Care

केवळ पोटासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे ओवा 

Vaidehi Raje  |  Jun 16, 2022
carom seeds benefits for skin

ओवा हा पदार्थ जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सापडेलच. कारण ओवा एक आवश्यक मसाल्यांपैकी एक आहे. ओव्याचा समावेश केल्याशिवाय बहुतेक पदार्थ अपूर्ण राहतात. ओवा हा आजीबाईच्या बटव्यातील सुद्धा एक आवश्यक औषध आहे. पोटात दुखतेय किंवा ऍसिडिटी झाली आहे, किंवा गॅस झालाय तर थोडा भाजलेला ओवा खाऊन त्यावर कोमट पाणी प्यायल्यास लगेच गॅस कमी होतो आणि पोटदुखीपासून आराम मिळतो. लहान बाळांना कफ झाला असेल तर थोडा ओवा गरम करून त्याची पुरचुंडी बांधून बाळाची छाती शेकल्यास बाळाला आराम मिळतो. तसेच बाळाचे पोट गॅसमुळे फुगले असेल तर ओव्याचा शेक घेतल्यास बाळाचा त्रास कमी होतो. पण तुम्हाला माहितेय का की ओवा आपल्या त्वचेसाठी व केसांसाठीही फायदेशीर आहे. त्वचेसाठी ओवा वापरल्याने त्वचेला चमक येते. ओव्याचा वापर त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारे केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया ओव्याचे त्वचेसाठी व केसांसाठी होणारे फायदे.

मुरुमांसाठी ओव्याचा फेस मास्क

अनेक मुलींना व स्त्रियांना पिंपल्सचा त्रास होतो. पण ओव्याचा फेसमास्क वापरून पिंपल्सपासून सुटका मिळू शकते. पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी एका भांड्यात ओवा पावडर घ्या. या पावडरमध्ये दही मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनी चेहरा धुवा.

Ajwain Benefits For Skin

सुरकुत्यांसाठी ओव्याचा फेस मास्क 

ओवा हा त्वचेला केवळ चमकच देत नाही तर त्वचेवरील सुरकुत्याही कमी करतो. ऊन आणि धुळीमुळे त्वचेवर सुरकुत्या पडतात. सुरकुत्यांमुळे आपण अकाली म्हातारे दिसू लागतो. ओव्याच्या मदतीने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करता येतात कारण ओवा त्वचेला खोलवर  पोषण देतो, ज्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.  

यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात ओवा घाला. पाणी थंड झाल्यावर गाळून घ्या आणि ओवा बारीक करा. या पेस्टमध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनी चेहरा धुवा.

चमकदार त्वचेसाठी ओव्याचे पाणी प्या

चेहऱ्याच्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी ओव्याचे पाणी खूप फायदेशीर मानले जाते. ओव्याचे पाणी त्वचेला खोलवर स्वच्छ करते. हे पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते ज्यामुळे चेहरा मऊ, नितळ आणि चमकदार दिसतो. ओव्याचे पाणी प्यायल्याने पोटाच्या तक्रारी देखील चार हात लांब राहतात. 

Ajwain Benefits For Skin

ओव्याचे स्क्रब

ओव्याचे स्क्रब हे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे स्क्रब वापरल्याने टॅनिंग, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कमी होतात ज्यामुळे त्वचा चमकदार होते. स्क्रब बनवण्यासाठी एका भांड्यात एक चमचा ओवा पावडरमध्ये साखर आणि लिंबाचा रस मिसळून स्क्रब बनवा. या स्क्रबने चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. 1 ते 2 मिनिटे हलक्या हातांनी मसाज केल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा.

पांढऱ्या केसांपासून मुक्ती 

केसांसाठी ओव्याचा एक आवश्यक फायदा म्हणजे पांढऱ्या केसांना प्रतिबंध करणे. केसांसाठी ओवा वापरल्याने केस मजबूत होतात आणि त्यातील पौष्टिक घटक पांढऱ्या केसांची वाढ थांबवतात. तुमचेही केस लवकर पांढरे होत असल्यास एका ग्लासमध्ये साधे पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे भाजलेला ओवा घाला. दुसऱ्या दिवशी सकाळी हे ओव्याचे पाणी गाळून घ्या व जेवण करण्यापूर्वी ते प्या. 

तसेच तुम्ही केसांना कॅरम सीड ऑइल देखील लावू शकता. यासाठी तुमच्या तळहातावर कॅरम सीड ऑइलचे काही थेंब घ्या. तेल गरम करण्यासाठी आपले तळवे एकत्र घासून घ्या. ते तुमच्या टाळूवर लावा आणि डोक्याला मसाज करा.तेल तुमच्या टाळूवर रात्रभर राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पूने केस व्यवस्थित धुवा. 

अशा प्रकारे तुम्ही निरोगी त्वचेसाठी व काळ्याभोर केसांसाठी ओव्याचा वापर करू शकता. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Care