Festival

अक्षय्य तृतीयेची माहिती आणि महत्त्व (Akshaya Tritiya Information In Marathi)

Trupti Paradkar  |  May 4, 2021
Akshaya Tritiya Information In Marathi

अक्षय्य तृतीया हा सण साडे तीन शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो. भारतीय हिंदू कालदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडे तीन शुभ मुहूर्त मानले जातात. दसरा, गुडीपाढवा आणि अक्षय्य तृतीया हे यापैकी तीन असून दिवाळी पाडवा हा अर्धा शुभ मुहूर्त मानला जातो. या चारही दिवशी कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही असं मानलं जातं. त्यामुळेच अक्षय्य तृतीयेला मुहूर्त न पाहता शुभ कार्य करण्याची पद्धत आहे. अक्षय्य म्हणजे कधीच नाश न पावणारे त्यामुळेही या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी लग्न, गृह प्रवेश, आर्थिक गुंतवणूक, धार्मिक विधी अथवा सोने खरेदी अशी कोणतीही गोष्ट करणं शुभ मानलं जातं. कारण या  दिवशी केलेली गोष्ट अनंत काळ टिकते. अक्षय तृतीयेला दान धर्म करण्याचीही प्रथा आहे. यासाठीच जाणून घेऊया अक्षय्य तृतीया महत्त्व आणि माहिती (Akshaya Tritiya Information In Marathi) त्यासोबत सर्वांना द्या अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

अक्षय्य तृतीया २०२१ दिनांक आणि शुभ काळ (Akshaya Tritiya Information In Marathi)

भारतीय हिंदू कालदर्शिकेप्रमाणे दर वर्षी वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya In Marathi) येते. या वर्षी  १४ मे २०२१ रोजी अक्षय्य तृतीया आहे. अक्षय तृतीया हा साडे तीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असला तरी काही विशेष शुभ कार्यासाठी या दिवसामधील सर्वात जास्त शुभ काळ कोणता हे पाहिलं जातं. या शुभ काळात पूजाविधी आणि शुभकर्मे केली जातात. यंदा अक्षय्य तृतीयेचा शुभ काळ हा सकाळी ५:३८ ते संध्याकाळी ७:५९ पर्यंत आहे असं सांगण्यात येत आहे. अक्षय्य तृतीयेला पहाटे ५:३८ ते दुपारी १२:१८ पर्यंत धार्मिक विधी आणि पूजा अर्चना करणं शुभ ठरू शकतं. 

अक्षय्य तृतीयेचा इतिहास (History Of Akshaya Tritiya)

अक्षय्य तृतीया बाबत अनेक पौराणिक कथा पुराणात सांगण्यात आलेल्या आहेत. एका आख्यायिकेनुसार या दिवशी सुदामा आपला बालपणीचा मित्र भगवान श्रीकृष्णाच्या घरी  गेला होता. श्रीकृष्णाच्या भेटीसाठी जाताना सुदामा त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार मूठभर पोहे घेऊन गेला होता. मात्र श्रीकृष्णाचे ऐश्वर्य पाहून त्याला त्याची भेट श्रीकृष्णाला देण्याचा संकोच वाटला. भगवान श्रीकृष्णाने दिव्य दृष्टी आणि मित्रावरील असीम प्रेमामुळे सुदाम्याच्या मनातील घालमेळ ओळखली आणि हट्ट करून सुदाम्याचे पोहे खाल्ले. शिवाय श्रीकृष्णाने आपल्या घरी आलेल्या सुदाम्याचा योग्य आदर सत्कार केला. वास्तविक सुदामा त्याच्या पत्नीच्या हट्टामुळे श्रीकृष्णाकडे आर्थिक मदत मागण्यासाठी गेला होता. मात्र श्रीकृष्णाला भेटल्यानंतर सुदाम्याला इतका आनंद झाला की तो त्याची आर्थिक परिस्थिती आणि संसारातील अडचणी न सांगताच पुन्हा आपल्या घरी परतला. घरी येताच सुदामा आश्चर्य चकित झाला कारण त्याची आर्थिक परिस्थिती अचानक बदलून त्याच्या झोपडीचे भव्य दिव्य राजवाड्यात रुपांतर झाले होते. श्रीकृष्णाच्या किमयेने सारे काही घडले होते हे सुदामाला समजले. मित्र श्रीकृष्णाच्या कृपाशिर्वादाने सुदामा श्रीमंत झाला होता. तेव्हापासून सुख, समृद्धी आणि संपत्तीचा वर्षाव करणारा हा दिवस अक्षय्य तृतीया या नावाने साजरा केला जाऊ लागला. त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेला सत्य युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. यासाठीदेखील या दिवसाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवाय या दिवशी नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव अशा थोर पुरुषांच्या जन्मदिवसाचा इतिहास आहे. 

अक्षय्य तृतीतेचे धार्मिक महत्त्व (Akshaya Tritiya Religious Significance)

भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथांनुसार अक्षय तृतीयेला अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. पौराणिक कथांनुसार असं सांगण्यात येतं की,

अक्षय्य तृतीयेला केले जाणारे धार्मिक विधी (Rituals During Akshaya Tritiya)

अक्षय्य तृतीया हा संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख सण  आहे. या दिवशी सुख समृद्धीच्या प्राप्तीसाठी अनेक धार्मिक विधी केले जातात.

You Might Also Like

Akshaya Tritiya Quotes in English

Read More From Festival