बॉलीवूड सेलिब्रेटीजचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल होत असतात. आपल्या आवडत्या सेलिब्रेटीजचे फोटो पाहून चाहते लगेच त्यावर लाईक्स आणि कंमेट्सचा वर्षाव करतात. पण कधी कधी जर एखादी गोष्ट खटकली तर बिनधास्त ट्रोल करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. नुकतंच बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट सोशल मीडियावर अशा पद्धतीने ट्रोल झाली आहे. आलिया नेमकी कोणत्या कारणासाठी ट्रोल होतेय हे ऐकून तुम्ही देखील व्हाल हैराण
प्रिती झिंटा झाली आई, सोशल मीडियावर शेअर केली जुळ्या मुलांची नावे
आलिया का झाली ट्रोल
आलिया भट नुकतीच तिची खास फ्रेंड अनुष्का रंजनच्या संगीत सेरेमनीमध्ये उपस्थित झाली होती. या कार्यक्रमात आलियाने डान्स करून अक्षरशः धुमाकूळ घातला. आलियाचे डान्स आणि इतर फोटो पाहता पाहता सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र लोकांनी तिच्या लेंहग्यावरील ब्लाऊजला टार्गेट केले. या कार्यक्रमासाठी आलियाने पिवळा आणि गुलाबी वर्क केलेला डिझायनर लेंहगा परिधान केला होता. आलियावर हा रंग अगदी खुलून दिसत होता. मात्र तिच्या ब्लाऊजचं डिझाईन चाहत्यांना फारसं आवडलं नाही. ज्यामुळे पाहता पाहता आलिया सोशल मीडियावर ट्रोल झाली.
रात्रीस खेळ चालेमध्ये येणार वच्छी.. येणार ट्विस्ट
आलियाच्या लुकपेक्षा ब्लाऊजची चर्चा जास्त
अनुष्का रंजनच्या संगीत सेरेमनीमध्ये अनेक सेलिब्रेटी सहभागी झाले होते. ज्यामध्ये आलियाचा लुक चांगलाच ट्रोल झाला. वास्तविक आलियाने या लग्नात अनेक लुक्स केले होते. त्यातील तीन लुक्स तिने स्वतः तिच्या इन्स्टावर पोस्ट केले आहेत. यातील एका लुकसाठी आलियाने लेंहग्यासोबत परिधान केलेलं ब्लाऊज निराळ्या पॅटर्नचं असल्यामुळे तिला ट्रोल करण्यासाठी आलं. काही ट्रोलर्सनी या लुकवर कंमेट केली की, “घाई घाईत आलिया चुकून ब्लाऊज उलटे घालून आली आहे… बिच्चारी” तर एकाने कंमेट केली की, “आलियाने हे कसं ब्लाऊज परिधान केलं आहे. फॅशनच्या नावावर काहीपण करायचं का”, एकाने कंमेट केली आहे की, “हे ब्लाऊज नेमकं कसं टिकून आहे याचा मी विचार करत आहे” तर अनेकांनी फॅशन डिझास्टरचा पुरस्कारच या लुकसाठी आलियाला दिला आहे.
कोण आहे अनुष्का रंजन
आलियाची खास फ्रेंड अनुष्का रंजन ही अभिनेता आणि दिग्दर्शक शशी रंजनची मुलगी आहे. अनुष्काही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. तिने 2015 मध्ये वेडिंग पुलावमधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. फितरत या वेबसिरिजमध्येही तिने काम केलेलं आहे. नुकताच आदित्य सीलसोबत तिचा विवाह झाला. या लग्नसोहळ्सासाठी अनेक सेलिब्रेटीजनी हजेरी लावली होती.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje