बॉलीवूड

बच्चन कुटुंबियांना कोरोनाची लागण, देशभरातून केली जातेय प्रार्थना

Leenal Gawade  |  Jul 12, 2020
बच्चन कुटुंबियांना कोरोनाची लागण, देशभरातून केली जातेय प्रार्थना

2020 हे बॉलीवूडसाठी अजिबात चांगलं नाही. रोज काहीना काही वाईट घटना कानी पडत असतात. शनिवारी बिग बी अमिताभ बच्चन यांची एक बातमी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवून गेली. बिग बी अमिताभ बच्चन यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्याची ही बातमी वाऱ्यासारखी इतकी दूरवर पसरली की, अमिताभ यांना अचानक रुग्णालयात का दाखल करण्यात आले याची चर्चा होऊ लागली. पण त्याच संध्याकाळी अमिताभ यांनी त्यांना कोरोना झाल्याची बातमी झाली आणि सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. पण देशभरातून त्यांच्या फॅन्सनी मात्र त्यांच्यासाठी महायज्ञ सुरु केले आहे. महानायकाला काही होऊ नये म्हणजे देशभरातून प्रार्थना केली जात आहे.

KKK10: मराठमोळा धर्मेश ठरला पहिला फायनलिस्ट, तर तेजस्वी करतेय कमाल

घरातील सगळ्यांनाच कोरोनाची लागण

Instagram

सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. अनेक सेलिब्रिटींनाही कोरोनाची लागण आतापर्यंत झाली आहे. आता यात बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांची भर पडली आहे. शनिवारी अमिताभ अचानक घरातून थेट रुग्णालयात गेले ते का गेले याची जोरदार चर्चा होऊ लागली. पण अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर स्वत:च त्यांना काय झाले ते सांगून टाकले. त्यांना प्रकृती अस्वस्थ असल्यासारखी वाटत होती. कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बच्चन कुटुंबियांची लागलीच टेस्ट करण्यात आली. दुर्देवाने बच्चन कुटुंबातील अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. मात्र जया बच्चन यांचा कोरोना टेस्ट निगेटिव्ह आला आहे. 

संपूर्ण कुटुंबिय झाले क्वारेंटाईन

 कोरोना झाल्यानंतर क्वारेंटाईन होण्याचा नियम सगळ्यांनाच लागू आहे. आता बच्चन कुटुंबियांनाही क्वारेंटाईन व्हावे लागणार आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या मदतीसाठी असलेले 54 मदतनीसही  क्वारेंटाईन होणार आहेत. 54 मदतनीसांपैकी 28 जण ही बच्चन कुटुंबियांच्या थेट संपर्कात होती. त्यामुळे बच्चन यांच्या जलसा आणि जनक या बंगल्यावर सगळ्यांना क्वारेंटाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता किमान14 दिवस तरी या कुटुंबियांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. 

बाहुबलीला झाली 5 वर्ष पूर्ण,प्रभासने फॅनसाठी शेअर केला व्हिडिओ

 

अमिताभ बच्चन आणि आराध्याची अधिक काळजी

आतापर्यंत कोरोनातून कित्येक लाख लोक बरी होऊन आलेली आहेत. पण ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि लहान मुलांसाठी हा आजार थोडासा गंभीर आहे. आराध्या 8 वर्षांची आहे तर बिग बी 77 वर्षांचे आहेत त्यामुळे त्यांना अधिक काळजी घेणे फारच गरजेचे आहे. 

अनेकांनी केली पूजा

अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबियांनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या आहेत. उज्जैनच्या मंदिरात तर त्यांच्या सलामतीसाठी पूजा देखील करण्यात आली. 

त्यामुळे आता बच्चन कुटुंबियांच्या पाठीमागे आता संपूर्ण देश आहे. 

एक वर्षात सुश्मिता सेनचा भाऊ होणार पत्नीपासून वेगळा, नात्यात दुरावा

Read More From बॉलीवूड