संकर्षण कऱ्हाडे हे नाव मराठी माणसाला माहीत नाही अशी शक्यताच फार कमी. ‘आम्ही सारे खवय्ये’ आणि अनेक कार्यक्रमांमध्ये उत्तमरित्या निवेदनाची धुरा सांभाळणारा संकर्षण आणि आपल्या संवदेनशील कवितांनी प्रेक्षकांना आपलेसे करणाऱ्या संकर्षणने दुहेरी गोडवा आपल्याकडे आल्याचे जाहीर केले आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) बाबा झाला असून त्याच्या पत्नीने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. 27 जून रोजी संकर्षण बाबा झाला असून त्याला मुलगा आणि मुलगी असे अपत्य झाले आहे. आपल्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी संकर्षणने बाळांच्या फोटोंसह शेअर केली आहे. मात्र बाळांचे चेहरे त्याने दाखवलेले नाहीत.
‘सुपर डान्सर’ च्या मंचावर शिल्पा शेट्टी आता दिसणार नाही, वेगवेगळ्या सेलिब्रिटींची हजेरी
मुलांची नावेही केली शेअर
संकर्षण अत्यंत बुद्धिमान असा अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत आपल्या संवेदनशीलता आणि बुद्धिमानतेची चुणूक नेहमीच नाटक, विविध शो आणि मंचावरून दाखवली आहे. आपल्या मुलांचे फोटो शेअर करत संकर्षणने त्यांची नावेही सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या फोटोमध्ये बाळाचा चेहरा दिसत नसला तरीही त्यांच्याकडे पाहताना संकर्षणच्या चेहऱ्यावरील आनंद आणि अभिमान मात्र लपत नाहीये. संकर्षणने आपल्या जुळ्या अपत्यांची नावे शेअर केली आहेत. आपल्या मुलाचे नाव संकर्षणने ‘सर्वज्ञ’ अर्थात सर्व जाणणारा आणि मुलीचे नाव ‘स्रग्वी’ अर्थात पवित्र तुळस असे ठेवले आहे. आपल्याच वेगळ्या नावाप्रमाणे त्याने आपल्या दोन्ही मुलांची नावेही ठेवली आहेत. इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी त्याच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. दरम्यान त्याच्या दोन्ही मुलांना एक महिना झाला असून संकर्षणची पत्नी आणि दोन्ही मुलं व्यवस्थित आहेत.
मैत्रीवर आधारित नवी वेबसिरिज, शांतीत क्रांती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
शलाका आणि संकर्षणचे पहिलेच अपत्य
संकर्षण आणि शलाकाने काही वर्षांपूर्वीच लग्नगाठ बांधली होती. त्यांचे हे पहिलेच अपत्य असून पहिल्यांदाच दोन अपत्य झाल्याने दोघेही अत्यंत आनंदी आहेत. त्यातही जुळी मुलं म्हटल्यानंतर घरामध्ये दुप्पट आनंद पाहायला मिळत आहे. संकर्षण अनेक ठिकाणी काम करताना दिसून येतो. आता नुकतान एका डान्स रियालिटी शो चे सूत्रसंचालन संकर्षणने केले होते. तर अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन संकर्षण करतो. पण त्याचसह अनेक नाटके आणि मालिकांमधूनही संकर्षणने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे करून घेतले आहे. प्रशांत दामले, आदेश बांदेकर यासारख्या अभिनेत्यांना टक्कर देत अनेक वेळा पुरस्कारांच्या मानांकनामध्ये संकर्षणचे नाव दिसून आले आहे. त्यामुळे भाषेवर प्रभुत्व असणारा आणि अत्यंत हुशार असा संकर्षण पहिल्यांदाच बाबा झाल्याने अनेक त्याच्या मित्रमैत्रिणींनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलेला दिसून येत आहे. दरम्यान आता संकर्षण आपल्या बाळांचे चेहरे कधी दाखवणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तो नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याने लवकरच या बाळांच्या लीला त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळतील अशी अपेक्षा नक्कीच संकर्षणच्या चाहत्यांना आहे. तर आता सर्वज्ञ आणि स्रग्वी मोठे होत असताना संकर्षण एक पिता म्हणून कशी भूमिका बजावणार याकडेही चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अभिनेता म्हणून संकर्षण सर्वांनाच माहीत आहे पण एक वडील म्हणून तो काय करत आहे हेदेखील आता सर्वांना जाणून घ्यायची उत्सुकता लागून राहिली आहे.
या ट्रेडिंग गाण्याने उडवली सगळ्यांची झोप
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade