बॉलीवूड कलाकार ज्यांचे परदेशातही आहे स्वतःचे घर

बॉलीवूड कलाकार ज्यांचे परदेशातही आहे स्वतःचे घर

बॉलीवूड सेलिब्रेटीज बऱ्याचवेळा परदेश दौऱ्यावरचे फोटो शेअर करतात. कधी कामाच्या निमित्ताने तर कधी सुट्टीसाठी परदेशी जाताना ते मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर आढतात. शूटिंगसाठीही बऱ्याचदा त्यांना परदेशात जावं लागतं. परदेशातील शहरं, तिकडची लाईफस्टाईल, फॅशन, हवामान याचा नेहमीच भारतीयांच्या मनावर प्रभाव पडत आला आहे. सहाजिकच परदेशात आपलंही एक सेकेंड होम असावं असं कुणालाही वाटू शकतं. बॉलीवूड सेलिब्रेटीजमध्ये असे अनेक आहेत कलाकार आहेत ज्यांनी परदेशात स्वतःचे घर घेतलेले आहे. 

अक्षय कुमार

अक्षय कुमार हा बॉलीवूडचा एक सर्वात श्रीमंत सेलिब्रेटी आहे. बॉलीवूडच्या या खिलाडीचे मुंबईत आलिशान तर घर आहेच पण त्याने कॅनडामधील टोरेंटोमध्येही एक सेंकेड होम घेतलेले आहे. अक्षयकडे कॅनडाची सिटिझनशिप आहे. तिकडे त्याने एक टेकडीच स्वतःच्या नावावर खरेदी केलेली आहे. या टेकडीवर त्याला भविष्यात स्वतःचे आलिशान घर बांधायचे असून त्याने या शहरात स्वतःची एक अपार्टमेंटही खरेदी केलेली आहे. 

Instagram

अभिषेक बच्चन -

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय बच्चन यांनीही दुबईमध्ये स्वतःसाठी एक प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे. दुबईच्या जुमेराह बिचवर असलेल्या बंगलो प्रोजेक्टमध्ये जगभरातील अनेक कलाकाराची घरे आहेत. या गल्फ इस्टेटमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याचा एक शाही बंगलाही आहे. एवढंच नाही तर अभिषेकचे वडील अमिताभ यांचे पॅरीसमध्ये घर आहे. अमिताभ यांनी हे घर खास त्यांची पत्नी जया बच्चन यांच्यासाठी घेतलेले आहे. थोडक्यात बच्चन फॅमिलीकडे परदेशातही अनेक प्रॉपर्टीज आहेत. 

Instagram

अजय देवगण -

अजय आणि काजोल त्यांच्याकडे असलेल्या महागड्या गाड्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. मात्र अजय आणि काजोलने परदेशातही घरांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. अजयने लंडनमध्ये एक घर घेतले आहे कारण काजोलला लंडन खूप आवडतं. तर त्याने सिंगापूरमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केली आहे कारण त्याची मुलगी न्यासा सध्या सिंगापूरमध्ये शिक्षण घेत आहे. सध्या  कोरोनामुळे काजोलही मुलीसोबत काही दिवसांसाठी सिंगापूरला शिफ्ट झाली आहे. अजय आणि त्याचा मुलगा युग मात्र सध्यातरी मुंबईतच राहत आहे. 

Instagram

शिल्पा शेट्टी -

शिल्पा शेट्टी जुहू मधील किनारा या आलिशान बंगल्यात पती राज कुंद्रा आणि तिच्या दोन मुलांसोबत राहते. मात्र शिल्पाला राजने लंडनमध्ये एक बंगला गिफ्ट केलेला आहे. ज्याचं नाव राजमहल असं आहे. राज कुंद्रा एक प्रसिद्ध उद्योगपती आहे. त्यामुळे तो शिल्पाला अशा महागड्या भेटवस्तू नेहमीच देत असतो. या बंगल्या व्यतिरिक्तही शिल्पा आणि राज यांच्या नावावर आणखी प्रॉपर्टीज लंडनमध्ये आहेत. 

Instagram

शाहरूख खान -

शाहरूख खानचे चाहते जुहूमधील मन्नत बंगल्यासमोर त्याला पाहण्यासाठी नेहमीच गर्दी करतात. मात्र काही जणांना हे माहीत नसेल की शाहरूखचे या व्यतिरिक्त दुबई आणि लंडनमध्येही आलिशान घरं आहेत. दुबईचया पाम जुमेराहमध्ये आहे लंडनच्या पार्क लेनमध्ये त्याने स्वतःची प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे. 

Instagram

सोनम कपूर -

सोनम कपूर लग्नानंतर तिचा पती आनंद आहूजासोबत लंडनमध्ये शिफ्ट झाली आहे. सोनम आणि आनंदचे लंडनमधील घर नॉटिंग हिलमध्ये आहे. सोनम कधी भारतात तर कधी लंडनमध्ये अशी दोन्हीकडे राहत असते. 

Instagram

सलमान खान -

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान यांच्या घरांविषयी नेहमीच चर्चा होत असते. त्याच्या बांद्रामधील घराप्रमाणे तो बऱ्याचदा त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये आढळून येतो. सलमानने दुबईतही एक फॅन्सी अपार्टमेंट खरेदी केलेली आहे. दुबई हा सलमानचा आवडता देश आहे. त्यामुळे तो बऱ्याचदा दुबईत जा असतो. महत्त्वाचं म्हणजे भाईजानचं हे घर दुबईतील बुर्ज खलिफा जवळ म्हणजे अतिशय महागडया ठिकाणी आहे. 

Instagram

जुही चावला -

जुही चावलाने जय मेहता या मोठ्या उद्योगपतीसोबत लग्न केलं आहे. जुही तिच्या पतीसह मुंबईतच राहते. मात्र तिची दोन्ही मुलं लंडनमध्ये शिक्षण घेत आहेत. यासाठी जुही आणि जय यांनी लंडनमध्येही एक घर घेतलेलं आहे. 

Instagram