मनोरंजन

अक्षय कुमारने ‘रक्षाबंधन’साठी वाढवलं पाच किलो वजन, सेटवरचे फोटो व्हायरल

Trupti Paradkar  |  Jul 11, 2021
अक्षय कुमारने ‘रक्षाबंधन’साठी वाढवलं पाच किलो वजन, सेटवरचे फोटो व्हायरल

अभिनेता अक्षय कुमार कोरोनाच्या काळातही त्याचे आगामी चित्रपट वेळेत पूर्ण करण्याच्या प्रयत्न  करताना दिसत आहे. सूर्यवंशीनंतर तो आता लगेच रक्षाबंधन चित्रपटाच्या तयारीसाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे रक्षाबंधनसाठी अक्षय कुमारने तब्बल पाच किलो वजन वाढवलं आहे. अक्षय कुमार एक फिटेनस फ्रिक अभिनेता आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठणं, नियमित व्यायाम करणं, रात्री वेळेवर झोपणं आणि योग्य आहार घेणं हा त्याचा नित्यक्रम आहे. सध्या त्याचे रक्षाबंधनसाठी वाढवलेल्या वजनाचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. अक्षय कुमारने सूर्यवंशी चित्रपटासाठी सहा किलो वजन कमी होतं तर नंतर रक्षाबंधनसाठी पाच किलो वजन वाढवलं आहे. जाणून घ्या कसं केलं त्याने स्वतःचे वजन कमी जास्त…

अक्षयने असं वाढवलं वजन

अक्षय कुमार सध्या आनंद राय यांच्या रक्षाबंधन सेटवरील शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो दिल्लीतील एका सामान्य व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी अक्षयला त्याचे वजन कमीत कमी पाच किलोने वाढवण्याची गरज होती. त्याआधीच त्याने सूर्यवंशीसाठी सहा किलो वजन कमी  केलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय वजन कमी करणं आणि वाढवण्याची प्रोसेस खूपच एन्जॉय करताना दिसत आहे. कारण तो वजनामध्ये केले जाणारे बदल हे निरोगी आणि स्वास्थाच्या दृष्टीने योग्य अशा पद्धतीने करतो. जसं की वजन वाढवणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पाच किलो वजन वाढवण्यासाठी त्याने त्याच्या आईच्या हातचा हलवा खाणं पसंत केलं. ज्यामुळे त्याचे वजन सहज वाढू शकले असं त्याचे मत आहे. 

अक्षयने रक्षाबंधन चित्रपट या व्यक्तीला केला समर्पित

अक्षय कुमारच्या रक्षाबंधनचे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. या चित्रपटात अक्षयसोबत आणखी पाच नवीन कलाकार झळकणार आहेत. या पाचजणी चित्रपटात अक्षयच्या बहिणीच्या भूमिका साकारणार आहेत. भूमी पेडणेकर या चित्रपटात अक्षयसोबत मुख्य भूमिकेत असेल. तर सहेजमीन कौर, दीपिका खन्ना, सदीया खतीब, स्मृती श्रीकांत या त्याच्या बहिणींच्या भूमिकेत असणार आहेत. थोडक्यात सर्वांनी एकत्र बसून पाहण्यासारखा हा एक फॅमिला ड्रामा असणार आहे.  या चित्रपटाबाबत पोस्ट करताना अक्षयने शेअर केलं होतं की, जेव्हा मी मोठा होत होतो माझी बहीण अलका माझी सर्वात पहिली मैत्रीण होती. ही मैत्री अगदी सहज होती. आनंद एल रायचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट मी माझ्या बहीण आणि आमच्या प्रेमळ नात्याला समर्पित करतो. आज चित्रपटाचा पहिला दिवस आहे. तुमचे प्रेम आणि आर्शीवाद असेच राहू द्या ” या चित्रपटातील भूमिका अक्षयने त्याची सख्खी बहीण अलका हीरानंदानीला डेडिकेट केली आहे. 

यासोबतच अक्षय लवकरच सूर्यवंशी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत कैतरिना कैफची मुख्य भूमिका असेल. हा चित्रपट दोन वेळा झालेल्या लॉकडाऊनमुळे चांगलाच रखडला आहे. या व्यतिरिक्च अक्षयचा बेल बॉटम लवकरच प्रदर्शित होणार आहे. रंजीत तिवारीने दिग्दर्शित केलेला हा एक थ्रीलर चित्रपट असेल. ज्यात अक्षय कुमारसोबत वाणी कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्ता आणि आदिल हुसैन यांच्या मुख्य भूमिका असतील. यासोबतच अक्षय अतरंगी रे, पृथ्वीराज बच्चन पांडे, रामसेतूमध्ये  लवकरच दिसणार आहे.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

दिलबरो म्हणत मुलीची केली पाठवणी, सुनील बर्वेचा व्हिडिओ व्हायरल

मीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता, ‘अजूनही बरसात आहे’

राहुल वैद्य आणि दिशा परमार करणार 16 जुलैला लग्न

Read More From मनोरंजन