घर अथवा जमिन खरेदी करणं, विक्री करणं अथवा वारसा हक्काने प्रॉपर्टी नावावर ट्रान्सफर होणं असे अनेक व्यवहार मालमत्ता अर्थात प्रॉपर्टीबाबत केले जातात. मात्र अपुऱ्या माहितीमुळे बऱ्याचदा यात फसवणूक अथवा गैरव्यवहार होण्याची शक्यता असते. विशेषतः आईवडीलांच्या मृत्यूनंतर घरातील मुलं आणि मुलींमध्ये वारसा हक्काने ट्रान्सफर होणाऱ्या प्रॉपर्टीबाबत अनेक वाद आणि गैरसमज असण्याची शक्यता असते. जरी मुली विवाहित असतील तरी त्याचा वडिलोपार्जित मालमत्तेवर समान अधिकार असतो. शिवाय लग्नानंतर पतीच्या प्रॉपर्टीवरही पत्नीचा हक्क असतो. मात्र हे हक्क माहीत नसल्यामुळे महिलांना नहमी कमजोर आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्याचं वाटत असतं. यासाठीच प्रत्येकाला महिलांना असलेल्या या मालमत्ता अधिकाराबाबत माहीत असायला हवं. कारण त्यामुळे महिलांवर इतरांकडून कधीच अन्याय होणार नाही. महिलांना मालमत्तेबाबत काही खास हक्क कायद्यानुसार देण्यात आलेले आहेत.
महिलांना मालमत्तेबाबत असलेले अधिकार
एक महिला या नात्याने प्रॉपर्टी खरेदी अथवा विक्री आणि वडिलोपार्जित मालमत्तेबाबत असलेल हे अधिकार तुम्हाला माहीत आहेत का
आईवडीलांच्या मृत्यूपत्राची कॉपी मिळणे
आईवडीलांच्या मालमत्तेवर मुलांप्रमाणेच मुलींचाही समान हक्क असतो. त्यामुळे तुमच्या आईवडीलांच्या मृत्यूपत्राची कॉपी तुम्हाला मिळालाच हवी. भावंडामध्ये भविष्यात वाद होऊ नयेत यासाठी आईवडीलांनी याबाबत आधीच खबरदारी घ्यायला हवी. जरी आईवडीलांनी मृत्यूपत्र केलेले नसेल तरी वडिलोपार्जित मालमत्तेचे कागदपत्र तुम्हाला नक्कीच मिळू शकतात.
वडिलोपार्जित मालमत्तेवरील हक्क
तुमच्या पूर्वजांच्या मालमत्तेचे कागदपत्र तुमच्या जवळ असो अथवा नसो जन्मानुसार तुमचा वडिलोपार्जित मालमत्तेवर नक्कीच अधिकार असू शकतो. जर कोणी जाणिवपूर्वक तुमचा हक्क कायद्याने काढून टाकलेला नसेल तर तुम्ही या मालमत्तेवर तुमचा हक्क नक्कीच दाखवू शकता. लग्नानंतरही तुमचा तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर अधिकार असतो.
pexels
तुम्ही खरेदी केलेली प्रॉपर्टी
लग्नापूर्वी जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या बळावर एखादी प्रॉपर्टी खरेदी केलेली असेल तर त्यावर लग्नानंतर फक्त तुमचाच अधिकार असू शकतो. तुमच्या इच्छेनुसार तु्ही तुमची मालमत्ता विकू शकता अथवा कोणाच्या नावावर करू शकता.
प्रॉपर्टी खरेदी करताना तुम्ही पैसे वापरले असतील तर तुमचा असलेला हक्क
समजा कुटुंबासोबत एखादी मालमत्ता खरेदी करताना तुम्ही स्वतःचे पैसे काही प्रमाणात त्यासाठी खर्च केले असतील. मात्र ती प्रॉपर्टी तुमच्या वडिलांच्या, पतीच्या अथवा मुलांच्या नावावर असेल तर आर्थिक व्यवहार दाखवून तुम्ही त्या प्रॉपर्टीवर तुमचा अधिकार दाखवू शकता.
पतीच्या प्रॉपर्टीवर असलेला अधिकार
हिंदू विवाह अधिनियमानुसार तुमच्या पतीच्या प्रॉपर्टीवर तुमचा समान हक्क असतो. त्यामुळे जरी तुमच्या पतीने स्वतःच्या पैशातून एखादी प्रॉपर्टी खरेदी केली असेल आणि त्यामध्ये तुमचे कोणतेही आर्थिक योगदान नसेल तरी त्या प्रॉपर्टीवर तुमचा अधिकार असतो.
पतीच्या घरात राहण्याचा अधिकार
लग्नानंतर पतीचे तुमच्यासोबत पटत नसेल तरी तुम्हाला घराबाहेर काढण्याचा अधिकार त्याला नाही. जरी ते घर पतीचे अथवा पतीच्या आईवडिलांचे असले तरी त्या घरावर तुमचा नक्कीच हक्क असू शकतो. तुम्हाला घरातून कोणाही बाहेर काढू शकत नाही.
pexels
लग्न झालेल्या महिलेचा मालमत्ता हक्क
पतीनंतर त्याच्या मालमत्तेवर त्याच्या पत्नीचा हक्क असतो. मात्र हा कायदा महिलांना त्यांच्या मालमत्ता वाचवण्याकरता वापरता येतो. कारण नंतर जर त्या मालमत्तेवर काही देणं असेल तर ती प्रॉपर्टी या कारणासाठी जप्त केली जाऊ शकत नाही.
फोटोसौजन्य – pexels
अधिक वाचा –
कोरोनाच्या काळात करताय घर खरेदी, मग हे तुम्हाला माहीत असायलाच हवं
घरात गुडलकसाठी खरेदी करत असाल विंड चाइम तर लक्षात ठेवा या गोष्टी