बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटने नुकतंच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती ब्रायडल लुकमध्ये दिसत होती. हातावर मेंदी काढलेली असून आणि मेंदीचे पोझ देत तिच्या हातावर मेंगी काढणाऱ्या मेंदी आर्टिस्ट वीणा नागदा यांच्यासोबत तिने फोटो शेअर केले होते. मात्र या फोटोंमुळे सोशल मीडियावर आलिया टीझ होऊ लागली. कारण हा ब्रायडल लुक आणि मेंदीचे फोटो पाहून ती गुपचूप रणबीर कपूर सोबत लग्न करत आहे की काय अशा चर्चांना उधाण आलं होतं.
आलियाने का काढली हातावर मेंदी
आलिया सोशल मीडियावर टीझ होऊ लागल्यानंतर तिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून हा फोटो लगेचच डिलिट केला. कारण आलिया आणि रणबीर गुपचूप पद्धतीने लग्न करणार नाहीत. शिवाय सध्या कपूर घराण्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच वर्षाच्या आता कपूर घराण्यातील ऋषी कपूर आणि त्यांच्या पाठोपाठच आणि काही दिवसांपूर्वीच राजीव कपूर यांचे निधन झाले आहे. त्यामुळे इतक्या लवकर कपूर घराण्यात लग्नाची शहनाई नक्कीच वाजणार नाही. वास्तविक आलियाने तिच्या एका अॅडच्या फोटोशूटसाठी हा लुक केला होता. ज्यात तिने पीच रंगाचा लेंगा परिधान केला होता आणि मेंदी आर्टिस्ट वीणा नागदा यांच्याकडून मेंदी काढून घेतली होती. आलिया या ब्रायडल लुकमध्ये इतकी छान दिसत होती की तिचे मेंदीचे फोटो पाहून चाहत्यांना आलिया आणि रणबीरच्या लग्नाचे विधीच सुरू झाले आहेत असं वाटू लागलं. आता सर्वांना आलियाच्या या खास फोटोशूटची प्रतिक्षा आहेच. सोबतच आलिया आणि रणबीरने आता लवकर लग्न करावं असंही त्यांना वाटत आहे.
आलिया आणि रणबीरची जोडी
आलिया आणि रणबीर बॉलीवूडचं सध्या एक लोकप्रिय असलेलं लव्ह कपल आहे. ती दोघं सतत एकमेकांसोबत दिसतात. ते दोघं चित्रपटाच्या बिझी शेड्यूलमधून ब्रेक घेत एकत्र वेकेशनवरही जातात. रणबीर आणि आलिया लग्न करणार आहेत मात्र त्यांनी याबाबत अजूनही काहीच ठरवलेलं दिसत नाही. आलिया काही दिवसांपूर्वीच मालदिव्जमध्ये तिची बहीण आणि मैत्रिणींसोबत वेकेशवर गेली होती. मात्र रणबीरचे काक राजीव कपूर यांचे निधन झाल्यामुळे ती तिचं वेकेशन अर्ध्यावर टाकून मुंबईत परतली होती. या सर्व गोष्टींवरून आलिया आणि रणबीरचं नातं किती घट्ट आहे हे दिसून येतं. आलिया आणि रणबीर ही जोडी लवकरच ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. ब्रम्हास्र हा करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा एक सुपरहिरो ड्रामा चित्रपट आहे. अर्थातच या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये भव्य दिव्य सेट आणि अॅक्शनची धमाल असणार आहे. या शिवाय चित्रपटात सुपर वीएफएक्स इफेक्टदेखील असणार आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे हा चित्रपट चांगलाच रखडला आहे. शिवाय आता पोस्ट प्रॉडक्शनमध्ये या चित्रपटाच्या बजेटमध्ये कपात करण्यात आली आहे. या शिवाय आलिया संजय लीला भन्सालीच्या ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये झळकणार आहे. यासोबत एसएस राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटातही ती मुख्य भूमिकेत असणार आहे. कदाचित सर्व चित्रपटांचं शूटिंग पूर्ण झाल्यावर रणबीर आणि आलिया त्यांच्या लग्नाचा निर्णय घेणार असतील. त्यामुळे लवकरच या जोडीला खऱ्या खुऱ्या जीवनात एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
सारा अली खानने काढली अक्कलदाढ, शेअर केला मजेशीर व्हिडिओ
खुषखबर! ‘नागिन’ फेम अभिनेत्री अनिता हसनंदांनीने दिला मुलाला जन्म
लांबलेल्या मालिकांचा प्रेक्षकांनाही आलाय कंटाळा
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade