मनोरंजन

अभिनेत्री अवनीत कौरची इमोशनल गुडबाय नोट, अलाद्दीन मालिकेमधून घेतली एक्झिट

Trupti Paradkar  |  Jul 2, 2020
अभिनेत्री अवनीत कौरची इमोशनल गुडबाय नोट, अलाद्दीन मालिकेमधून घेतली एक्झिट

हिंदी टेलिव्हिजनवरील ‘अलाद्दीन – नाम तो सुना होगा’ ही मालिका फारच कमी वेळात लोकप्रिय झाली. या मालिकेतील यास्मिनची भूमिका साकारणारी अभिनेत्री अवनीत कौरला या मालिकेतून नवी ओळख मिळाली होती. चाहत्यांमध्ये ती अलाद्दीनची ‘यास्मिन’ या नावाने प्रसिद्ध होती. मात्र आता अवनीतला अचानक ही मालिका सोडावी लागत आहे. या मालिकेला अलविदा करताना अवनीत खूपच भावूक झाली आहे. अवनीतने नुकतीच एक भावनिक पोस्ट तिच्या इंस्टा अकाउंटवर शेअर करत चाहत्यांना गुडबाय केलं आहे. यास्मिनच्या फॅन्ससाठी तिने ही शेवटची इमोशनल गुडबाय नोट लिहीली आहे.

अवनीतने काय लिहीलं आहे या गुडबाय नोटमध्ये

अवनीत कौर आणि अलाद्दीनची यास्मिन हे एक अजब रसायन होतं. मात्र अवनीतने आता ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिने इंस्टावर शेअर केलं आहे की,” मी माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग सोडत आहे असं मला वाटत आहे. यास्मिनची भूमिका कायम माझ्या ह्रदयाच्या जवळच असेल. यास्मिन ही एक अशी भूमिका आहे. ज्याची सुरूवात एखाद्या फेअरीटेलप्रमाणे नसून एका लढवय्या, योध्या राजकुमारीने झाली होती. या भूमिकेमधून मला बरंच काही शिकायला मिळालं आहे. मग ते घोडेस्वारी असो अथवा एखादा स्टंट स्वतः करणं असो. या भूमिकेत मी खऱ्या अर्थाने एखाद्या राजकुमारीप्रमाणे जगले. माझ्या भूमिकेतील या प्रवासाला सुंदर करणाऱ्या प्रत्येकाची मी कृतज्ञ आहे. सर्व फॅन्सच्या प्रेम आणि सहकार्यासाठी मनापासून धन्यवाद”.

अवनीत कौरने यासाठी सोडली अलाद्दीन मालिका

अवनीत कौरने ‘अलाद्दीन’ मालिका सोडण्यामागे अनेक कारणं असण्याची शक्यता आहे. मात्र सध्या या मालिकेत तिला रिप्लेस केलं गेल्याची चर्चा जास्त आहे. आता या मालिकेत अवनीत कौरच्या जागी आशी सिंह असण्याची शक्यता आहे.आशी सिंहने यापूर्वी लोकप्रिय मालिका ‘उन दिनों की बात है’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. अवनीत कौरने ही मालिका का सोडली याबाबत तिने कोणताच खुलासा तिच्या पोस्टमध्ये केलेला नाही. मात्र कोरोना महामारीमुळे तिने ही मालिका सोडली असण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी अवनीतला डेंग्यू झाला होता. ज्यामुळे तिची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहो. म्हणूनच तिने तिच्या आरोग्यासाठी हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. 

Instagram

‘डान्स इंडिया डान्स’ मधून सुरू झाला अभिनयाचा प्रवास

अवनीत कौर एक लोकप्रिय हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. तिने अनेक लोकप्रिय मालिकांमधून यापूर्वी काम केलेलं आहे. चंद्र नंदिनी, मेरी मॉं, सावित्री, हमारी सिस्टर दिदी, एक मुस्कान अशा मालिकांमध्ये तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळालेली आहे. याचप्रमाणे अवनीतने मर्दानी 2 या चित्रपटामध्येही झळकली होती. झलक दिखला जा च्या पाचव्या सिझनमध्ये तिच्या नृ्त्याच्या अदांनी तिने चाहत्यांना घायाळ केलं होतं. अवनीतने तिच्या करिअरची सुरूवातदेएखील डांस इंडिया डांस या लिटिल मास्टर्सच्या डान्स शोमधून केली होती. काही दिवसांपूर्वी तिचे टिकटॉक व्हिडिओ व्हायरल झाले होते. मात्र आता या अॅपवर शासनाकडून बंदी असल्यामुळे ती याही माध्यमापासून सध्या दूर गेली आहे. शिवाय तिने आता अलाद्दीन मालिकाही सोडल्यामुळे चाहते नक्कीच निराश झाले आहेत. मात्र कोरोनाचे संकट दूर झाल्यावर अवनीतला नवीन भूमिकेत नक्कीच पाहता येईल अशी त्यांना आशा वाटत आहे.

Instagram

अधिक वाचा –

होम डिलिव्हरी झालेल्या भाज्या पाहून अभिनेत्री जुही चावला संभ्रमात

रितेश आणि जेनेलियाचा आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय, सोशल मीडियावर केले शेअर

सुशांत सिंह राजपूतचा हा फोटो तुम्हालाही करेल भावुक

Read More From मनोरंजन