मनोरंजन

साऊथची आणखी एक प्रसिद्ध जोडी होणार वेगळी… फॅन्सला बसला धक्का

Leenal Gawade  |  Jan 23, 2022
धनुष आणि ऐश्वर्या झाले वेगळे

 समँथा प्रभू आणि नागा चैतन्य वेगळे झाल्याची बातमी ताजी असतानाच आता साऊथच्या आणखी एका जोडीने घटस्फोट जाहीर केला आहे. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि अभिनेता धनुष या दोघांनी लग्नाच्या इतक्या वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ऐश्वर्या हिने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन ही घोषणा केली आहे. धनुषने मात्र अशी कोणतीही पोस्ट न केल्यामुळे फॅन्सला चांगलाच धक्का बसला आहे. 17 जानेवारी रोजी एक पोस्ट शेअर करुन त्यांनी ही माहिती दिलेली आहे.

ब्रेकअपवर व्यक्त झाली अभिनेत्री रुपाली भोसले, म्हणाली…

होणार वेगळे

धनुष आणि ऐश्वर्या गेली 18 वर्षे एकमेकांना ओळखत आहेत. त्यांनी मित्र आणि एक उत्तम जोडीदार अशी एकमेकांना साथ दिली आहे. पण असे असताना देखील त्यांच्यातील काही गोष्टींमुळे असणारे मतभेद आणि एकमेकांची वाट ही जोडपे म्हणून वेगळी असल्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा इतरांनीही आदर ठेवावा. इतकेच नाही तर या परिस्थितीत त्यांना त्यांचा वेळ स्वत:साठी घालवू द्यावा अशी विनंती देखील केली आहे. तिने ही पोस्ट शेअर केली असली तरी देखील धनुषने ही पोस्ट काही शेअर केलेली नाही.

एकत्र राहात असल्याची होत आहे चर्चा

धनुष आणि ऐश्वर्या हे वेगळे झाले असले तरी देखील त्यांनी एकमेकांसोबत दुरावा साधला असला तरी देखील ते काही ठिकाणी एकत्र असल्याचे अनेक ठिकाणी बोलले जात आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार धनुष आणि ऐश्वर्या हे काही दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये राहाहत होते. पण ते एकत्र होते याची पुष्टी देणारी कोणतीही माहिती नाही. पण अशी देखील माहिती समोर येत आहे की, हे दोघे त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी आले होते. ऐश्वर्या तिच्या शूटसाठी आली होती. तर धनुषही एका चित्रपटाच्या निमित्ताने तो तिथे आला होता. 

पाहता क्षणी पडली प्रेमात

ऐश्वर्या आणि धनुष यांची प्रेमकहाणी देखील खूप जणांना अगदी चित्रपटाची कहाणी वाटेल अशीच आहे. कारण धनुषच्या 2002 साली आलेल्या ‘काढल कोंडण’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या दरम्यान धनुषला स्क्रीनवर पाहून ती त्याच्या प्रेमात पडली होती. तिने मैत्रीचा हात पुढे करुन त्याला शुभेच्छा देण्यासाठी एक पुष्पगुच्छ पाठवून दिला. त्यानंतर त्यांच्यातील मैत्री चांगलीच वाढत गेली. त्याचे रुपांतर प्रेमात झाले. घरातल्यांना सांगितल्यानंतर घरातल्यांनी लगेचच त्यांच्या लग्नाला परवानगी देऊन टाकली. त्यानंतर त्यांनी थाटामाटात लग्न केले. साऊथमधली थल्ल्यवी रजनीकांत यांचा जावईमान मिरवणाऱ्या धनुषचे लग्नही त्यावेळी चांगलेच गाजलेले असे लग्न होते.  या दोघांना दोन मुलं असून त्यांच्यासोबतचे अनेक फोटो ऐश्वर्या शेअर करत असते.

गहराईयाँ’ ट्रेलरमधील दीपिकाचा बोल्ड सीन पाहून रणवीर सिंहने शेअर केली पोस्ट

नुकताच दिसला या चित्रपटात

धनुष नुकताच सारा अली खानसोबत अतरंगी रे या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटातील चकाचक हे गाणे चांगलेच गाजले. इतकेच नाही तर हा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आलेला या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. 

 
लग्नाच्या इतक्या वर्षानंतर या दोघांनी वेगळे होणे खूप जणांना पटलेले नाही.

गायक रोहीत राऊत आणि जुईलीच्या लग्नाची तयारी, लाडाची नवराई

Read More From मनोरंजन