मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं नवीन क्षेत्रात पदार्पण

Aaditi Datar  |  Feb 25, 2019
अभिनेत्री स्मिता तांबेचं नवीन क्षेत्रात पदार्पण

अभिनेत्री स्मिता तांबे गेलं जवळजवळ एक तप आपल्या सशक्त स्त्री व्यक्तिरेखांमुळे सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. लग्नानंतर आता ती एका नवी जवाबदारी घेण्यास सज्ज आहे. 

महिला सशक्तीकरण या महत्त्वपूर्ण विषयावरील चित्रपटाव्दारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय. सौरभ सिन्हा दिग्दर्शित सुपरनॅचरल थ्रिलर असलेल्या ‘सावट’ या चित्रपटाची निर्मिती ‘निरक्ष फिल्म्स’ आणि ‘लेटरल वर्क्स प्रा लि.’ सोबतच स्मिता तांबेचे ‘रिंगींग रेन’ प्रॉडक्शन हाऊस करत आहे.

‘सावट’ या चित्रपटात स्मिता तांबे इन्स्पेक्टर आदिती देशमुखच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेबाबत सांगताना स्मिता म्हणाली की, “उंबरठा आणि जैत रे जैत या चित्रपटातील स्मिता पाटील यांच्या भूमिका, ‘एक होता विदुषक’ सिनेमातली मधू कांबीकर यांची भूमिका, स्मिता तळवलकर यांची ‘चौकट राजा’मधली भूमिका, ‘उत्तरायण’मधली नीना कुलकर्णी यांची भूमिका यांसारख्या विविध सशक्त स्त्री व्यक्तिरेखांनी कायम माझ्या मनावर गारूड केलंय. कदाचित म्हणूनच मला अभिनय क्षेत्रात नेहमीच सशक्त महिलांच्याच भूमिका आकर्षित करतात. सीबीआय ऑफिसर आदिती देशमुखची भूमिकाही अशीच सशक्त, हुशार पोलिस अधिका-याची आहे.”

‘सावट’मध्ये अभिनय करण्यासोबतच सिनेमाची निर्मिती करण्याबाबत सांगताना स्मिता तांबे म्हणाली, “सौरभ चित्रपट घेऊन आला तेव्हा मला चित्रपटाची कथा एवढी आवडली की, मी सिनेमात काम करण्यासोबतच या सिनेमाची निर्मिती करायचं ठरवलं.”

जागतिक महिला दिन 8 मार्चला असतो आणि याच महिन्यात सशक्त स्त्री भूमिका साकारणा-या स्मिता तांबे महिला सबलीकरणावरच्या सिनेमाव्दारे निर्माती म्हणून पदार्पण करतेय. या योगायोगाविषयी स्मिता तांबेने सांगितलं की, “खरंतर, सिनेमाची रिलीज डेट ठरवताना मुद्दामहून असं काहीच ठरवलं नव्हतं. पण हा योगायोग अनपेक्षितपणे जुळून आला. ही खूप छान गोष्ट आहे की, एक सुपरनॅचरल थ्रिलर सिनेमातून महिला सबलीकरणाचा एक वेगळा विचार घेऊन आम्ही तो मार्च महिन्यात आणतोय.”

‘रिंगीग रेन’ आणि ‘निरक्ष फिल्म’च्या सहयोगाने ‘लेटरल वर्क्स प्रा.लि.’प्रस्तुत, स्मिता तांबे, हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित, सौरभ सिन्हा दिग्दर्शित ‘सावट’ या चित्रपटात श्वेतांबरी, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव आणि स्मिता तांबे  मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २२ मार्च २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

फोटो सौजन्य – Instagram

हेही वाचा 

‘टोटल धमाल’ ची बॉक्स ऑफिसवर धूम

Oscar 2019: भारतीय शॉर्ट फिल्म ‘पीरियड: द एंड ऑफ सेंटेंस’ ला मिळालं ऑस्कर

चांदनीच्या साडीचा लिलाव सुरु, किंमत ऐकाल तर थक्क व्हाल

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘ह.म.बने तु.म.बने’ समजवणार ‘गुड टच आणि बॅड टच’

Read More From मनोरंजन