तुम्हाला साड्यांची आवड आहे, पण उन्हाळ्यात घामाचा आणि उष्णतेचा खूप त्रास असल्याामुळे आवड असूनही साडी नेसता येत नसेल तर तुम्ही अभिनेत्री प्रिया बापटचं साड्यांचं कलेक्शन नक्कीच पाहायला हवं. प्रिया बापट नेहमीच आपल्या अभिनयासाठी आणि फॅशनसाठीही ओळखली जाते. नुकतंच गेल्या महिन्यात साड्यांच्या प्रेमापोटी तिने साड्यांचा एका नवा ब्रँडही सुरू केला आहे. पण याचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही या साड्या उन्हाळ्यातही कॅरी करू शकता आणि महत्वाचे म्हणजे या साड्या अतिशय हलक्या वाटत आहेत. प्रिया बापटचं हे खास कलेक्शन तुम्हीही पाहा आणि या उन्हाळ्यात तुम्हीही साड्यांचं कलेक्शन आपल्या कपाटात नक्कीच तयार करू शकता. साडी ही कायमस्वरूपी अप्रतिम दिसणारी फॅशन आहे. कोणत्याही पेहरावापेक्षा साडीमध्ये स्त्री अधिक सुंदर दिसते हे नक्कीच. पाहूया प्रियाचं हे अप्रतिम कलेक्शन
सेलिब्रिटींची पसंती ठरतेय महाराष्ट्रीयन खणाची साडी
सोबर आणि सुंदर साड्या
प्रिया नेहमीच आपल्या सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. या फोटोंमध्ये अनेक फोटोंमध्ये प्रिया साडीमध्ये दिसून येते. प्रियाचं नवं कलेक्शन पाहिलं तर उन्हाळ्यातही अतिशय हलक्या आणि सुंदर अशा साड्या, नेसायला सोप्या असणाऱ्या साड्या दिसून येतात. अगदी तरूणींपासून ते वयस्क महिलांपर्यंत कोणीही या साड्यांचा वापर करू शकतं. अगदी साध्या आणि तरीही आकर्षक अशा या साड्या सध्या सर्वांनाच आवडत आहेत. प्रियाचा हा साडीतील लुक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला असून तिच्या चाहत्यांनी तिला नेहमीच तिच्या फॅशनसाठी प्रोत्साहन दिले आहे. कला आणि पॅशन यांचा सुंदर मेळ या साड्यांमध्ये दिसून येत आहे. प्रियाने आपली बहीण श्वेता बापटसह हा ब्रँड चालू केला आहे. मुळात तरूणाईची आवड डोळ्यासमोर ठेऊनच याचे डिझाईन करण्यात आले आहे असं साड्यांकडे बघून वाटतं. मात्र अगदी तरूणाईपासून सर्वांनाच हे डिझाईन आपलंसं वाटेल असंच आहे. मुळात याचे रंग हे आकर्षक असून सर्वांनाच भावणारे आहेत.
अभिनेत्री प्रिया बापटने शेअर केलं स्किन केअर रूटिन, अशी घेते त्वचेची काळजी
मनमोहक रंग
मुळात अगदी गडद किंवा डोळ्यात भरणारे असे रंग नसून मनमोहक आणि मनाला भावणारे असे सुखद रंग या साड्यांचे आहेत. गडद रंगांनी उन्हाळ्यात अधिक उष्णात सोसून घेतली जाते. त्यामुळे समर कलेक्शन (Summer Collection) म्हणून या साड्या अधिक खास वाटत आहेत. याचे रंग कोणत्याही भारतीय रंगावर शोभून दिसतील असेच आहेत. त्यामुळे साडी बघितल्यावर कोणताही रंग हा भावतोच आहे. याशिवाय आता हा सावेंची ब्रँड वेबसाईटवरही उपलब्ध असल्याने तुम्हाला वेगवेगळे कलेक्शनही पाहता येईल. तसंच तुम्हाला प्रियाचं कलेक्शन आवडत असेल तर तुम्हाला तुमच्या वॉर्डरोबमध्ये प्रियाप्रमाणे साड्यांचं कलेक्शन वाढवता येईल आणि या उन्हाळ्यात तुम्हीही प्रियासारखी साड्यांची स्टाईल नक्कीच करून तुमचं एखादं खास फोटोसेशनही करू शकता. सध्या आपण सगळेच कोरोनामुळे घरात आहोत. त्यामुळे काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असेल तर नक्कीच एखादी साडी नेसून आपल्या स्वतःसाठी वेळ काढत सुंदर फोटोसेशन नक्कीच करू शकता. तसंच यावर तुम्ही तुम्हाला आवडणारे हलकेसे दागिने घालूनही अधिक सुंदर दिसू शकता.
प्रियाच्या साड्यांचे कलेक्शन एकापेक्षा एक भारी असून ती नेहमी तिचे साड्यांमधील वेगवेगळे लुक शेअर करत असते. प्रियाने नुकतंच तिच्या बहिणीच्या Sawenchi या ब्रॅंडसोबत पार्टनशिप केली आहे. ज्या माध्यमातून ती तिचं साड्यांवरचं प्रेम आता सोशल मीडियावर व्यक्त करत आहे. प्रियाच्या या नव्या कलेक्शनमधून तुम्हीही नवनवीन प्रकारच्या साड्या नक्कीच खरेदी करू शकता.
अखेर प्रिया बापटची ‘गुड न्यूज’ कळली
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक