मनोरंजन

रिंकू राजगुरु दिवसेंदिवस होतेय हॉट, शेअर केला नवा फोटो

Leenal Gawade  |  Apr 13, 2022
रिंकूचे नवे फोटोशूट

स्पर्धेत टिकायचे असेल तर नवनव्या गोष्टी आणि फिटनेस हा राखलाच पाहिजे. हे रिंकूला चांगलेच पटले आहे. ‘सैराट’ या सुपर हिट चित्रपटापासून तिचा प्रवास सुरु झाला. पण त्यानंतर केवळ आर्ची म्हणून लोकांच्या नजरेत राहण्यापेक्षा तिने आता स्वत:ला असे बदलले आहे की, तिला या नव्या रुपात पाहून लोकं तिची वाहवाह करतात. रिंकूने काहीच दिवसांपूर्वी तिचे काही नवे फोटो शेअर केले हे फोटो पाहून प्रेक्षकांनी तिला दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हिची उपमा दिली आहे. त्यामुळे ती जी मेहनत करतेय ती नक्कीच सफल होतेय असे म्हणायला काहीच हरकत नाही. जाणून घेऊया तिच्या या नव्या फोटोशूटबद्दल

दिसतेय खूपच हॉट

रिंकूने जे नवे फोटोशूट केले आहे. त्यामध्ये तिने पांढऱ्या रंगाची एक फ्लोरल साडी नेसली आहे. त्यावर राणी कलरचा ब्लाऊज घातला आहे. तिने दिलेल्या या पोझेझमध्ये तिने कमावलेली फिगर दिसत आहे. तिचा हा लुक पाहून अनेकांनी तिला हॉट अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर तिच्या फॅम जॅमने तिला ती एकदम स्मिता पाटीलसारखी दिसतेय असे देखील म्हटले आहे. त्यामुळे तिचे हे फोटो खूपच जास्त व्हायरल होताना दिसत आहे. फिटनेसमुळे चेहऱ्यावर आलेला ग्लो चांगलाच दिसत आहे. शिवाय एका साध्या साडीला तिच्या फिगरमुळे आलेली शोभा या सगळ्यामुळे तिचे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.

साडीतच दिसते शोभून

रिंकूची इन्स्टा प्रोफाईल पाहिली तर ती अनेकदा आपल्याला साडीतच दिसते. ती वेस्टर्न कपड्यांपेक्षा जास्त साडीमध्ये अधिक वेळा वावरताना दिसते. तिने वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्यांमध्ये शूट केलेले दिसत आहे. मिनिमल मेकअप आणि मिनिमल ज्वेलरी ही तिच्या फोटोशूटची खासियत आहे. तिने गुढीपाडव्याच्या निमित्ताने राणी रंगाच्या साडीवर फोटोशूट केले होते. त्या आधी ती इंडिगो, निळा, पिवळा, सिल्कमधील प्रकार अशी अनेक साडींवर दिसली आहे. तिचे हे फोटो खूपच सुंदर आहेत . तिच्या साड्या या फार काही वेगळ्या नसल्या तरी देखील तिच्यामुळे साड्यांना शो येतो असे म्हणायला काहीच हरकत नाही.

वेस्टर्न आऊटफिट आणि रिंकू

आता रिंकू नुसत्या साड्या घालतेच असे नाही तर ती वेगवेगळ्या वेस्टर्न आऊट फिटवरही चांगलीच दिसते. ती पंजाबी ड्रेस, जीन्स आणि आताच्या सगळ्या लेटेस्ट फॅशन आवर्जून फॉलो करते आणि त्या तिला अधिक चांगल्या दिसतातसुद्धा. त्यामुळे तिचे हे फोटो तिच्या दोन्ही लुकमध्ये चांगलेच दिसतात. 

फिटनेसकडे देते लक्ष

रिंकू आता पूर्वीसारखी अजिबात राहिलेली नाही. म्हणजे तिने तिचे वजन बरेच कमी केलेले आहे. ती आता अधिक फिट दिसते. गेल्या काही वर्षांपासून ती अधिक व्यायाम करताना आणि डाएट करताना दिसते. एका मुलाखती दरम्यान तिने याबद्दल सांगितले होते. तिची आई तिच्यासाठी अधिक मेहनत घेते हे देखील सांगितले होते. 

पण आता या मेहनतीचे फळ पाहायला मिळत आहे. तिचे फोटोज खूप सुंदर आणि वायरल होतील असेच आहेत.

Read More From मनोरंजन