बॉलीवूड

इंडो-चायना गलवान तणावावर अजय देवगण बनवणार चित्रपट

Leenal Gawade  |  Jul 5, 2020
इंडो-चायना गलवान तणावावर अजय देवगण बनवणार चित्रपट

चीनमधून भारतात आलेल्या कोरोनामुळे आधीच अनेक देशांचा डोळा चीनकडे आहे. त्यातच भारत-चीन सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा डोकं वर काढू लागला आहे. देशभरात सगळीकडे लॉकडाऊनची परिस्थिती असताना चीन याच लॉकडाऊनचा फायदा घेत सीमेवर अधिक पाहारा आणून ठेवत आहे. पण हा वाद काही नवा नाही. भारत-चीन या देशांच्या सीमा अनिर्णित असल्यामुळे अनेकदा हा वाद उफाळून आला आहे. इंडो-चीनच्या सीमावादातील गलवान व्हॅली आणि तेथे झालेल्या चकमकीवर लवकरच एक चित्रपट बनवणार आहे. अभिनेता अजय देवगण या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे देखील कळत आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा देखील ट्विटरवर करण्यात आली आहे. पण अद्याप अजय देवगणने या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.

या साऊथ सुपरस्टारला जीवे मारण्याची धमकी

शूर जवानांना श्रद्धांजली

Instagram

देशातील सध्याची परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. 15 -16 जून हा दिवस देशातील कोणतीच व्यक्ती विसरु शकणार नाही.चीनने गलवान व्हॅलीमध्ये झालेला प्रकारही अनेकांना माहीत आहे. या ठिकाणी चीनी सैनिक एका डोंगरावर गस्त घालून बसले होते. त्यांच्याशी बोलण्यासाठी  ज्यावेळी भारतीय सैनिक गेले. त्यावेळी समजूतीची भाषा सोडून चिनी सैन्य दमदाटी करु लागले. त्यांनी भारतीय सैन्यावर हल्ला केला. पण यावेळी दोघांनीही बंदुकीचा वापर केला नाही. त्यांनी बलाचा उपयोग करुन लढाई करायला सुरुवात केली. हातात जे काही मिळेल त्याचा उपयोग करुन त्यांनी हल्ला केला. मोठ्या धैर्याने आणि कमी संंख्येत असूनही लढा दिला.हा लढा तेथील परिस्थिती यावरच हा चित्रपट तयार केला जाणार आहे. याची अधिकृत घोषणा अजय देवगण कधी करेल याची सगळेच वाट पाहात आहेत. 

अभिनेत्री अमृता रावचा गणेशोत्सवाबाबत ‘हा’ सल्ला पर्यावरणासाठी आहे मोलाचा

चीनी अॅप्सवर आणली बंदी

चीनने कोरोना व्हायरस सगळ्या जगभर पसरवला त्यामुळे अनेक बड्या देशांना आर्थिक हानी पोहोचू लागली. कोरोनावर कोणतेही औषध अद्याप कोणत्याही देशाने शोधून काढले नाही. सगळ्या देशांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले. विशेषत: भारताला याचा त्रास सहन करावा लागला.  त्यामुळे अनेक चायनीज गोष्टींवर भारताने आणि भारतीयांंनी बॅन आणले आहे. देशात 1 जुलैपासून सगळे चिनी अॅप बंद करण्यात आले आहेत. यामध्ये टिकटॉक सारख्या मोठ्या अॅपचाही समावेश आहे. देशातील कोणीच याचा वापर करुन नये यासाठी हे अॅप बंद केले असून आता कोणालाही या अॅपचा उपयोग करता येणार नाही. 

वाढीव वीजबिलामुळे बॉलीवूड स्टारही झाले हैराण

अजय देवगणच्या चित्रपटाची प्रतिक्षा

तान्हाजी ही भूमिका हा चित्रपट पडद्यावर आणल्यानंतर आता अजय देवगणकडून त्याच्या फॅन्सना खूप अपेक्षा आहे. देशात दोन महिने सगळे काही ठप्प होते. पण आता शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे. मालिकांनी त्यांचे शूटिंग सुरु केले आहे. चित्रपटांचे शूटिंगही अत्यंत सावधपणे आणि कोरोनाची लागण होऊ नये याची काळजी घेऊनच केले जाणार आहे. 

अजय देवगणचा हा चित्रपट नक्कीच एक सुपरडुपर हिट असेल यात काही शंका नाही. तान्हाजीनंतर हाच चित्रपट लोकांच्या मनावर राज्य करणार आहे हे नक्की!

Read More From बॉलीवूड