मनोरंजन

ब्रेकअपवर व्यक्त झाली अभिनेत्री रुपाली भोसले, म्हणाली…

Leenal Gawade  |  Jan 20, 2022
रुपाली भोसले - अंकित मगरे

 सेलिब्रिटींच्या रिलेशनशीपमध्ये सगळ्यांनाच इंटरेस्ट असतो. त्यांचे नवनवे फोटो पाहायला सगळ्यांनाच आवडतात. त्यांच्यात आलेला दुरावाही लोकांना जाणून घ्यायचा असतो. मराठीतील एक स्वीट कपल अशी ओळख असलेलले अभिनेत्री रुपाली भोसले आणि अंकित मगरे यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना चांगलेच उधाण आले होते. हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून अजिबात एकत्र दिसत नाहीत किंवा कोणतेही फोटो शेअर करत नाहीत. त्यामुळे काहीतरी बिनसलं आहे हे नक्कीच कळत होतं. पण आता रुपालीने या वर मौन सोडले आहे. तिने ब्रेकअप झाल्याची कबुली एका मुलाखती दरम्यान दिली आहे. त्यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे.

ब्रेकअपची दिली कबुली

अभिनेत्री रुपाली भोसले ही गेल्या काही काळापासून तिचा बॉयफ्रेंड अनिकेत मगरेसोबतचे फोटो शेअर करताना दिसत नव्हती. त्यामुळे खूप जणांना त्यांच्या ब्रेकअपबद्दल शंका होती. पण नक्की त्यांचे ब्रेकअप झाले आहे की नाही यावर शिक्कामोर्तब होत नव्हता. पण आता रुपालीनेच यावरुन पडदा उठवल्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. त्या मुलाखतीदरम्यान ती म्हणाली की, हो आमचं ब्रेकअप झालं आहे. ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही वेगळे झाले आहोत. पण या संदर्भात आम्ही कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती. पण आमच्या मनात एकमेकांबद्दल कोणतीही कटुता नाही. असे सांगून तिने याचा खुलासा केला आहे. 

केला कारणाचा खुलासा

रुपालीने याचे अधिक स्पष्टीकरण देताना असे म्हटले आहे की, कुटुंब आणि काम यामध्ये मला जर काही निवडायचे असेल तर मी कायमच कुटुंबाला प्राधान्य देईन. लोकांसाठी नाते चांगले आहे असे दाखवण्याची गरज वाटत नाही. आता आम्ही दोघे एकमेकांच्या संपर्कात नाही. पण तरीदेखील आम्ही एकमेकांसाठी शुभच चिंतितो. आमचे नाते एकदम चांगले असून त्याने यश मिळवल्यास मी त्याला हक्काने नक्कीच कॉल करेन.असे देखील रुपालीने स्पष्ट केले आहे. रुपालीच्या इन्स्टावर त्याचे फारसे फोटोज दिसत नसले तरी अंकितने मात्र तिचे फोटो डिलीट केलेले नाही.

‘विशू’ उलगडणार प्रेमाची अनोखी कहाणी

सध्या या मालिकेत करते काम

रुपाली सध्या स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते? मालिकेत तिची महत्वाची अशी भूमिका असून तिला हल्लीच कोरोनाची देखील लागण झाली होती. पण आता ती बरी असून कामावर परतली आहे. तिचे अनिकेत मगरेसोबत रिलेशनशीप सुरु झाले त्यावेळी त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत होते. त्यांच्या नावे एक #ruank देखील प्रसिद्ध झाला होता. त्यांना अनेकांनी कॉफी शॉप्स आणि डेटवर पाहिले होते. त्यांच्या नात्यामध्ये असा दुरावा येईल असे मुळीच वाटले नव्हते. पण त्यांच्या नात्यात आलेला दुरावा पाहून फॅन्स मात्र नाराज झाले आहेत. त्यांनी घेतलेला हा निर्णय प्रॅक्टिकल असल्यामुळे खूप जणांनी त्यांचे कौतुक देखील केले आहे.

मलायका- अर्जुनच्या ब्रेकअप चर्चा

 सेलिब्रिटी कपलपैकी आणखी एक कपल म्हणजे मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपच्या अफवांनी देखील सगळ्यांना भांडावून सोडल होते. सगळ्यांना त्यांच्यात दुरावा आला असे वाटत होते. पण या दोघांमध्ये सगळे आलबेल आहे असे देखील दिसले. 

आता रुपाली- अंकितच्या फॅमजॅमना वाईट नक्कीच वाटले असेल. तुम्हाला काय वाटते?

प्रेमाच्या महिन्यात होणार लोचा… लोच्या झाला रे 4 फ्रेबुवारीला प्रदर्शित

Read More From मनोरंजन