बॉलीवूड

लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार

Aaditi Datar  |  Jan 28, 2020
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार

बॉलीवूडमधला ‘मिस्टर डिपेंडेबल’ म्हणून ओळखला जात असलेल्या अभिनेता अजय देवगणची 100 वी कलाकृती असलेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटाने कमाल केली आहे. 200 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली मोहोर उमटवत असतानाच स्कोर ट्रेंड इंडियाच्या लोकप्रियतेच्या चार्टवरही अजय देवगण नंबर वन स्थानी विराजमान झालेला आहे.

जानेवारी महिन्यात तान्हाजी चित्रपटामुळे अजय देवगणच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झालेली दिसून येतेय. तान्हाजी चित्रपटाच्या प्रमोशनमुळे वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अजयने लोकप्रियतेत चौथं स्थान मिळवलं होतं. पण चित्रपट सिनेमागृहांमध्ये झळकताच अजय देवगणच्या लोकप्रियतेत वाढ झाली आणि अजय पहिल्या स्थानी पोहोचला.

मुलगी निसाच्या बॉलीवूड डेब्यूवर काजोलचा खुलासा

तान्हाजीच्या रिलीजवेळीच सुपरस्टार रजनीकांतचा ‘दरबार’ चित्रपटही झळकला. या सिनेमाच्या लोकप्रियतेमुळे रजनीकांतच्याही लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून येतेय. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत सिनेमाच्या रिलीजवेळी सातव्या स्थानावर तर चित्रपट रिलीज झाल्यावर सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानी स्थिरावला.

सुपरस्टार रजनीकांत यांना लोकप्रियतेत बॉलीवूडच्या तीन महारथींनी चांगलीच टक्कर दिली आहे. सलमान खान, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार या बॉलीवूडच्या तीन सुपरस्टार्सनी लोकप्रियतेत रजनीकांत यांना मागे टाकले आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

या आकडेवारीनुसार, डिजीटल न्यूज (सोशल प्लॅटफॉर्म आणि वेबसाईट), व्हायरल न्यूज आणि न्यूजप्रिंटवर अजय देवगण 95.98 गुणांसह प्रथम क्रमांकावर पोहोचलाय. तर 75. 24 या आकडेवारीनुसार, बिग बॉसचा होस्ट सुपरस्टार सलमान खान दुस-या स्थानावर आहे. बिग बॉस 13 हा शो सध्या त्यात होणा-या अनेक वाद-विवादांमुळे खूप चर्चेत आहे.भारतीय सिनेमाचे महानायक अमिताभ बच्चन 49.53 गुणांसह तिस-या स्थानावर आहेत. तर ब्लॉकबस्टर ‘कुमार’ म्हणून ओळखला जाणारा अक्षयकुमार आपल्या गुड न्यूज सिनेमाच्या सक्सेसमुळे बॉक्स ऑफिससोबतच लोकप्रियतेतही पुढे आहे. 31.98 गुणांसह अक्षय चौथ्या पदावर आहे. लिव्हिंग लिजंड रजनीकांत 26.17 गुणांसह लोकप्रियतेत पाचव्या स्थानावर आहे.

अजयची भेट झाली नसती तर शाहरूखसोबत लग्न…

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल याबाबत सांगतात की, “डिजीटल प्लॅटफॉर्म आणि न्यूज पोर्टल्सवर अजय देवगणची लोकप्रियता वाढलेली दिसून आलीय. तान्हाजीच्या लोकप्रियतेने बॉक्स ऑफिसवर तर कमाल केलीच. पण त्यासोबतच सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये केलेल्या शिवरायांचा आणि तान्हाजीच्या जयजयकाराची क्लिपही खूप व्हायरल झाली. या व्हिडियो क्लिपमुळेही तान्हाजीची लोकप्रियता दुप्पट झाली. ज्यामुळे अजय देवगणच्या लोकप्रियतेत वाढ झालेली आहे.“

कसा ठरवलं जातं हे रँकिंग

अश्वनी कौल या रँकिगबाबत सांगतात की, “आम्ही मीडिया विश्लेषणासाठी 14 भाषांमध्ये 600 पेक्षा जास्त बातम्यांमधून डेटा संग्रहित करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, प्रिंट प्रकाशन, सोशल मीडिया, व्हायरल न्यूज, प्रकाशनं आणि डिजीटल प्लेटफॉर्म समाविष्ट आहेत. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचू शकतो.”

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

 

Read More From बॉलीवूड