Care

जास्त प्रमाणात कंडिशनरचा वापर केल्याने होते केसांचे नुकसान 

Vaidehi Raje  |  Aug 8, 2022
Right Amount of Hair Conditioner

प्रत्येकाला आपले केस रेशमी, चमकदार आणि निरोगी ठेवण्याची इच्छा असते. म्हणूनच बहुतेक लोक केसांना कंडिशनर लावतात. परंतु केसांसाठी जास्त कंडिशनर वापरणे देखील धोक्याचे असू शकते.जास्त कंडिशनर वापरल्याने तुमचे केस जास्त स्निग्ध किंवा तेलकट होण्याचा धोका असतो. जास्त प्रमाणात कंडिशनरचा वापर केल्याने केस सुंदरआणि मुलायम होण्याऐवजी कोरडे आणि कमकुवत होऊ शकतात. म्हणूनच कंडिशनरचा वापर संतुलित करणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया कंडिशनर किती वेळा वापरावे. 

कंडिशनर कसे काम करते 

कंडिशनर हे केसांसाठीचे मॉइश्चरायझर आहे. हे कोरड्या आणि ठिसूळ केसांवर एक गुळगुळीत थर तयार करते. त्यामुळे केसांचा गुंता होत नाही आणि नंतर ते विंचरणे सोपे जाते. तसेच कंडिशनर हे केसांवर एक संरक्षक थराप्रमाणे काम करते. हे सहसा cationic surfactants चे बनलेले असते. हे तुमचे केस गुळगुळीत करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त कंडिशनरमध्ये इमोलिएंट्स, तेल आणि कधीकधी सिलिकॉन देखील वापरले जातात. सिलिकॉन हे केस चमकदार बनवण्यासाठी आणि गुंता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. कंडिशनर केसांना मॉइश्चरायझ करण्यासोबतच ते चमकदार आणि मऊ आणि सरळ बनवण्याचे काम करते. हे केसांना उष्णतेमुळे झालेल्या  नुकसानापासून बरे होण्यास मदत करते. तसेच हेअर ड्रायर आणि कर्लिंग आयरनमुळे होणारे नुकसानही टाळते व केसांचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.

Using Conditioner In Right Way

कंडिशनरचा वापर योग्य प्रमाणात करावा  

अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या मते, आठवड्यातून काही दिवस कंडिशनर वापरणे केसांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. जर तुमचे केस खूप तेलकट किंवा नाजूक असतील, तर कंडिशनरचा वापर कमी प्रमाणात करावा. अतिरिक्त कंडिशनरमुळे केस गळण्याचा धोका वाढतो. तुम्ही तुमचे केस जितके चांगले कंडिशन कराल तितका त्याचा परिणाम चांगला होईल. तुम्ही संपूर्ण केसांवर कंडिशनर लावू शकता. पण पातळ किंवा तेलकट केस असलेल्या लोकांनी ते टाळावे. 

ओव्हर कंडिशनिंग करणे टाळा 

Using Conditioner In Right Way

कंडिशनरचा वापर संतुलित पद्धतीने केल्यास केसांना अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. पण जर तुम्ही तुमचे केस ओव्हर कंडिशनिंग करत असाल तर काळजी घ्या. यामुळे तुमच्या केसांना अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. केस लवकर व अधिक तेलकट होणे, केस बाऊन्सी होण्याऐवजी स्कॅल्पला चिकटून बसणे, जास्त चमक किंवा चकचकीतपणा, उन्हाळ्यात केस विंचरताना त्रास होणे ही कोणतीही लक्षणे तुमच्या केसांमध्ये दिसत असतील तर कंडिशनरचा वापर कमी करावा. जर तुम्ही केसांमध्ये कंडिशनरचा वापर संतुलित पद्धतीने केला तर तुम्हाला तुमचे केस चमकदार आणि निरोगी ठेवण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

तसेच ओव्हरकंडिशनप्रमाणेच अंडरकंडिशन देखील केसांसाठी एक समस्या आहे. त्याची काही लक्षणे म्हणजे केसांचा गुंता होणे, कोरड्या किंवा ठिसूळ वायरप्रमाणे केस सहजपणे तुटणे, केस कुरळे होणे, केस निस्तेज होणे इत्यादी. जर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर काळजी करू नका. फक्त केसांना चांगले कंडिशन करा, जास्त वेळा केसांना कंडिशनर लावण्याचा प्रयत्न करा. केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी डीप कंडिशनिंग करा.

तुम्ही तुमचे केस किती वेळा कंडिशन करावे हे तुमच्या केसांच्या प्रकारावर आणि कंडिशनरवर अवलंबून असते. पातळ किंवा तेलकट केसांसाठी, रिन्स-आउट कंडिशनर किंवा क्लींजिंग कंडिशनर आठवड्यातून दोनदा वापरावे. तर जाड, कुरळे किंवा कोरडे केस असलेल्या लोकांनी त्यांचे केस अधिक वेळा कंडिशन करावे. केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही लीव्ह इन किंवा डीप कंडिशनर देखील लावू शकता.

Photo Credit- istock

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Care