DIY लाईफ हॅक्स

घरात मासे पाळायचे असतील तर हे माहीत असू द्या

Leenal Gawade  |  Jul 13, 2022
घरात मासे पाळायचे असतील तर

 घरात वेगवेगळे प्राणी पाळायला खूप जणांना आवडतात. कुत्रा, मांजर, ससे असे सगळे आपण आतापर्यंत पाळलेले पाहिले असतील. त्यातल्या त्यात मासा हा ही अनेकांना घरात असावा असे वाटते. मस्त रंगीबेरंगी मासे घरात फिशटँकमध्ये खूपच सुंदर दिसतात. तुम्हाला हव्या असलेल्या टँकमध्ये ते ठेवता येतात. तुम्हाही घरी मासे पाळायचा विचार करताय? छानसे फिशटँक (Fish Tank) आणायचे असेल तर तुम्हाला वास्तु आणि मासे यांचे आरोग्य अशा दोन्ही दृष्टिकोनातून नेमक्या कोणत्या गोष्टी माहीत असायला हव्यात ते जाणून घेऊया.

फिशटँक असते या कारणासाठी फायदेशीर

या कारणासाठी घरी ठेवले जाते फिशटँक

खूप ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला भले मोठे फिशटँक नक्कीच दिसले असतील. हे फिशटँक पाहिल्यानंतर आपल्याकडे पण असा एक फिशटँग असावा असे नक्कीच वाटत असेल. फिशटँग का ठेवला जातो हे तुम्हाला माहीत आहे का? 

  1. फेंगशुईशास्त्रानुसार जर घरात तुम्ही योग्य दिशेला फिशटँक ठेवले तर त्यामुळे धन,समृद्धी आणि संपत्ती यामध्ये वाढ होण्यास मदत मिळते. त्यामुळे जर तुम्हाला घरात लक्ष्मीचा वास हवा असेल तर तुम्ही घरात मासे पाळायला हवेत. 
  2. घरात आनंदी वातावरण हवे असेल तरी देखील घरात फिशटँक ठेवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे घरात आनंद वाढण्यास मदत मिळते. 
  3. घरात जर खूप डिप्रेशनचे वातावरण असेल तर अशावेळी तुम्ही घरात मासे आणायला हवे. कारण त्याच्यामुळे आपले लक्ष आपल्या तणावातून निघून माशांकडे लागते. 
  4. खूप जणांना नजर लागण्याची भिती असते. अशावेळी जर तुम्ही घरात मासे पाळले तर त्यामुळे नजरबाधा होत नाही असे म्हणतात. मासे हे चंचल असतात.त्यांच्या सततच्या हालचालीमुळे बाहेरुन येणाऱ्याचे लक्ष एका ठिकाणी राहात नाही ते माशाप्रमाणे फिरत राहते. 
  5. असे म्हणतात की, ज्यांना शनिची बाधा होण्याची भिती असते अशांनी मासे पाळणे आणि त्यांना खाद्य दिले तर ती बाधा दूर होण्यास मदत मिळते. 

फिशटँकची स्वच्छता आणि बरंच काही…

माशांची स्वच्छताही महत्वाची

मासे पाळणे जितके सोपे वाटते तितके ते नाही.जितका मोठा फिशटँक तितके काम हे अधिक असते. फिशटँकची स्वच्छता ही खूपच जास्त महत्वाची असते. त्यामुळे ती कोणत्या पद्धतीने करायला हवी ते देखील आपण आता जाणून घेऊया. 

  1. आठवड्यातून एकदा तरी तुम्ही फिशटँक हा स्वच्छ करायला हवा. कारण दिवसभर खायला दिल्ल्यामुळे त्यांची विष्ठा ही तळाशी जाऊन साठत असते. त्यामुळे टँकमधील पाणी गढूळ होऊ लागते. त्यामुळे आठवड्यातून एकदा माशांना एका वेगळ्या टबमध्ये काढून मग तो टँक साफ करुन घ्यावा. 
  2. अनेकदा काही कारणांमुळे मासे मरतात. त्याचा तुम्ही काही वाईट घटनांशी संबंध लावत बसलात तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे असे अजिबात करु नका. त्या ऐवजी नवीन मासे आणून त्यात सोडा 
  3. माशांना वेळच्या वेळी त्यांचे खाणे देणे गरजेचे असते. त्याची योग्य ती काळजी घ्या. 
  4. माशांना जोड हवी असते. मासा एकटा राहू शकत नाही. त्यामुळे त्याला योग्य ती जोड द्या. म्हणजे मासे अधिक काळ टिकतील. 

आता घरात मासे आणायचे असली तर या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की करा. 

Read More From DIY लाईफ हॅक्स