतात. न्यूड शेड्समुळे तुमचे दात पिवळसर वाटतात.


4. चुकीच्या शेड्स फेकू देऊ नका (Don’t Throw Away Wrong Shades)

आपण सगळेच यातून गेलोय. जी शेड तुम्हाला दुकानात चांगली वाटली ती घरी आल्यावर वाटेलच असं नाही. पण थांबा. टाकू नका. तुम्ही वेगवेगळ्या शेड मिक्स आणि मॅच करून नवीन शेड बनवू शकता. असं केल्यावर तुमचे पैसे ही वाया जाणार नाहीत.

5. लिपस्टीक आणि काही मजेशीर ट्रेंड्स (Lipstick And Some Fun Trends)

ब्युटी इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच काळापासून लिपस्टीकबाबत अनेक एक्सपेरिमेंट्स सुरू आहेत. आम्ही त्यातील काही हटके पण प्रसिद्ध लिप ट्रेंडस निवडले आणि आम्हाला खात्री आहे की, तुम्हीही ते नक्की करून पाहाल.  लिपस्टीकसंबंधी काही मस्त हॅक्स ज्यासाठी तुम्ही आम्हाला थॅंक्यू म्हणाल (A few genius lipstick hacks that you will thank us for!)

1.जर तुमच्याकडे स्क्रब नसेल तर टूथब्रश किंवा मस्कारा ब्रशचा एक्सफॉलिएटसाठी वापर करा.
2.तुमची लिपस्टीक दाताला लागू नये यासाठी लिपस्टीक लावताना तुमच्या बोटांचा वापर करा.
3.तुम्ही तुमच्या लिपस्टीकचा ब्लश म्हणून पण वापर करू शकता.
4.एवढंच नाही तर आयशॅडोमध्ये लिप बाम किंवा व्हॅसलीन मिक्स करून लिपकलर म्हणूनही वापरू शकता.
5.तुमचं कन्सीलर आणि डार्क लिपस्टीक वापरून तुम्ही लाईट किंवा न्यूड शेड ही बनवू शकता.

6.तुमची लिपस्टीक जर मधूनच तुटली तर घाबरू नका. दिवसभर फ्रिझरमध्ये ठेवा ती आपोआप फिक्स होईल.
7.तुमच्या लिपस्टीक उन्हाळ्या विरघळू नये म्हणून फ्रिझमध्ये ठेवा.
8.तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही तुमच्या लाल किंवा ऑरेंज लिपस्टीकचा वापर कन्सीलर म्हणून ही करू शकता.
9.जर तुम्हाला पार्टीला जायचंय आणि अचानक आयशॅडो किंवा आयलायनर संपलं तर नो चिंता तुमच्या ब्राईट कलरच्या लिपस्टीकचा वापर करून पाहा.
10.तुमच्या लिपस्टीकला फुलर लुक देण्यासाठी ती नेहमी  ‘X’ आकारात लावा.

या टीप्समुळे तुम्हाला पुढच्या वेळी मेकअप करताना नक्कीच फायदा होईल. जर तुम्हाला वाटलं की अजून काही उपयोगी टीप्स राहील्या असतील. तर तुम्ही त्या आमच्याबरोबर नक्की शेअर करा. पुढच्या वेळी लिपस्टीक शॉपिंगला जाताना वरील मुद्दे नक्की लक्षात ठेवा. हॅपी शॉपिंग!

Read More From Make Up Products