अभिनेता वैभव मांगलेने त्याच्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांवर स्वतःची एक वेगळी छाप निर्माण केली आहे. कोकणातील रत्नागिरीत जन्माला आलेल्या वैभव मांगलेला मराठीतील विविध बोलीभाषातून अभिनय करण्याचं कौशल्य अवगत आहे. कोकणी, मालवणी, वऱ्हाडी अशा विविध बोलीभाषा तो सफाईदारपणे बोलू शकतो. ज्यामुळे त्याच्या अभिनयात नेहमीच वैविध्य असतं. वैभव जितका उत्तम अभिनय करतो तितकीच त्याला संगीताचीही उत्तम जाण त्याना आहे. टेलिव्हिजन माध्यमातील ‘युवा सिंगर एक नंबर’ या कार्यक्रमामुळे आता त्याचा हा पैलू सुद्धा प्रेक्षकांसमोर आला आहे.या कार्यक्रमात तो सध्या परिक्षकाची भूमिका साकारत आहे. एवढंच नाही तर वैभव एक उत्तम चित्रकारही आहे हे त्याने सिद्ध केलं आहे. वैभवने काढलेली ही काही चित्रं नुकतीच सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
मनातील चित्रकार वैभवने कसा जपला
चित्रकलेतील या आवडीविषयी बोलतांना वैभव म्हणाला की, ‘वास्तविक शाळेत असताना मी चित्रकला शिकलो होतो. पण, त्यानंतर चित्रकलेशी माझा विशेष संबंध कधीच आला नाही मात्र गेल्या काही महिन्यापासून मला असं वाटू लागलं की, आपणही चित्रं काढायला हवीत. म्हणून मग मी सुरुवातीला साधी-सोपी चित्रं काढायला लागलो. हळूहळू आणखी बरी चित्र काढण्याचा प्रयत्न केला. या कलेला जपण्यासाठी मी सोशल मीडियाची मदत घेतली. आता चित्रकलेत माझं मन चांगलंच रमलं आहे. मधल्या काही दिवसांमध्ये मला जेव्हा जेव्हा थोडा वेळ मिळाला. त्या त्या वेळी मी चित्रकलेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. आता माझी साधारपणे दिवसातून दोन चित्रं काढून होतात. रिकामा वेळ चित्रकलेसाठी दिल्यामुळे, मी मोबाइलपासून लांब राहतो. त्यामुळेच चित्रकलेत व रंगांमध्ये मी अधिक रमतो आहे. चित्रकलेच्या आणि विविध रंगछटांच्या सानिध्यात राहणं खूप छान आणि विलोभनीय आहे. चित्र पूर्ण केल्याचं एक निराळं समाधान मनाला मिळतं. चित्रकलेविषयी एक दुर्दैवी गोष्ट अशी, की या कलेकडे इतर देशात जितकं गांभीर्यानं पाहिलं जातं, तेवढं महत्त्व आपल्या देशात चित्रकलेला दिलं जात नाही. चित्रकला करताना मला एक कविता सुचली ती तुम्हाला ऐकवायला मला नक्की आवडेल…
“आत काहीबाही असतं लपलेलं खोलखोल तळाशी….शोधलं की सापडतं. खूपणारं, बोचणारं, अबोध,दुर्बोध…तळ ढवळला की कळतात रंग, मनावर उमटलेल्या डागांचे…मग कळतं रंगांनाही असतात वेदना,वैफल्य,आनंद,सुखं आणि त्यांची भाषाही…त्या भाषेला लिपी फक्त रंगांचीच ..रंगांनाही असते सावली आणि त्यात असतात लपलेले इंद्रधनू..त्याचा मैत्र फक्त सूरांशी…असच तळ ढवळताना सापडले लहानपणी हाताला लागलेले रंग..अजून तसेच होते… मनावर ओढलेल्या ओरखड्यातल्या रक्ता सारखे ताजे..तेच म्हणाले मला.. व्यक्त रे बाबा आता आमच्यातूनही.”
यामधून वैभवचं कवीपणही जगासमोर येत आहे. थोडक्यात वैभवकडे अभिनय, गायन, चित्रकला आणि कविता करण्याची कला आहे हे नक्कीच सिद्ध होतं. वैभवच्या या बहुरंगी बहुढंगी कला त्याच्या चाहत्यांना नक्कीच मोहित करणाऱ्या आहेत.
वैभवने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून काम केलं आहे. एक डाव भुताचा, करून गेलो गाव, मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी, वाडा चिरेबंदी, वासूची सासू, व्यक्ती आणि वल्ली, अलबत्या गलबत्या, संगीत सौभद्र अशा नाटकांमधून वैभवच्या अभिनयाचे कौशल तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. कुंकू, घडलंय बिघडलंय, फू बाई फू, शेजारी शेजारी पक्के शेजारी अशा अनेक मालिकांमधून वैभवच्या कामाचं कौतुक झालं आहे. तसंच काकस्पर्श, कोकणस्थ, टाईमपास, टाईमपास 2, दुनियादारी, शहापण देगा देवा, शिक्षणाच्या आयचा घो, हरिश्चंद्राची फॅक्टरी अशा अनेक चित्रपटांमधून वैभवने विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. संगीत सौभद्र या नाटकात आणि माझे पती सौभाग्यवती या मालिकेत वैभव मांगलेने स्त्री भूमिकादेखील साकारल्या होत्या. टाईमपासमधील कडक बापाची भूमिका अनेकांच्या लक्षात राहिली होती.
अधिक वाचा
विद्या बालनलादेखील करावा लागलाय ‘कास्टिंग काऊच’चा सामना, सांगितला अनुभव
अभिनेत्री ज्यांनी दिग्दर्शनातही आजमावला हात
अक्षय कुमारने शेअर केला आईसोबत ‘हा’ भावनिक व्हिडिओ
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade