ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
‘गहराईयाँ’ ट्रेलरमधील दीपिकाचा बोल्ड सीन पाहून रणवीर सिंहने शेअर केली पोस्ट

‘गहराईयाँ’ ट्रेलरमधील दीपिकाचा बोल्ड सीन पाहून रणवीर सिंहने शेअर केली पोस्ट

दीपिका पादुकोणचा गहराईयॉं चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर चर्चेचा विषय ठरला आहे. कारण या ट्रेलरमध्ये दीपिका पादुकोण आणि सिद्धार्थ चतुर्वेदीचे काही बोल्ड लव्ह सीन्स दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे चाहत्यांना चित्रपट कशा धाटणीचा असेल याचाल अंदाज आला आहे. या ट्रेलरमधील बोल्ड सीन्स पाहून दीपिकाचा पती अभिनेता रणवीर सिंहने त्याचं मत शेअर केलं आहे.

दीपिकाच्या बोल्ड लव्ह सीन्सवर काय आहे रणवीरची प्रतिक्रिया

गहराईयॉं चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. याचं कारण यातील दीपिकाचे हॉट आणि बोल्ड सीन्स दाखवण्यात आले आहेत. या ट्रेलरवर अनेक कलाकार आणि प्रेक्षकांच्या लाईक्स आणि प्रतिक्रियांचा वर्षाव होताना दिसत आहे.आलिया भट्ट, जोया अख्तर, चंकी पांडे, शनाया कपूर अशा अनेक कलाकारांनी दीपिकाच्या कामाचे यात कौतुक केलं आहे. दीपिकाचा पती आणि बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहने तर चक्क त्याचा इन्स्टा अकाऊंटवरून हा ट्रेलर शेअर केला आहे. ज्यासोबत त्याने दीपिकासाठी पोस्ट लिहीली आहे की, “मूडी, सेक्सी आणि इंटेंस, Domestic noir ? मला पण साईन  अप कर, सगळेच माझे आवडते कलाकार आहेत, शकुन बत्रा, अनन्या पांडे, सिद्धार्थ चतुर्वेदी, धेर्य करवा, नसीर दी लिजेंड” एवढंच नाही तर रणवीरने दीपिकाला टॅग करत शेअर केलं आहे, “आणि माझी बेबी गर्ल Fazillion buxxx प्रमाणे दिसत आहे. यावर अनन्याने कंमेट केली आहे की “तू माझा फेव्हरेट आहेस” सिद्धार्थने हार्ट इमोजी कंमेटमध्ये दिली आहे. धेर्य करवाने लिहीलं आहे की,” भाई आणि हार्ट इमोजी पोस्ट केलं आहे. अनेझॉन प्राईमने या व्हिडिओवर कंमेट केली आहे की, आम्ही या पोस्टच्या गहराईयॉं समजू शकतो.

कधी प्रदर्शित होणार गहराईयॉं

गहराईयॉं शकुन बत्राने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट एक रिलेशनशिप ड्रामा आहे. चार लोकांच्या नात्यातील गुंतागुंत यात दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स आहेत. या चित्रपटात नसरुद्धीन शाह आणि रजत कपूर यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत. अमेझॉन प्राईमवर हा चित्रपट 11 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

21 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT