आरोग्य

लॉकडाऊननंतर मुले झालीत एकलकोंडी

Dipali Naphade  |  Feb 21, 2022
after-the-lockdown-the children-become-lonely-in-marathi

कोविड-19 लॉकडाऊनमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला असल्याने, शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यांच्यापैकी बहुतेकांना वर्तणुकीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वेळेचा सदुपयोग करणे, संगीत ऐकणे, खेळणे तसेच आपले आवडते छंद जोपासण्यात मुलांना व्यस्त ठेवणे गरजेचे आहे. मुलांच्या शाळेतील वर्तणुकीतही झालाय बदल त्यामुळे मुलांना पुरेसा वेळ देण्याचा डॉक्टरांचा सल्ला. 

कोविड संसर्गाला आळा घालण्याकरिता देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला असून घराबाहेर पडता न आल्याने थोरा-मोठ्यांबरोबर लहान मुलांवरही तितकाच वाईट परिणाम झाला आहे शाळा, महाविद्यालये अशा शैक्षणिक संस्था बंद करून ई-लर्निंग सुरू करण्यात आले आणि सोशल डिस्टंसिंगमुळे मित्रपरिवार आणि नातेवाईकांना भेटता न आल्याने एकलकोंडेपणा वाढल्याचे दिसून आले आहे. कोविड-19 साथीच्या रोगाने सामाजिक संवाद आणि सार्वजनिक आयुष्यावर त्याचा मोठा परिणाम प्रमाणावर परिणाम केला. आता, शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर, बहुसंख्य मुलांना वर्तणुकीशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे.

काय सांगतात डॉक्टर  

डॉ. तुषार पारीख, नवजात शिशु तज्ञ आणि बालरोगतज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, पुणे सांगतात की सर्व वयोगटातील मोठ्या संख्येने मुलांना लॉकडाऊन कालावधीत तणावाचा सामना करावा लागला. विशेषत: 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुले ज्यांना शाळेत जाण्याची सवय होती त्यांच्यावर लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे वाईट परिणाम झाल्याचे दिसून आले. शाळेत जाऊ शकत नाही किंवा घराबाहेरील उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकत नसल्याने मुलांना वर्तणुकीशी संबंधित समस्या उद्भवत आहेत. मुले भारावून जातात, त्यांना कंडक्ट डिसऑर्डर (सीडी) किंवा ओपोजिशनल डिफाईएंट डिसऑर्डर (ओडीडी) सारख्या समस्या येतात ज्यामध्ये ते नियमांचे पालन करण्यास नकार देतात, इतरांबद्दल सहानुभूती नसते आणि वारंवार खोटे बोलतात. साथीच्या आजारादरम्यान मुलांमध्ये चिंता आणि ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) दिसून आले. ते वारंवार त्यांचे हात किंवा इतर स्टेशनरी स्वच्छ करतात, कोणीही जवळ आल्यावर किंवा मास्कशिवाय चालताना त्यांना भीती वाटते. अटेन्शन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) हे मूल आवेगपूर्ण, अतिक्रियाशील आणि लक्ष वेधून घेणारे असते. 

“डॉ पारीख पुढे सांगतात की, साथीच्या रोगाच्या काळात मुलांमध्ये दुःख, चिंता आणि नैराश्य आदी समस्या दिसून आल्या परिणामी अनेक लहान मुलांमध्ये अकारण रडणे, व्यत्यय आणणारे वर्तन, किशोरवयीन मुलांमधील हिंसाचार आणि गुंडगिरी वाढली आहे. मुले चिंताग्रस्त, तणावग्रस्त, निराश, चिडचिडी, उदास, गोंधळलेली, आक्रमक, दुःखी, चिंताग्रस्त, रागावलेले, हताश, सतत मुड बदलणे अशा सा-या समस्यांनी ग्रासलेले दिसून येत आहेत. कोविडकाळात काही मुलांना त्यांच्या प्रियजनांच्या मृत्यूमुळे त्यांना धक्का बसला, तर काहींना आपली आई सोडून जाईल अशी चिंता वाटते आणि त्यांनी संवाद साधणे बंद केले असून त्यांना एकटे वाटू लागले आहे. अशी मुले कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणे टाळतात, तर मारणे, नखं खाणे, वाद घालणे, दोष देणे, त्यांच्या पालकांवर आरडाओरडा करणे आणि त्यांना उत्तर देणे टाळतात. काही मुलांना झोप येत नाही,मळमळल्यासारखे वाटते, बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, पोटदुखीची तक्रार असते आणि भूक कमी लागते. त्यांना समाजात मिसळण्याची इच्छा नसते आणि त्यांना शाळेत जाण्याची किंवा घराबाहेर कुठेही जाण्याची भीती वाटू लागते

पालकांनी करावी मुलांना मदत  

पालकांनी मुलांना यातून बाहेर काढण्यास मदत करणे आवश्यक आहे. मुलांनी योगसाधना करावी, वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करावे, पुरेसा आराम करावा आणि झोप घ्यावी, चित्रपटांचा आनंद घ्यावा. पालकांनी अनेकदा मुलाशी संपर्क साधणे आवश्यक आहे आणि त्यांना त्रास होत असल्याची कोणतीही चिन्हे दिसून आल्यास त्याची नोंद घ्यावी आणि गरज पडल्यास तज्ञांचा सल्ला देखील घ्यावा.  रागाचे व्यवस्थापन हे निराशेची चिन्हे ओळखण्यात, राग कमी करण्यास आणि आक्रमक वर्तन सुधारण्यास मदत करू शकते. मुलांसाठी सर्वोत्तम थेरपी म्हणजे शक्य तितक्या लवकर प्री-कोविड रूटीनमध्ये परत जाणे. शाळांमधील शिक्षकांनी या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यांना यातुन बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मुलांसाठी एक सुरक्षित वातावरण तयार केले पाहिजे जेणेकरुन त्यांच्या वर्तणुकीतील आव्हानांवर मात करण्यास ते नक्कीच सक्षम होतील असेही डॉ पारीख यांनी स्पष्ट केले.

 डॉ. प्रदीप अलाटे, बालरोगतज्ञ,अपोलो स्पेक्ट्रा पुणे सांगतात की, लॉकडाऊनचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. पालकांनी मुलांमध्ये तणाव आणि वर्तनविषयक समस्या नोंदवल्या आहेत. मुलांमध्ये असुरक्षितता, नियंत्रणाचा अभाव, चिडचिड, निराशा, अतिक्रियाशील, हिंसक, आक्रमकपणा,एकटेपणा यासारख्या वर्तनविषयक समस्या दिसू येऊ लागल्या आहेत. शाळा पुन्हा सुरू झाल्यामुळे संज्ञानात्मक, भावनिक, शारीरिक आणि सामाजिक विकासाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आहे मुलांना अडचणी येऊ लागल्या आहेत. पालकांनी मुलाला सुरक्षित वातावरणाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. पालकांनी त्यांच्या मुलांसोबत अधिक वेळ घालवला पाहिजे,ज्यामुळे पालक-मुलांमध्ये संवाद होऊ शकतो. मुलांना त्यांच्या मित्रांशी व्हिडिओ कॉलद्वारे भेटता व बोलता येईल याचा प्रयत्न करावा.  तसेच मुलांचा  स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी विविध उपाय अवलंबविणे आणि मैदानी खेळ आणि कौटुंबिक संवादांवर लक्ष केंद्रित करणे तितकेच आवश्यक आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य