टेलीव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या दिलखेचक अदा आणि अभिनयामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच श्वेता टेलीव्हिजनवरील एका स्टंट बेस रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. ‘खतरो के खिलाडी’चा 11 वा सीझन नुकताच संपल्यामुळे सर्व स्पर्धक आपापल्या घरी परतले. त्यानंतर श्वेताला बिग बॉस 15 मध्ये ट्राइब लीडर म्हणून सहभागी व्हायचं होतं. ज्यासाठी ती खतरो के खिलाडीमधून घरी परतल्यावर तिच्या हातातील कामे लवकर पूर्ण करण्यात व्यस्त होती. मात्र आता तिची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आहे.
रुपेरी पडद्यावरील हा आणखी एक कलाकार झळकणार मालिकेत
काय झालंय श्वेता तिवारीला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये श्वेतावर उपचार सुरू आहेत. तिच्या बिझी शेड्यूलमुळे तिच्यावर ही वेळ आली आहे. श्वेताला खूप तास काम केल्यामुळे अशक्तपणा आणि कमी रक्तदाबाचा त्रास जाणवत आहे. असं असलं तरी श्वेताने तिच्या टीमतर्फे चाहत्यांना ती बरी असून लवकरच पुन्हा सर्वांच्या भेटीला येणार असं कळवलं आहे. श्वेतावर वेळीच योग्य उपचार झाल्यामुळे ती लवकर रिकव्हर होईल अशी सर्वांना आशा आहे. आता उपचारानंतर तिला बरं वाटत असून लवकरच तिला घरी जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. श्वेताने यासाठी तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. कारण चाहत्यांच्या प्रेम आणि प्रार्थनेमुळेच ती लवकर बरी होत आहे.
Bigg boss मराठी 3 : स्नेहा आणि आविष्कारमध्ये पडणार वादाची ठिणगी
श्वेताचे प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्य
श्वेता तिवारीला खरी ओळख ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून मिळाली. यातील ‘प्रेरणा’ या भूमिकेमुळे तिला घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर श्वेताने अनेक मालिका, वेबसिरिज आणि चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र आजही लोकांच्या मनात तिची प्रेरणा हीच प्रतिमा कायम आहे. श्वेता काही दिवसांपूर्वीच खतरो के खिलाडी या रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांसमोर आली होती. त्यामुळे तिचा एक वेगळा अवतारही यातून प्रेक्षकांना पाहता आला. श्वेता तिच्या सोशल मीडियावरील लुक्स आणि अपडेट्समुळे नेहमीच चर्चेत असतो. प्रोफेशनल आणि वैयक्तिक दोन्ही आयुष्यात तिला अनेक चढउतार सहन करावे लागले आहेत. दोन लग्न, घटस्फोट, सिंगल मदर अशा आव्हानांना तोंड देत तिने तिच्या प्रोफेशनल आयुष्यात स्वतःच्या कतृत्वावर प्रगती केली आहे. आता श्वेता अचानक आजारी पडल्यामुळे चाहत्यांना चिंता वाटू लागली आहे. मात्र श्वेता प्रत्येक आव्हानाला नेहमीच बिनधास्तपणे हाताळते. सहाजिकच चाहत्यांना लवकरच श्वेताला आता या आजारातून बरी झालेलं पाहायचं आहे. एवढंच नाही तर तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक आहेत.
Biggboss Marathi season 3 : लहानपणी खूप खोडकर होता बिग बॉस मराठी मधला हा स्पर्धक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje