मधुमेह ही एक अशी समस्या आहे ज्यामुळे कितीतरी लोक ग्रस्त आहेत. अगदी तरूण वयापासून हा आजार हल्ली बऱ्याच जणांना होत आहे. आपली बदलती जीवनशैली आणि स्वतःकडे लक्ष देण्यासाठी न मिळणारा वेळ यामुळे हा आजार आता अगदी तरूणांनाही होऊ लागला आहे. यासाठी अनेक औषध आणि उपचार केले जातात. पण मधुमेहावर घरगुती उपाय आहे, ज्याचा उपयोग करून तुम्ही मधुमेहापासून दूर राहू शकता. तसंच याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होत नाही. मधुमेहासारख्या या आजारापासून दूर जाण्यासाठी तुम्ही अशा एका झाडाच्या पानाचा उपयोग करू शकता, जे खरं तर विषारी मानलं जातं. मात्र मधुमेहासाठी ते वरदान ठरतं. आक, अर्क अथवा मदार या नावाने ओळखल्या जाणाऱ्या झाडाची पानं मधुमेहाच्या आजारावर अत्यंत गुणकारी ठरतात. विषारी असूनही या झाडाच्या पानांमध्ये अनेक गुण आढळतात. या झाडाच्या फुलं आणि पानांचा वापर करून अस्थमा अर्थात दमा, मधुमेह (Diabetes), कुष्ठरोग आणि बद्धकोष्ठ यासारखे आजार दूर करण्यासाठी फायदा करून घेता येतो. तसंच त्वचेला येणारी अलर्जी अथवा खाज अशा समस्येपासूनही ही पानं आपल्याला सुटका मिळवून देतात. याचा वापर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना कसा करून घेता येतो ते आपण पाहूया.
पानांचा वापर कसा करावा
Shutterstock
या पानांचा वापर करण्याची विशिष्ट पद्धत आहे. ती तुम्हाला माहीत असायला हवी. तरच तुम्ही मधुमेहावर योग्य उपचार करू शकता. जाणून घेऊया आकची पाने कशी वापरावीत.
- याचा वापर करण्यापूर्वी तुम्ही एक आकचे पान घ्या आणि त्यावर असणारी हलकी लाकडी पत्ती कापून घ्या
- आता तुम्ही आकची पानाची जी बाजू आहे ती तुम्ही तळव्याला बांधा
- लक्षात ठेवा आकचे पान तुमच्या तळव्यावर टिकून राहायला हवे. त्यानुसार तुम्ही व्यवस्थित हे पान बांधा
- आकचे हे पान रात्रभर तुम्ही तळव्याला बांधून ठेवा आणि सकाळी हे उठल्यानंतर सर्वात पहिले हे पान काढा
- हा पानाचा प्रयोग तुम्ही नियमित 20 दिवस करा
- असं केल्याने तुमची मधुमेहाची समस्या दूर होण्यास मदत मिळते
मेथी दाण्याच्या पाण्याने मधुमेह येतो आटोक्यात, कसा कराल वापर
पायाला आलेली सूजही करते कमी
Shutterstock
बऱ्याचदा पायाला सूज येत असेल तर त्यावरही तुम्हाला आक अर्थात मदारच्या पानांचा उपयोग करून घेता येतो. ही मदारची पाने तुम्ही सूज आलेल्या ठिकाणी लावा. यामुळे सूज पटकन उतरण्यास मदत मिळते. एक मदारचा अर्थात आकचे पान घ्या. त्यावर तुम्ही मोहरीचे तेल गरम करून लावा आणि त्यानंतर हे पान सूज आलेल्या ठिकाणी लावा .तुम्हाला त्वरीत आराम मिळतो. दिवसातून तीन वेळा हा उपाय केल्यास सूज उतरण्यास मदत मिळते. आकच्या झाडाची पाने ही औषधीय असून अनेक आजरांवर याचा उपयोग करून घेता येतो. मात्र मधुमेहासाठी याचा अधिक उपयोग होतो. त्यामुळे तुम्हाला जर टाईप 2 मधुमेह असेल तर तुम्ही नक्की याचा वापर करून पाहा. याचे गुणधर्म तुम्हाला लवकरात लवकर मधुमेहापासून सुटका मिळवून देतील.
तुम्हालाही असतील ‘या’ सवयी तर होऊ शकतो मधुमेह
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक