बॉलीवूड

स्मिता पाटील यांची ‘ही’ गोष्ट अमृतासाठी आहे खास

Trupti Paradkar  |  Oct 21, 2019
स्मिता पाटील यांची ‘ही’ गोष्ट अमृतासाठी आहे खास

दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटीलचे आजही अनेक चाहते आहेत.  आज स्मिता पाटील या जगात नसल्या त्यांच्या अभिनयाची आणि अप्रतिम सौंदर्याची जादू वर्षांनूवर्ष चाहत्यांच्या कायम राहील अशीच आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ‘प्रतिभावंत अभिनेत्री’ म्हणून त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख अगदी लहान वयातच निर्माण केली होती. 17 ऑक्टोबरला  स्मिता पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर स्मिता पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला. अभिनेत्री अमृता सुभाष हिने तर चक्क स्मिताची एक वस्तूरूपी आठवणच चाहत्यांसमोर मांडली. अमृताकडे स्मिता पाटील यांची एक ओढणी आहे. ती ओढणी घालून तीने मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. एवढंच नाही तर अमृताने तिचा स्मिता पाटील यांची ओढणी परिधान केलेला फोटो आणि एक पोस्ट यानिमित्त शेअर केली होती.

अमृताने शेअर केल्या खास आठवणी

अमृताने या फोटोसोबत शेअर केलं आहे की, “आज स्मिताताई पाटीलचा वाढदिवस होता. त्याच दिवशी मामी मोहोत्सवाचं उद्घाटन हा अपूर्व योगायोग.. ही ओढणी तिची आहे. तिच्या ताईनं माझं अस्तु मधलं काम बघून मला दिली होती. आणि सांगितलं होतं, तू जेव्हा या क्षेत्रात काम करणं थांबवशील तेव्हा तुझ्यानंतर ही ओढणी अशा मुलीला दे जी तुझ्या मते स्मिताची परंपरा पुढे नेत असेल. ही भेट माझ्यासाठी अमूल्य आहे. आज तिच्या वाढदिवशी तिची आठवण काढत तिची ही ओढणी घेतली. तिच्यासारखं मोठं कुंकू लावून झुमके घालून या समारंभाला पोचले. कार्यक्रम सुरु झाला आणि एक विलक्षण गोष्ट घडली. त्या बंद आॅडीटोरिअम मधे झगमगत्या दिव्यात एक सुंदर फुलपाखरु आलं. प्रेक्षकात उडायला लागलं. अनेकांना त्या ठीकाणी ते फुलपाखरु पाहून आश्चर्य वाटलं. थोड्या वेळ उडून ते निघून गेलं. काहीच वेळात दिपीका पदुकोन आणि विशालजी भारद्वाजांनी दिप्ती नवलजींना पुरस्कार दिला. त्यावेळी दिप्तीदींच्या कामावर आधारित व्हीडीओ सुरु झाला आणि एका अवचित क्षणी स्मितादी आणि दिप्तीदिंचा फोटो पडद्यावर झळकला. माझे डोळे भरुन आले.”

अमृताचा अभिनय या पुरस्काराच्या योग्यतेचाच

विशेष म्हणजे अमृताला 2017 मध्ये स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार देण्यात आला होता. त्यावर्षी या पुरस्काराचे ते पहिलंच वर्ष होतं. ज्यामुळे स्मिता पाटील यांच्या आठवणींना उजाळा देणारा आर्शीवाद स्वरूपी मिळालेला पहिल्या पुरस्काराची अमृता पहिली मानकरी होती.अमृताने सोशल मीडियावर टाकलेल्या या पोस्टला आणि स्मिता पाटील यांची ओढणी घालतेल्या या फोटोंना चाहत्यांनी भरूभरून प्रतिसाद दिला आहे. ज्यामुळे अमृताला मिळालेला हा पुरस्कार आणि ओढणी तिच्या योग्यतेची असल्याची ग्वाही चाहत्यांकडून तिला मिळत आहे. 

फोटोसौजन्य – इन्साग्राम

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

कोएना मित्राच्या अफेअरपासून ते प्लास्टिक सर्जरीपर्यंत, जाणून घ्या सर्वकाही

Big Boss13: सलमानचा राग अनावर मध्यावरच या कारणामुळे सोडला शो

आता मराठी मालिकेमध्येही ‘इच्छाधारी नागीण’चा ड्रामा

 

Read More From बॉलीवूड