मराठीतील हेमांगी कवी ही अगदी बिनधास्त अभिनेत्री आहे. तिच्या सोशल मीडियावर ती बेधडकपणे आणि कसलाही विचार न करता आपले व्हिडिओज, फोटोज शेअर करत असते. अनफिल्टर्ड अशा तिच्या पोस्टवर बरेचदा अश्लील आणि वाईट कमेंट्सही येत असतात. पण हेमांगी त्याची अजिबात पर्वा करत नाही. सध्या तिच्या एका व्हिडिओमुळे तिची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. या व्हिडिओमध्ये तिची स्तनाग्रे दिसत असल्याच्या काही अश्लील कमेंट्स आल्या. त्यावर हेमांगीने दिलेले सडेतोड उत्तर यामुळे तिला अनेकांनी पाठींबा दिला आहे. विविध क्षेत्रातील महिलांनी हेमांगीची बाजू घेत अशा अश्लील विचारांच्या या मनोवृत्तीला चांगलाच दणका दिला आहे.
हंगामा 2′ प्रदर्शित होण्याआधीच शिल्पा शेट्टीचा खुलासा, चित्रपट होणार सुपरहिट
हेमांगी कवीची घेतली बाजू
हेमांगी कवीच्या त्या पोस्टवर आलेल्या कमेंट वाचून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील आपलं मत मांडलं आहे. त्या म्हणाल्या की, हेमांगी कवीला ट्रोल करणाऱ्यांनी तिचे अभिनय कौशल्य बघावे. ती ज्या सामाजिक विषयांवर व्हिडिओ शेअर करत असते ते व्हिडिओ वाखाणण्याजोगे असते. आपण बाईच्या दिसण्यावर चर्चा का करतो? बाईच्या असण्यावर आपण कधी चर्चा करणार आहोत? असे म्हणत त्यांनी अश्लील कमेंट करणाऱ्यांची कान उघडणी केली आहे. त्या पुढे म्हणाल्या, इन्स्टाग्राम हे मनोरंजनाचे माध्यम आहे. पोळ्या लाटण्याच्या या व्हिडिओकडे पाहण्याऐवजी लोकं नको त्या ठिकाणी पाहत कमेंट करतात कशाला?असा सवाल करत त्यांनी या नजरा बदलणार कधी? असे देखील म्हटले आहे. त्याच्या या वक्त्व्याला देखील अनेकांनी पाठींबा दिला आहे.
बाई, बुब्स आणि ब्रा वर झाली हेमांगी कवी व्यक्त, ‘लोक काय म्हणतील’चं ओझं किती वहायचं
हेमांगीने शेअर केला व्हिडिओ
झालं असं की, हेमांगी कवीने एक व्हिडिओ तिच्या फॅन्ससाठी शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती पोळ्या लाटतानाचा हा व्हिडिओ असून तिला पोळ्या छान गोल लाटता येतात. असे सांगत ती तिच्या चाहत्यांना पोळ्या लाटून दाखवत आहे. तिच्या पोळ्या करतानाचा हा व्हिडिओ तिने फॉरवर्ड केल्यामुळे आणि चपाती लाटताना शरीराची हालचाल होत असल्यामुळे तिच्या स्तनांची हालचाल यामध्ये होताना दिसत आहे. यावरच तिला नको त्या वाईट कमेंट येऊ लागल्या. या वाईट कमेंट्स पाहून हेमांगी अजिबात डगमगली नाही. उलट तिने याचे अगदी सडेतोड उत्तर दिले.
बाई, बुब्स आणि ब्रा या मधळ्याखाली तिने एक संपूर्ण निबंध लिहित आपले विचार मांडले आहेत. तिने लिहिले की,
बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा choice असू शकतो!
मग ती घरी असो किंवा social media वर किंवा कुठेही!
हाँ त्यावरून judge करण्याचा, त्याबद्दल घाणेरडया चर्चा आणि gossip करण्याचा सुद्धा ज्याचा त्याचा choice!
आता हेमांगी कवीच्या या सडेतोड उत्तराला अनेकांनी पाठींबा दिल्यामुळे अश्लील कमेंट करणाऱ्यांनी सावध राहिलेलेच बरे!
रणबीर कपूर आलियाला सोडून देईल.. केआरकेच्या भविष्यवाणीवर संतापले प्रेक्षक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade