आपल्याकडे कोणतंही नवीन काम सुरू करण्यापूर्वी सर्वात आधी गणपतीची आराधना करणं अनिवार्य मानलं जातं. धार्मिक मान्यतांनुसार बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्यचं दैवत असलेल्या श्री गणेशाच्या स्तुतीशिवाय कोणतीही पूजा, यज्ञ किंवा मंगलकार्य पूर्ण होत नाही. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचं मंगलपूर्ण वातावरण आहे.
या गणेशोत्सवाच्या मंगल पर्वात सर्व भक्त आपली इच्छा बाप्पांना सांगून इच्छापूर्ती करून घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. तुम्हालाही बाप्पाकडून तुमची मनोकामना पूर्ण करून घ्यायची असल्यास तुमच्या राशीनुसार सांगण्यात आलेला नेवैद्य बाप्पाला दाखवा.
- मेष- या राशीच्या भक्तांनी गणपती मंत्राचा जप करत खजूर आणि गूळापासून बनवलेले लाडू बाप्पाला नेवैद्यासाठी ठेवावेत.
- वृषभ- या राशीच्या भक्तांनी गणपतीच्या विनायक स्वरूपाची पूजा करत ॐ ह्रीं ग्रीं ह्रीं मंत्राचा जप केल्यास नक्कीच फायदा होईल. वृषभ राशीच्या भक्तांनी बाप्पाला प्रसाद म्हणून खडीसाखर आणि नारळापासून बनवलेले लाडू ठेवावेत.
- मिथुन- लक्ष्मी-गणेशाची एकत्र साधना करत या राशीच्या भक्तांनी नेवैद्य म्हणून बाप्पाला मूगाचे लाडू आणि लाल फुल अर्पण करावे.
- कर्क- या राशीच्या भक्तांनी एकदंताची प्रार्थना करत बाप्पाला मोदक, लाडू, लोणी किंवा खीरीचा नेवैद्य दाखवावा.
- सिंह- गणपतीने तुमची इच्छा पूर्ण करावी म्हणून या राशीच्या भक्तांनी खजूराचा नेवैद्य बाप्पा पुढे ठेवावा.
- कन्या- या राशीच्या भक्तांनी गणपती पूजेदरम्यान मूगाच्या डाळीचे लाडू बाप्पाला नेवैद्यात दाखवावे.
- तूळ – खडीसाखर, केळ आणि लाडू असा नेवैद्य तुम्ही बाप्पाला दाखवल्यास तुम्हाला नक्कीच लाभ होईल.
- वृश्चिक- या राशीच्या भक्तांनीही मेष राशीप्रमाणे खजूर आणि गूळापासून बनवलेले लाडू गणपतीला नेवैद्य म्हणून दाखवावे.
- धनू- मोदक किंवा केळ्याचा प्रसाद तुम्ही बाप्पापुढे ठेवल्यास तुम्हाला गणपती नक्की प्रसन्न होईल आणि लाभ होईल.
- मकर- या राशीच्या भक्तांनी प्रसाद किंवा नेवैद्य म्हणून गणपतीपुढे मोदक, मनुका, तिळाचे लाडू ठेवावेत. तुम्हाला नक्कीच लाभ होईल.
- कुंभ- कुंभ राशीच्या भक्तांनी प्रसादात गुळाचे लाडू किंवा एखादं हिरवं फळ बाप्पापुढे ठेवावं.
- मीन- या राशीच्या भक्तांनी सिद्धी विनायकाला प्रसाद म्हणून बेसनाचे लाडू, केळं आणि बदामाचा नेवैद्य दाखवावा.
तुमचाही राशींवर विश्वास असेल तर तुमच्या राशीनुसार सांगण्यात आलेला नेवैद्य बाप्पाला नक्की दाखवा आणि बाप्पाला प्रसन्न करून घ्या. गणपती बाप्पा मोरया.
हेही वाचा –
अष्टविनायकाची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्या
गणपतीसाठी वेगळ्या आणि सोप्या Modak Recipes
बाप्पाला वाहण्यात येणाऱ्या ‘दुर्वां’ना आहे खास आरोग्यदायी महत्त्व
जाणून घ्या घरातील देवपूजेची भांडी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत
Read More From Festival
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
150+ स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Independence Day Quotes In Marathi
Aaditi Datar