मनोरंजन

आनंदी गोपाळरावांच्या नात्याचा गोडवा संगीतातून उलगडला

Leenal Gawade  |  Jan 23, 2019
आनंदी गोपाळरावांच्या नात्याचा गोडवा संगीतातून उलगडला

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारीत ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटातील गाणी नुकतीच रिलीज करण्यात आली. आंनदी आणि गोपाळरावांच्या नात्यातील गोडवा सांगणारी ही गाणी आहेत. शिवाय यातील एका गाण्यातून महाराष्ट्रातील कर्तबगार महिलांना सन्मानदेखील करण्यात आला आहे.  काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘रंग माळियेला’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. या गाण्यालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला  हे गाणे शरयू दाते आणि केतकी माटेगावकर यांनी गायले होते. तर ‘आनंदघन’ हे गाणे  आनंदी जोशी- ऋषिकेश रानडे, ‘वाटा वाटा ग’ हे गाणं प्रियांका वर्बेने जोशी आणि ऋषिकेश रानडे याने गायले आहे. तर यातील अँथम साँग जसराज,अवधूत गुप्ते, राहुल देशपांडे,आदर्श शिंदे आणि रोहित राऊत यांनी गायले आहे. तर या सिनेमात ‘गोंधळ माझे माऊली’ हे जसराजच्या आवाजात आहे.  पहिल्यांदाच अशा प्रकारच्या सिनेमांना संगीत देण्याचे काम सौरभ-जसराज-ऋषिकेश या तिघांनी केले आहे. आता या चित्रपटातील उर्वरीत गाणी प्रेक्षकांसाठी रिलीज करण्यात आली आहे. हा सिनेमा १५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित केला होणार आहे.

आनंदीचा डॉक्टर आनंदीबाई जोशी होण्याचा प्रवास

आपल्या सगळ्यांनात माहीत आहे की, ज्या काळात स्त्री शिक्षणाला अनुमती नव्हती. त्या काळात गोपाळरावांनी छोट्या आनंदीला शिकवण्याची  गोपाळरावांची जिद्द आणि आनंदीला शिक्षणाची गोडी लावण्यासाठी घेतलेली मेहनत पुस्तक आणि मालिकेच्या रुपातून बाहेर आली आहे. पण चित्रपटाच्या माध्यमातून हा प्रवास पहिल्यांदाच दाखवण्यात आला आहे.  

तो काळ उभारणे चॅलेजिंग- दिग्दर्शक

आनंदी गोपाळ या सिनेमाचे दिग्दर्शन समीर विद्वंस यांनी केले आहे.तर चित्रपटातील संवाद इरावती कर्णिक यांचे आहे.  झी स्टुडिओज, फ्रेश लाईम्स आणि नम:पिक्चर्सची निर्मिती असलेला हा चित्रपट असून या म्युझिक लॉन्च सोहळ्यावेळी दिग्दर्शक समीर विद्वंस यांनी सिनेमाच्या चित्रीकरणाचा अनुभव सांगितला. आनंदीबाई जोशींचा काळ हा स्वांतत्र्यपूर्व काळातील आहे. आनंदीबाई जोशींचे फार कमी दस्तावेज अभ्यासासाठी आहे. त्यांचे आणि गोपाळरावांचे फोटोही दुर्मिळ आहेत. त्यामुळे शुटींगसाठी जागा निवडताना खूप अभ्यास करावा लागला. आनंदीबाई कोल्हापूरातील मिशनरी शाळेत जात होत्या ती शाळा उभारणे शिवाय डॉक्टरी शिक्षणासाठी त्या अमेरिकेत गेल्या होत्या ते दाखवणे हे कठीण होते. त्या जागा शोधण्यासाठी वेळ लागला असे यावेळी समीर यांनी सांगितले. हा चित्रपट पुणे, जॉर्जिया यासारख्या ठिकाणी शूट करण्यात आला आहे.

‘आनंदीगोपाळ’चा टीझर पाहिलात का? 

भाग्यश्री आनंदीबाईंच्या भूमिकेत

आंनदीबाई जोशींच्या जीवनावर आधारीत चित्रपट म्हटल्यावर यात आनंदीबाई कोण साकारणार ? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. या आधी आनंदीबाई जोशींवर आधारीत ‘उंच माझा झोका’ मालिकेत स्पृहा जोशीने आनंदीबाई जोशींची भूमिका साकारली होती. त्यामुळे चित्रपटात ही भूमिका कोण साकारणार ही उत्सुकता होती. पण या म्युझिक लॉन्च सोहळ्यात मोठ्या आनंदीची भूमिका कोण साकारणार आहे. यावरुन पडदा उठला. भाग्यश्री मिलिंद हिने आनंदीबाई जोशींची भूमिका साकारली असून या सोह्ळ्यावेळी मोठ्या आनंदीबाई जोशी यांचे मोशन पिक्चर प्रदर्शित करण्यात आले. भाग्यश्री हिने याआधीही मराठी चित्रपटातून काम केले आहे. भाग्यश्री डहाणूकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने नाटकांमधूनही कामे केली आहेत. 

गोड नात्याची सुरुवात सांगणारे ‘रंग माळियेला’ गाणे

 भाग्यश्रीचा आनंदी रुपातील हा फोटो पाहिलात का? 

आनंदीबाईचा एक जुना फोटो आपण सगळ्यांनीच पाहिला असेल. त्यांहा हा फोटो चित्रपटातील भाग्यश्रीला घेऊन पुन्हा एकदा तयार करणयात आला आहे. या नव्या फोटोमधील डिटेलिंगही तितकच सुंदर आहे. यात त्यांनी नेसलेली साडी,कपाळावरील गोल टिकली,नाकातील नथ, गळ्यातील चिंचपेटी, मंगळसूत्र, हातात सुंदर गुलाबी रंगाची गुलाबाची फुले दाखवण्यात आली आहे. आनंदीबाई जोशींचा नव्या रुपातील हा फोटो आकर्षक आहे. या फोटोतून नऊवारी साडीतून पाचवारी साडीमध्ये झालेला आनंदीबाईंमधील बदल अगदी अचूक टिपता येतो. त्यामुळे हा फोटो अधिक जास्त जवळचा वाटतो. 

नारीशक्तीला सलाम 

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर बनण्याचा मान आनंदीबाई जोशींनी मिळवला. त्यानंतर अनेक क्षेत्रात महिला पुढे येऊ लागल्या. यात नारीशक्तीला सलाम करण्यासाठी  ‘तू आहेस ना’ हे खास गाणं चित्रपटात तयार करण्यात आले आहे. 

(फोटो सौजन्य-Instagram)

Read More From मनोरंजन