मनोरंजन

आता मराठी मालिकेमध्येही ‘इच्छाधारी नागीण’चा ड्रामा

Trupti Paradkar  |  Oct 20, 2019
आता मराठी मालिकेमध्येही ‘इच्छाधारी नागीण’चा ड्रामा

महेश कोठारे हे नाव अनेक वर्षे मराठी सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक म्हणून गाजत आहे. आता महेश कोठारेंची पुढची पिढी म्हणजेच अभिनेता आदिनाथ कोठारे यानेही निर्मिती क्षेत्रातदेखील आपला स्वतःचा वेगळा ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. कोठारे व्हिजनची निर्मिती असलेली ‘प्रेम, पॉयजन, पंगा’ ही नवी मालिका लवकरच ‘झी युवा’ वाहिनीवर सुरु होत आहे. ज्यामधून पहिल्यांदाच मराठी मालिका विश्वात इच्छाधारी नागीण हा विषय एका हटके पद्धतीने प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आदिनाथच्या मनात मराठी टेलिव्हिजनवर ‘इच्छाधारी नागीण’ या विषयावर एखादी मालिका सुरु करायचा विचार डोक्यात होता. मग या संकल्पनेविषयी आणखी चर्चा सुरु झाली आणि त्यानंतर या विषयाने एक वळण घेतलं ज्यातून हलकीफुलकी पण तरीही ‘मॅड’ अशी एक भन्नाट विनोदी मालिका तयार झाली. या मालिकेला ‘प्रेम, पॉयजन, पंगा’ असं निराळं नाव देण्यात आलं.

Instagram

‘प्रेम, पॉयजन, पंगा’मध्ये इच्छाधारी नागीणचा ड्रामा

‘प्रेम, पॉयजन, पंगा’ मालिकेच्या माध्यमातून ‘इच्छाधारी नागीण’ हा विषय एका  वेगळ्या प्रकाराने मांडण्यात येणार आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना एक उत्तम ‘सिटकॉम’ पाहण्याची संधी मिळेल. या मालिकेच्या मुख्य भूमिकेसाठी आदिनाथला दोन्ही नवे चेहरे हवे होते. अशावेळी सुंदर आणि आकर्षक चेहरा आणि त्याला उत्तम अभिनयाची जोड मिळणं ही फार महत्त्वाची गोष्ट होती. असे कलाकार शोधण्याचं काम नक्कीच कठीण होतं. या मालिकेच्या निमित्ताने कास्टिंग हे सगळ्यात मोठं आव्हान त्याच्यासाठी होतं. जवळजवळ 250 ऑडिशन्स घेतल्यानंतर हे उत्कृष्ट कलाकार निवडण्यात आले. सगळ्या टीमची भट्टी उत्तम जमून आल्यामुळे ही  मालिका लोकप्रिय होईल आणि सगळ्यांना नक्कीच आवडेल अशी आशा आदिनाथला वाटत आहे. मालिकेच्या निरनिराळ्या प्रोमोमुळे या मालिकेची चर्चा काही महिन्यांपासूनच सुरु झाली होती. घरातील एसी बंद असल्याने, फ्रिजमध्ये बसून असलेली एक तरुण मुलगी या प्रोमोमध्ये पाहायला मिळाली होती. शिवाय तिचं तिच्या बॉयफ्रेंड बद्दलच स्वगत ऐकून, या मालिकेविषयीचे औत्सुक्यता वाढली होती आहे. निळ्या रंगात चमकणारे, त्या तरुणीचे डोळे पाहून, या मालिकेविषयी आणखी जाणून घेण्याची इच्छा प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. आता 28 ऑक्टोबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

या मालिकेत काय आहे वेगळं

इच्छाधारी नागीण हा विषय असल्यामुळे स्क्रीनवर नागीण दाखवणं हा मुख्य मुद्दा असणार आहे. यासाठीच व्ही. एफ. एक्स तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. ‘थ्रीडी’ ऍनिमेशन करण्यासाठी प्रतिभावंत व्ही. एफ. एक्स. कलाकार लागतात. ज्यासाठी खूप वेळ आणि पैसे सुद्धा यासाठी खर्च होतात. मालिकेच्या डेडलाईन सांभाळून हे सगळं करणं, हे मोठं आव्हान होतं. मात्र आदिनाथच्या टीमने ते यशस्वीपणे पेललं आहे. या मालिकेसाठी आधूनिक तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करण्यात आलेला आहे. प्रेक्षकांना २८ ऑक्टोबरपासून ते अनुभवायला मिळणारच आहे. व्ही. एफ. एक्स.च्या वापरामुळे प्रेक्षकांना ही मालिका आणखीच वेगळी ठरेल यात शंका नाही. इच्छाधारी नागीण, हा विषय आता कॉमन होऊ लागलेला असला, तरी हा विषय विनोदी ढंगात ‘प्रेम, पॉयजन, पंगा’ या मालिकेतून मांडला जाणार आहे. त्यामुळे  तोच विषय एका भन्नाट आणि हटके स्टाईलने प्रेश्रकांना पाहायला मिळणार आहे.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

मराठी चित्रपटसृष्टीतील एकसे एक अभिनेते

आमिरने सैफसोबत काम करण्यासाठी इतर प्रोजेक्ट लांबणीवर

त्या घटनेनंतर कपिल शर्माला कळले वेळेचे महत्व, सेटवर पहाटेच हजर

Read More From मनोरंजन