DIY सौंदर्य

अशा प्रकारे घरातच सोप्या पद्धतीने बनवा फेस प्राइमर

Vaidehi Raje  |  Apr 8, 2022
homemade face primer

आपण जेव्हाही मेकअप करायला घेतो तेव्हा आपली पहिली स्टेप म्हणजे क्लिंझिंग असते. त्यानंतर आपण खऱ्या मेकअपची सुरुवात करायला घेतो तेव्हा सगळ्यात आधी प्राइमरच लावतो. मेकअप हिवाळ्यात करायचा असो की उन्हाळ्यात, हेवी करायचा असो की लाईट, अगदी न्यूड मेकअप लूक हवा असेल तरीही मेकअपची सुरुवात फेस प्राइमरनेच होते. प्राइमरमुळे केवळ तुमचा मेकअप दीर्घकाळ टिकत नाही तर मेकअपला एक स्मूथ लुक देखील येतो. तुम्हाला हेवी मेकअप करायचा असो की लाईट, फेस प्राइमर तुम्हाला सेलिब्रिटींसारखा परफेक्ट मेकअप लुक मिळवण्यात मदत करतो. साधारणपणे, बाजारात अनेक ब्रँडचे फेस प्राइमर्स उपलब्ध आहेत, जे बऱ्याचदा आपल्याला महाग वाटतात. अशा परिस्थितीत, ते खरेदी करताना आपण थोडा विचार करतो. परंतु परफेक्ट मेकअपसाठी प्राइमर वगळून चालत नाही. ते तर आवश्यकच आहे. अशा वेळी जर घरीच प्राइमर बनवता आले तर अनेकांना त्याचा फायदा होईल. म्हणूनच आज आपण बघणार आहोत घरातच सोप्या पद्धतीने प्राइमर कसे तयार करायचे. 

कोरफड वापरून बनवा फेस प्राइमर 

Homemade Face Primer

कोरफड आपल्या त्वचेसाठी किती फायदेशीर आहे हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. आपल्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये अनेकदा नैसर्गिक घटक असल्याचा दावा केला जातो. पण ते किती खरे आहे हे कळायला आपल्याकडे काही मार्ग नसतो. अशा वेळी आपण घरीच हे नैसर्गिक घटक वापरले तर आपली त्वचा तर निरोगी राहीलच आणि मेकअप प्रॉडक्ट्समुळे चेहऱ्याला काही त्रास होण्याची भीती आपल्याला राहणार नाही. कोरफड वापरून प्राइमर बनवण्यासाठी  2 चमचे कोरफडीचा गर आपल्या त्वचेसाठी योग्य असलेल्या मॉइश्चरायझरमध्ये समान प्रमाणात मिसळा. एक सॉफ्ट क्रीम किंवा जेल तयार होईपर्यंत ते चांगले मिसळा.  जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्यात विच हेझलचे एक किंवा दोन थेंब घाला जेणेकरुन त्वचेवर ब्रेकआउट आणि मुरुम येणार नाहीत. मेकअपला सुरुवात करताना या मिश्रणाचा पातळ थर तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि ते कोरडे होऊ द्या. या प्राइमरची लेयर एकदा व्यवस्थित सुकली की मग पुढचा मेकअप करायला घ्या. 

कोरफडीपासून प्राइमर बनवण्याची दुसरी पद्धत 

Homemade Face Primer

2 चमचे कोरफडीचा गर घ्या आणि त्यात 2 चमचे सनस्क्रीन मिसळा. नंतर त्यात तुमच्या त्वचेच्या रंगाशी मिळत्याजुळत्या शेडचे फाउंडेशन टाका आणि व्यवस्थित मिसळा. हे प्राइमर मेकअपसाठी चांगला बेस तयार करण्याव्यतिरिक्त तुमची त्वचा उन्हाळ्यात हायड्रेटेड ठेवेल आणि पोषण देखील देईल. हे प्राइमर तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे आणि ते उन्हापासून त्वचेचे संरक्षण देखील करू शकते. तसेच तुम्ही 2 चमचे एलोवेरा जेल एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून तुमच्या त्वचेसाठी होममेड प्राइमर बनवू शकता. या प्राइमरचा पातळ थर लावा व पुढचा मेकअप करण्याआधी ही लेयर व्यवस्थित सुकू द्या. तुमची त्वचा जर कोरडी असेल तर हिवाळ्यात तुम्ही या होममेड प्राइमरचा नक्कीच उपयोग करू शकता. ऑलिव्ह ऑईल आणि कोरफड हे दोन्ही नैसर्गिक पदार्थ त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. ऑलिव्ह ऑईलमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ई, ए, के आणि पॉलीफेनॉलमुळे त्वचेला पोषण मिळते आणि कोरफड ही व्हिटॅमिन बी, सी, ई आणि बीटा-कॅरोटीनचा एक उत्तम स्त्रोत आहे. 

ग्लिसरीन व पाणी वापरून झटपट बनवा प्राइमर 

ग्लिसरीन आणि पाण्याच्या मदतीने देखील अगदी झटपट  फेस प्राइमर तयार केला जाऊ शकतो. यासाठी एक चमचा ग्लिसरीनमध्ये 3 चमचे पाणी मिसळा आणि त्यात अर्धा टीस्पून मॉइश्चरायझर टाका व हे सगळे मिश्रण व्यवस्थित मिसळा. तुमचा फेस प्राइमर तयार आहे. तो एका स्प्रे बाटलीत भरा आणि मेकअपच्या आधी चेहेऱ्यावर स्प्रे करा व पुढचा मेकअप करण्यापूर्वी तो कोरडा होऊ द्या.

अशा प्रकारे तुम्ही घरीच उत्तम फेस प्राइमर बनवू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य