बॉलीवूड

चित्रीकरणादरम्यान महिलेला छेडल्याप्रकरणी या प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, चित्रपटातून बाहेर

Dipali Naphade  |  Nov 4, 2020
विजय राजला अटक आणि सुटका

बॉलीवूडमध्ये कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. #MeToo प्रकरण अजूनही संपलेले नाही. तर आता महिलेली छेड काढल्याप्रकरणी प्रसिद्ध अभिनेता विजय राजला अटक करण्यात आली आहे. विद्या बालन स्टाटर ‘शेरनी’ या चित्रपटातून त्यामुळे विजय राजला काढून टाकण्यात आले असून निर्मात्याला 20 लाखाचा भुर्दंड बसल्याचेही सांगण्यात आले आहे. कारण विजय राज चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलपासून चित्रपटात होता आणि आता जवळजवळ या चित्रपटाचे चित्रीकरण होत आले आहे. विजय राजला काढून टाकल्याने चित्रपटाचे रिशूट करावे लागेल. त्यामुळे विद्या बालन आणि अन्य कलाकारांना पुन्हा सीन रिक्रिएट करावे लागतील. एकूण 22 दिवसांचं चित्रीकरण विजय राजने पार पाडलं होतं. मात्र निर्मात्यांना कोणत्याही वादात फसण्याची इच्छा नसल्याने आता पैशाचं नुकसान सहन करणं भाग आहे. विजय राजला त्वरीत चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे.

लग्नासाठी आदित्य नारायणचा सोशल मीडियाला रामराम, डिसेंबरमध्ये करणार लग्न

पीडिता आहे सहाय्यक दिग्दर्शक

Instagram

सुत्रांच्या सांगण्यावरून केवळ 13 दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं चित्रीकरण बालाघाटमध्ये सुरू करण्यात आलं होत. पहिले शेड्युल लॉकडाऊनपूर्वी भूतपलासी गावामध्ये 13 दिवस करण्यात आहे. मात्र बालाघाटच्या सेटवर विजय राजने सहाय्यक दिग्दर्शिकेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्यामुळे हे प्रकरण वाढले आहे. सर्वांच्या समक्ष विजय राजने असं केल्याचं सांगण्यात येत आहे. पण यानंतर सर्वांसमक्ष विजय राजने त्या पीडितेची माफी मागितली. पण त्यानंतर दोन दिवसाने त्या पीडितेने विजय राजवर पोलीस तक्रार दाखल केली. विजय राजने वॅनिटी वॅन अथवा हॉटेलमध्ये बोलावून मोलेस्ट केलं नाही तर विजय राजने पीडितेच्या खांद्यावर सर्वांसमक्ष हात ठेवला होता. मात्र त्यामागे आपला कोणताही हेतू नव्हता असं विजय राजने स्पष्ट केले आहे. पीडितेच्या वयाची आपली मुलगी आहे असंही विजय राजने सांगितले. मात्र सदर पीडितेने विजय राज यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली. त्यामुळे विद्या बालन आणि अन्य कलाकारांनाही धक्का बसल्याने सांगण्यात येत आहे. पण तरीही चित्रीकरण पूर्ण करणे गरजेचे असल्याने इतर कलाकारांनी काम करायला सुरूवात केली आहे.

करणवीर बोहराने शेअर केला टीजे सिद्धूचा प्रेगनन्सी व्हिडिओ

विजय राजला मिळाला जामीन

सदर महिलेने पोलीस तक्रार केल्यानंतर विजय राजला मंगळवारी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील पोलिसांनी अटक केली. विजयविरूद्ध आयपीसीच्या 354 (महिलेचा लज्जाभंग करणे) अन्वये तक्रार नोंदविण्याता आली. मात्र अटक केल्यानंतर काही वेळातच विजय  राजला जामीन मिळाला. यापूर्वीही विजय राजवर 2005 मध्ये दुबईमध्ये ड्रग्ज ठेवल्याप्रकरणात अटक करण्यात आली होती. तिथेदेखील त्याला जामीन मिळाला होता.  काय खरं आणि काय खोटं हे तिथल्या लोकांनाच माहीत असंही म्हटलं जात आहे. 

Bigg Boss 14: जास्मिनला वाचवल्यामुळे एजाज-पवित्रामध्ये भांडणाची ठिणगी

‘कव्वा बिर्याणी’मुळे झाला प्रसिद्ध

विजय राज एक कसलेला कलाकार असून त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र ‘कव्वा बिर्याणी’च्या सीनमुळे त्याची प्रसिद्धी वाढली होती. तर धमाल, वेलकम, दिवाने हुए पागल, रघु रोमिओ, बॉम्बे टू गोवा, मान्सून वेडिंग, गली बॉय या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. पण आता पुन्हा एकदा विजय राजच्या कामाला या सगळ्या प्रकरणात खिळ बसणार असं दिसून येत आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड