DIY फॅशन

लुंबा राखी दिसतात खूपच सुंदर… असा करता येतो वापर

Leenal Gawade  |  Aug 8, 2022
लुंबा राखी

सध्या सगळीकडे रक्षाबंधन फिव्हर सुरु आहे. राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा या दिवशी नुसत्या शुभेच्छांनी भावा बहिणींचे भागते तरी कुठे म्हणा… त्यामुळे रक्षाबंधनाला गिफ्ट देण्यासाठी चांगले पर्याय शोधणे फार गरजेचे असते. हल्ली भावाला राखी देण्यासाठीही बाजारात वेगवेगळ्या डिझाईन्सच्या राखींचे पर्याय मिळतात. तुम्हालाही काही वेगळी राखी निवडायची असेल तर तुम्ही काहीतरी वेगळ्या आणि नवीन अशा राखींचा पर्याय निवडायला हवा. हल्ली राखींमध्येही डिझायनर असे पीस मिळतात.त्यातीलच एक प्रकार म्हणजे लुंबा राखी…. लुंबा राखी या दिसायला इतक्या सुंदर दिसतात की, तुमच्या भावाला या अगदी पुढच्या रक्षाबंधनापर्यंत वापरता येतील असे आहेत. चला जाणून घेऊया लुंबा राखीच्या या काही डिझाईन्स

लुंबा राखी म्हणजे काय?

लुंबा राखी म्हणजे नेमकं काय असा विचार करत असाल तर या राखी म्हणजे लटकन प्रकारातील राखी होय. लुंबा राखी या दंडाला बांधल्या नंतर त्या खाली लटकन प्रमाणे लटकतात. तुम्हाला इमिटेशन ज्वेलरीमध्ये असा पर्याय मिळतो. पण हल्ली अनेक जण सोन्याच्याची अशा राख्या करुन घेतात. त्यामुळे त्याची किंमत तर वाढते पण त्यासोबतच ती राखी टिकतेही जास्त काळासाठी. लोंबकळणाऱ्या म्हणून याला लुंबा राखी असे म्हणतात असे देखील सांगितले जाते. चला पाहुया लुंबा राखीच्या काही सुंदर डिझाईन्स  

कडा लुंबा राखी

कडा लुंबा राखी

लुंबा राखीमधील हा प्रकार भावांना आवडेल असा आहे. याचे कारण असे की, यामध्ये तुम्हाला कडाचा पर्याय मिळतो. त्यामुळे या राख्या जास्त काळासाठी टिकतात. या राखींच्या खाली तुम्हाला मस्त अशी लटकन तुमच्या आवडीच्या उंचीप्रमाणे निवडता येते. त्यामुळे अशा प्रकारातील राखी तुम्ही तुमच्या लाडक्या भावाला देऊ शकता. 

एविल आय लुंबा राखी

एविल आय लुंबा राखी

राखीचा हा प्रकारही कड्यामधील आहे. याच्या खाली तुम्हाला अगदी नाजूक अशा आकारामध्ये एविल आयचा सेट मिळतो. त्यामुळे ही राखी दिसायला खूपच फॅन्सी आणि ट्रेंडी दिसते. एविल आय अशा प्रकारातील ही राखी तुम्हाला ऑनलाईन अशा स्टोअरमध्ये मिळेल. या शिवाय खूप जण असे असतात की, जे मुलींनाही राखी बांधतात मुलांनाही अशा राखी दिसायला खूपच दिसतात. 

थ्रेड लुंबा राखी 

थ्रेड लुंबा राखी 

जर तुम्हाला ट्रेडिशनल दोऱ्याच्या अशा लुंबा राखी हव्या असतील तरी देखील तुम्हाला अशी मस्त थ्रेड लुंबा राखी निवडता येईल. यामध्येही अनेक पर्याय आहेत. शिवाय या राखी खूप मोठ्या दिसत नाहीत. त्यामुळे त्या काही महिने अगदी सहज वापरता येतात

खास बहिणींसाठीही राखी घ्यायचा विचार करत असाल तर ही एकदम बेस्ट अशी राखी आहे. 

Read More From DIY फॅशन