मनोरंजन

मराठीतील या अभिनेत्याचे लग्न अडचणीत, कुजबूज सुरू

Dipali Naphade  |  Jun 16, 2022
actor-siddharth-jadhav-and-his-wife-trupti-conflicts-between-marriage-in-marathi

काही दिवसांपूर्वीच अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) यांच्या नात्यात बिनसले असल्याची चर्चा होती. मात्र सोशल मीडियावर उर्मिला कोठारेने आदिनाथला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत यावर काही काळासाठी पडदा टाकला आहे असं म्हणता येईल. या बातमीतून त्यांचे चाहते वर येत आहेत नाही तोच अजून एका अभिनेत्याच्या संसाराला ग्रहण लागल्याच्या बातमीने सध्या जोर धरला आहे आणि तो अभिनेता आहे सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav). सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती जाधव हे दोघेही गेल्या काही कालावधीपासून एकत्र राहात नसल्याचे सध्या सुत्रांकडून समजण्यात आले आहे. दोघांनीही याबाबत काहीही वक्तव्य केलं नसलं तरीही गेल्या काही कालावधीपासून दोघेही एकमेकांसह फोटो शेअर करत नाहीत आणि त्याशिवाय सध्या दुबईला सिद्धार्थ आपल्या दोन्ही मुलींना घेऊन गेला असून तिथेही त्याची पत्नी एकत्र फोटोंमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे या चर्चेला अधिक सुरूवात झाली असल्याचे दिसून येत आहे. 

मुलींसाठी एकत्र तरीही एकत्र राहात नाहीत 

सिद्धार्थ जाधवने गेल्या काही वर्षांपासून रोहित शेट्टी (Rohit Shetty) कँपमध्ये आपली जागा मिळवली आहे. मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्येही सिद्धार्थ चमकत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी अँकर्स म्हणूनही सिद्धार्थ झळकतो आहे. मात्र सिद्धार्थ आणि तृप्तीच्या नात्यात दुरावा आल्याच्या सध्या चर्चांना सुरूवात झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून यांचे नाते बिघडले असून तृप्ती सिद्धार्थबरोबर राहात नसल्याचे सुत्रांकडून कळले आहे. तसंच सिद्धार्थ आणि तृप्तीच्या मुलीदेखील तृप्तीसह राहतात. गेल्या काही वर्षांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती एकत्र राहात नसून केवळ मुलींसाठी कधी कधी एकत्र येतात. मुलांसाठी अनेक पालक वेगळे झाले तरीही एकत्र येतात असं दिसून आले आहे. त्यामुळे सिद्धार्थने सध्या दुबईची ट्रीप केली तेव्हाही त्याने केवळ आपल्या मुलींसह फोटो पोस्ट केल्याचे दिसून येत आहे. तसंच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केल्याचेही सांगण्यात येत आहे. 

प्रेमविवाह केला होता 

या दोघांनी खरंच वेगळं होण्याचा निर्णय घेतला असेल तर तो नक्की का घेतला आहे याबाबत माहिती नाही. मात्र सिद्धार्थने आतापर्यंत आपल्या सर्व मुलाखतींमध्ये आपण याठिकाणी केवळ तृप्तीमुळेच येऊन पोचलो आहोत असं सांगितले आहे. त्यामुळे या दोघांनी वेगळं होऊ नये अशीच इच्छा त्यांच्या चाहत्यांची आहे. दोघांनीही प्रेमविवाह केला होता आणि त्यावेळी तृप्तीच्या पाठिंब्याने आपला इतक्या वर्षांचा संसार झाला आहे हेच सिद्धार्थ सांगत आला आहे. यापूर्वी या जोडीने ‘नच बलिये’ (Nach Baliye) या रियालिटी शो मधूनदेखील आपल्या प्रेमाविषयी आणि संसाराविषयी सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना हा नक्कीच धक्का आहे. तर अनेकांना याबाबत समजल्यानंतर असे होऊ नये अशीच इच्छा व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावरही सध्या गेले काही महिन्यांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती एकमेकांना टॅग करत नाहीत आणि लाईक्सही देत नाहीत. याशिवाय त्यांनी गेल्या कित्येक महिन्यापासून एकत्र फोटोही पोस्ट केलेला नाही. याशिवाय 10 मे रोजी या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस असतो आणि दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा दिलेल्या नाहीत. त्यामुळे सुत्रांकडून मिळालेल्या या माहितीबाबत अधिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन