ADVERTISEMENT
home / मनोरंजन
rinku rajguru

रिंकू राजगुरूचा आगामी चित्रपट -आठवा रंग प्रेमाचा’ चे पोस्टर रिलिज

नागराज मंजुळे यांच्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘झुंड’ या चित्रपटात झळकल्यानंतर आता सैराटफेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी तयार आहे. तिचा आगामी चित्रपट ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटातून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिचा हा चित्रपट म्हणजे एक सुंदर तरल प्रेमकथा असेल. हा चित्रपट येत्या 17 जून रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. आठवा रंग प्रेमाचा मध्ये रिंकू बरोबर विशाल आनंद हा नवकलाकार झळकणार आहे.  याआधी आपण रिंकू व आकाश यांची पडद्यावर चांगलीच रंगलेली केमिस्ट्री बघितली. आता या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू व विशाल हे प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. 

आठवा रंग प्रेमाचा एक रोमँटिक प्रेमकथा 

रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे देखील बऱ्याच दिवसांनी मराठी चित्रपटात दिसणार आहेत. आदिनाथ पिक्चर्स, राकेश राऊत प्रॉडक्शन आणि टॉप अँगल प्रॉडक्शन्सने त्यांच्या आगामी ‘आठवा रंग प्रेमाचा’ या मराठी सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी  रिलीज केला आहे. खुशबू सिन्हा या चित्रपटाच्या दिग्दर्शिका असून एए फिल्म्स या चित्रपटाचे वितरण करणार आहेत.या चित्रपटात मकरंद देशपांडे आणि रिंकू राजगुरू हे मुख्य भूमिकेत आहेत तर विशाल आनंद या चित्रपटातून पदार्पण करत आहे. आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटाचे कथानक एका प्रेमकथेभोवती फिरते. यामध्ये प्रेमाची सध्याची व्याख्या चित्रित केलेली आहे.

रिंकूने शेअर केले होते ट्रेलर 

रिंकू राजगुरू काही काळापूर्वी ‘अनपोज्ड’ या हिंदी चित्रपटात झळकली होती. यामध्ये ‘ग्लिच’, ‘अपार्टमेंट’, ‘रात-ए-टाट’, ‘विराणू’ आणि ‘चांद मुबारक’ या लघुपटांचा समावेश होता. याचे दिग्दर्शन लिलेट दुबे यांनी केले होते. रिंकू राजगुरु सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर “आठवा रंग प्रेमाचा” चा ट्रेलर शेअर केला होता. ट्रेलर शेअर करताना तिने लिहिले होते की  “खरा जबाबदार, तितकाच खबरदार, आठवा रंग प्रेमाचा देखणा-रुबाबदार! प्रसिद्ध हिंदी चित्रपट निर्माते समीर कर्णिक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यापूर्वी त्यांनी “क्यू हो गया ना”, “यमला पगला दिवाना”, “चार दिन की चांदनी”, “हीरो” असे अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता आठवा रंग प्रेमाचा द्वारे ते  मराठीत निर्माता म्हणून पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे आहे. खुशबू सिन्हा यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. 

आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटात आजच्या युगातील एक नवी प्रेमकथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. इंद्रधनुष्यात सात रंग असतात. प्रेम हे देखील इंद्रधनुष्यासारखेच सुंदर असते. प्रेमाचेही अनेक सुंदर रंग असतात. आता प्रेमाचा आठवा रंग म्हणजे नेमका कोणता हे याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हीच उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात पोस्टरने निर्माण केली आहे.  हे पोस्टर शेअर करताना रिंकूने ‘सप्तरंगी प्रेमाचा नवा रंग घेऊन येतेय रिंकू राजगुरु, ‘आठवा रंग प्रेमाचा’ १७ जून पासून चित्रपटगृहात…’ हे हटके कॅप्शन दिले आहे. आता हा आठवा रंग कोणता हे 17 जूनला प्रेक्षकांना कळेलच.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

06 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT