बॉलीवूडमध्ये एकत्र काम करत प्रेमात पडणं आणि लग्न करणं हे आता नवं राहिलेलं नाही. अशा अनेक जोड्या आहेत ज्यांची चित्रपटाच्या सेटवर मैत्री झाली मग प्रेमात त्यांनी एकत्र राहायला सुरुवात केली आणि लग्न केलं. काजोल देवगण – अजय देवगण, दीपिका – रणवीर, अक्षय कुमार – ट्विंकल खन्ना अशा अनेक जोड्या आहेत. अनेक वर्ष डेट केल्यानंतर लग्न केले. आता बॉलीवूड इंंडस्ट्रीमध्ये अजून एका जोडीचं नाव जोडलं जाणार आहे. लवकरच ही जोडी लग्न करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. हे नाव आहे रिचा चढ्ढा आणि अली फजल यांचं. गेले कित्येक वर्ष अली आणि रिचा एकमेकांना डेट करत आहेत आणि या दोघांनीही आपलं प्रेम सर्वांसमोर केव्हाच मंजूर केलं. आता कित्येक वर्षाच्या डेटिंगनंतर हे दोघेही पुढचं पाऊल उचलायला सज्ज असून लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे. समुद्रकिनाऱ्यावर करणार लग्न असंही म्हटलं जात आहे.
लवकरच करणार रिचा आणि अली लग्न
बॉलीवूड कपल रिचा चढ्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) ने 2017 मध्ये आपण एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले होते. तेव्हापासूनच हे दोघे कधी लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला जात होता. ‘फुकरे’ चित्रपटामध्ये या दोघांचे भांडण जितके प्रेक्षकांना आवडले होते, रियल लाईफमध्ये या दोघांची जोडी तितकीच प्रेक्षकांना आणि त्यांच्या चाहत्यांना आवडत आहे. या दोघांचा वाढदिवस असो वा चित्रपट कुठेही रिकामा वेळ मिळाला की नेहमीच हे दोघे एकमेकांना वेळ देताना दिसतात. या दोघांनाही समुद्रकिनारे खूप आवडतात त्यामुळेच अली फजल आणि रिचा चढ्ढा हे दोघे समुद्रकिनारीच लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. कारण अलीने रिचाला मालदिव्सच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर प्रपोज केले होते.
जेव्हा सेटवर दिसला ‘या’ कलाकाराचा शिस्तबद्ध अवतार
लग्नात करणार धमाल
बॉलीवूड अभिनेत्री रिचा आणि अली हे एकमेकांना 5 वर्ष डेट करत आहेत. आता पाच वर्षानंतर हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. यावर्षी एप्रिल महिन्यात हे दोघे लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच या दोघांच्या लग्नाचा समारंभ हा बरेच दिवस चालणार असल्याचंही म्हटलं जात आहे. अगदी दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत यांच्या लग्नाची धूम असणार आहे. 15 एप्रिलला अली आणि रिचाच्या दिल्लीतील मित्रमैत्रिणी आणि घरातील जवळच्या मंडळींमध्ये लग्नाचे रितीरिवाज करण्यात येणार आहेत आणि त्यानंतर तिथे रिसेप्शन दिल्यानंतर ही जोडी मुंबईसाठी रवाना होईल. मुंबईमध्ये आपल्या काही खास मित्रमैत्रिणींसाठी 21 एप्रिल रोजी समुद्रकिनाऱ्यावर ‘बीच वेडिंग’ (beach wedding) करणार असल्याचंही म्हटलं गेलं आहे.
प्रेमात असूनही लग्न करु शकल्या नाहीत या सेलिब्रिटी जोड्या
‘फुकरे’ नंतर झाली मैत्री
रिचा आणि अलीने 2012 मध्ये एकत्र ‘फुकरे’ हा चित्रपट केला होता. हा चित्रपट आणि यातील दोघांची दुश्मनी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. त्यावेळी खऱ्या आयुष्यात हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतील असं कोणालाही वाटलं नसेल. पण साधारण तीन वर्षांनी हे दोघं एकमेकांना डेट करायला लागले आणि जन्मभर एकत्र राहण्याइतकंं हे नातं गंभीर होतं आणि ते टिकलंही. 2015 मध्ये हे दोघं एकमेकांसह जास्त राहू लागले. दोन वर्ष मीडियापासूनही त्यांचं हे नातं लपून राहिलं. पण 2017 मध्ये दोघांनीही आपलं नातं स्वीकारलं. आता पाच वर्षांनंतर ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे.
जेव्हा आजोबांना आले अमिताभजींचे पत्र…
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje