बॉलीवूड

वनसंवर्धनासाठी प्रभासने केली दोन कोटींची मदत, दत्तक घेतलं हे जंगल

Trupti Paradkar  |  Sep 8, 2020
वनसंवर्धनासाठी प्रभासने केली दोन कोटींची मदत, दत्तक घेतलं हे जंगल

चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता प्रभास सध्या खूप चर्चेत आहे. नुकतंच त्याने वनसंवर्धनासाठी घेतलेल्या एका अभिनव निर्णयामुळे सगळीकडून त्याचं कौतुक होत आहे. प्रभासने हैदराबादजवळील जवळजवळ 1650 एकर जंगलाचा भाग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी त्याने लागेल तितकी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. सध्या  त्याने यासाठी दोन कोटींची भरघोस मदत वनविभागाला केली आहे. हा विभाग संगारेड्डी जिल्ह्यातील ‘खाजिपल्ली’ ग्रामविभागातील आहे. या विभागात कोणत्याही सुखसुविधा नाहीत ज्यामुळे तो काहीसा दुर्लक्षित राहीला आहे. मात्र आता प्रभासने या विभागाला विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रभास खुद्द त्याच्या इन्स्टाग्राम वरून माहिती दिली आहे.

Instagram

प्रभास स्वतः जातीने लक्ष घालणार या प्रोजेक्टमध्ये

प्रभासने सोशल मीडियावरून “मी हैदराबादमधील काझिपल्ली राखीव वनविभाग दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, मी निसर्गप्रेमी असल्यामुळे मला या विभागाच्या विकासामुळे शहराला एक ‘लंग स्पेस’ मिळू शकेल असं वाटतं. यासाठी मी राज्यसभा खासदार संतोष कुमार यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे तेलंगणा सरकार आणि वनविभागाने मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचीही कृतज्ञता व्यक्त करतो” असं शेअर केलं आहे. प्रभासने सध्या या प्रोजेक्टवर पूर्ण फोकस केंद्रित केलं आहे. या कामाला वेग आणण्यासाठी तो राज्यसभा खासदार संतोष कुमार यांच्यासह खाजिपल्लीच्या या आरक्षित जंगलात स्वतः परिक्षणासाठी गेला होता. खासदारांनी ‘ग्रीन चॅलेंज’बद्दल सांगितल्यामुळे तो प्रभावित झाला आणि त्याने हा निर्णय घेतला. या प्रोजेक्टच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे फोटो व्हायरल झाले आहेत. प्रभासला या प्रोजेक्टमधून खाजिपल्ली आणि आसपासच्या सर्व गावांचा विकास करायचा आहे. ज्यामुळे या गावातील लोकांना एक सुंदर जीवन आणि आनंदी आयुष्य मिळू शकेल. तो इथे एक वन उद्यान सुरू करणार आहे. ज्यामुळे या आसपासच्या सर्व गावांना आणि शहरांना शुद्ध ऑक्सिजन मिळेल. या वनविभागाचे महत्त्व असे की या ठिकाणी अनेक दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पती आहेत. या उपक्रमामुळे देशभरात सुरु असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमालाही चालना मिळणार आहे. 

प्रभासच्या लोकप्रियतेत पडतेय दिवसेंदिवस भर

बाहुबलीच्या प्रसिद्धीनंतर प्रभासला बाहुबली याच नावाने ओळखलं जात आहे. लवकरच तो ओम राऊतच्या ‘आदिपुरूष’मध्ये दिसणार आहे. बाहुबलीनंतर प्रभासला आदिपुरूषमध्ये  पाहण्यासाठी चाहतेही खूपच उत्सुक आहेत. कारण या चित्रपटात प्रभास भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावण साकारणार असल्याने प्रभास आणि सैफची एक अनोखी जोडी प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळेल. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि विविध परदेशी भाषांमधून प्रदर्षित केला जाणार आहे. थोडक्यात 2022 चा हा एक बिग बजेट आणि बहुचर्चित चित्रपट असेल. त्याचप्रमाणे प्रभास ‘राधे श्याम’मध्येही पूजा हेगडेसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टरदेखील प्रदर्शित झाले आहे. हा चित्रपटदेखील हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रटात त्याच्यासोबत भाग्यश्री, मुरली शर्मा, सचिन खेडेकर, प्रियदर्शनी, साशा, कुणाल रॉय कपूर यांच्या भूमिका असतील.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

बॉलीवूड कलाकार ज्यांचे परदेशातही आहे स्वतःचे घर

टायगर सिंगर होतो तेव्हा.. या गाण्यातून पदार्पण

आदिपुरुषचा खलनायक असणार सैफ अली खान, साकारणार लंकेश

Read More From बॉलीवूड